Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आय पील

व
विनायक प्रभू
Wed, 10/01/2008 - 13:37
🗣 106 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
49082 वाचन

💬 प्रतिसाद (106)
म
मदनबाण Wed, 10/01/2008 - 17:17 नवीन
मला तर कधी वाटते मुला आणि मुलींच्या लग्नाच्या वय वाढल्यामुळे हे घडत असावे. काय राव अवं टीव्ही वर असलेल्या सिरीयल्स मधे सुद्धा मुलीचा कोण ना कोण तरी बॉय फ्रेंड असतोच,, वयच वगरै सोडुन ध्या हो ज्या वयात हे प्रकार घडतात ते वय लग्नाच नसतंच मुळी !!! मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Wed, 10/01/2008 - 17:21 नवीन
मुलीचा कोण ना कोण तरी बॉय फ्रेंड असतोच
बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड असण्यात नेमकं काय वाईट आहे? त्यानं भारतीय संस्कृती नेमकी का बुडावी? आईबापांनी निवडून दिलेल्या मुलाशी/मुलीशी निमूटपणे संसार करणं हीच भारतीय संस्कृतीची महती आहे काय? याइतका भारतीय संस्कृतीचा (ऍज़ इट वॉज़ मेंट टू बी) दुसरा अपमान नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/01/2008 - 17:32 नवीन
टग्याशेटच्या दोन्ही मुद्यांशी १००% सहमत. >> आईबापांनी निवडून दिलेल्या मुलाशी/मुलीशी निमूटपणे संसार करणं हीच भारतीय संस्कृतीची महती आहे काय? आणि मग स्वतःची निवड लादण्यासाठी स्वतः मुलांना जन्म देऊन वेठीस धरावं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या
म
मदनबाण Wed, 10/01/2008 - 17:48 नवीन
आईबापांनी निवडून दिलेल्या मुलाशी/मुलीशी निमूटपणे संसार करणं हीच भारतीय संस्कृतीची महती आहे काय? अहो पण ज्या मुलींचे ४ बॉयफ्रेंड असतात त्यांचे काय ?? मित्र हा सखा झाला तर चांगलच आहे पण लग्नापुर्वी संबंध ठेवण्याची घाई कशाला ? मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
स
सखाराम_गटणे™ Wed, 10/01/2008 - 18:07 नवीन
>>मित्र हा सखा झाला तर चांगलच आहे पण लग्नापुर्वी संबंध ठेवण्याची घाई कशाला ? सहमत (१००%) हेच म्हणतो, आणि आजकाल आईबाप जबरदस्ती करत नाहीत, आणि ज्या मुले-मुली लग्ना आधी इतक्या गोष्टी करतात. ते जबरदस्ती करुन घेतील का? आजकाल व्यक्ती स्वातंत्र्यानावाखाली काहीही चालते असा गैरसमज पसरतो आहे. ----- वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ट
टुकुल Wed, 10/01/2008 - 18:21 नवीन
>>>आजकाल व्यक्ती स्वातंत्र्यानावाखाली काहीही चालते असा गैरसमज पसरतो आहे. व्यक्ती स्वातंत्र्य हा हेवढा स्वस्त शब्द झाला आहे कि त्याच्या नावाखाली काही ही चालते. ज्यांना धुवायची पण अक्कल आलेली नसते ते पण वापरतात. >>>वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची. =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
क
कलंत्री Wed, 10/01/2008 - 17:27 नवीन
हे जे चालले आहे किंवा जितक्या सहजपणे आपण चर्चा करत आहोत त्याचा मला विस्मय वाटतो. आचारावर घाला घातला जातो मग विचारावर आपोआपच घाला पडतो. माझ्या मते या विषयावर शास्त्रीय पद्धतीने माहिती काढली जायला हवी. आपण जी काही चर्चा करत आहोत त्याने किती घरे आणि मने उद््ध्वस्त होणार आहे याचा आपण विचारतरी करीत आहोत काय? येशुचा कोणीतरी विचार उधृत केला आहे त्याचा विचार करायला हवा. ( अपूर्ण)
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 10/01/2008 - 17:39 नवीन
http://vipravani.wordpress.com/ कुठले खांब धरुन बसला आहात कलंत्री साहेब. चर्चेने घर सावरतील. जेव्ढी मोक्ळी तेव्ढ बरे. अर्थात मि.पा. चे नियम न मोडता. त्याची सुद्धा काळ्जी नसावी. तात्याच्या हाती बटन आहे की. पॉर्नोग्राफिक साईटला जास्त विझिट कोणाच्या असतात. १२ ते २५ वर्षे मुलांच्या. आई बाप झोपल्यावर. पॉप अप्स ची काळ्जी घेउन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Wed, 10/01/2008 - 18:05 नवीन
हे जे चालले आहे किंवा जितक्या सहजपणे आपण चर्चा करत आहोत त्याचा मला विस्मय वाटतो.
होते आहे म्हणून तर चर्चा होते. आणि सहजपणे, मोकळेपणाने चर्चा करून काय होते आहे, का होते आहे ते समजून घ्यायचे, की केवळ आपली चौकट मोडली म्हणून धक्क्यात जाऊन परत आपल्याच चौकटीत गुरफटायचे? मुळात आपली चौकट काय आहे, ते तरी आपल्याला कळले आहे काय? ते समजण्याचा आपण प्रयत्न करतो काय? की आपली चौकट तीच बरोबर, बाकी सर्व चूक, हेच मुळात गृहीतक असते? चौकटीबाहेरचे काही आले की धक्का कोणालाही बसतो, ते स्वाभाविकच आहे. आणि त्यासाठी आपली चौकट सुधारणे हे प्रत्येकाला प्रत्येकवेळी शक्य होतेच असे नाही (मलाही नाही होत कित्येकदा!). पण म्हणून आपल्या चौकटीबाहेरही काही असू शकते, आपल्या चौकटीलाही मर्यादा आहेत हेच मुळात ऍक्नॉलेज का नाही करायचे? बरे, आपली चौकट बरोबर असेलही, अगदी ती १००% बरोबर आहे असे गृहीत धरू. पण ती का बरोबर आहे, चौकटीबाहेरचे नेमके का चूक आहे, हे तरी आपल्याला स्पष्ट आहे काय? समांतर चौकटींचे सोडून द्या, आपलीच चौकट जरी १००% खरी मानली, तरी त्या चौकटीत विश्व मावत नाही, त्याबाहेर जात आहे हे एकदा लक्षात आल्यावर त्यामागील कारणांसाठी विश्वाबरोबरच आपली चौकटही तपासून पाहायला नको काय?
आचारावर घाला घातला जातो मग विचारावर आपोआपच घाला पडतो.
मुळात हे आचार कोणी, कधी ठरवले, कशासाठी? ते नेहमी असेच होते का? बदल म्हणजे नेहमीच चूक का? किती बदल हा ग्राह्य आहे आणि किती नाही, आणि का? या मूलभूत मुद्द्यांवर विचार व्हायला नको का? याहीपुढे जाऊन, मी ठरवलेले आचार सगळ्यांनी पाळले पाहिजेत हे ठरवणारा मी कोण?
माझ्या मते या विषयावर शास्त्रीय पद्धतीने माहिती काढली जायला हवी.
'शास्त्रीय पद्धतीने' म्हणजे नेमके काय? आणि इथे नेमके काय वेगळे चालले आहे?
आपण जी काही चर्चा करत आहोत त्याने किती घरे आणि मने उद््ध्वस्त होणार आहे याचा आपण विचारतरी करीत आहोत काय?
'उद्ध्वस्त' म्हणजे नेमके काय? आणि आपल्या मनात जी 'उद्ध्वस्त'ची व्याख्या आहे (असे मला वाटते), ती जरी ग्राह्य मानली, तरी हा विचार आताच का सुचावा? ही काही नवीन गोष्ट नाही. मलाच माहीत होऊन २० वर्षे उलटून गेली. आपल्याला आज कळली असेल. कदाचित मला कळण्यापूर्वीही २० वर्षे चालत असेल, कोणाला माहीत. मग किमान २० वर्षे यातून काही 'उद्ध्वस्त' वगैरे होत आहे असे कोणाला वाटले नाही, तर मग आजच याचा विचार कशाला? (किमानपक्षी ज्यांचे काही 'उद्ध्वस्त' वगैरे झाले, त्यांना तर नक्कीच वाटले असते?) की 'कदाचित हे लोण आपल्यांपर्यंतही पोहोचले तर' ही यामागची भीती आहे? जर २० वर्षांत पोहोचू शकले नाही (आजूबाजूला सर्रास चालू असता), तर आजच (हे कळल्यावर - आणि तेही 'मिसळपावा'वर वाचून) का पोहोचावे? पण तरीही तुमची काळजी रास्त असू शकते. आणि त्याकरता वैयक्तिक पातळीवर, स्वतःच्या कुटुंबापुरत्या (तुम्हाला योग्य वाटतील त्या) पायर्‍या (तुम्हाला योग्य वाटत असतील तर) तुम्ही निश्चितच घेऊ शकता. त्या जर योग्य असतील आणि योग्य तर्‍हेने त्याची अंमलबजावणी करू शकलात (आणि ज्यांच्यासाठी त्या घ्यायच्या त्यांना ते पटवू शकलात) तर उपयोग होईलही, नाहीतर होणार नाही. पण समाजाने कसे वागावे, समाजाकरता योग्य काय हे आपण कसे ठरवणार?
येशुचा कोणीतरी विचार उधृत केला आहे त्याचा विचार करायला हवा.
त्याआधी मुळात 'पाप' म्हणजे काय, ते कोणी आणि कशाच्या आधारावर ठरवायचे हे स्पष्ट व्हायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
व
विनायक प्रभू Wed, 10/01/2008 - 18:11 नवीन
http://vipravani.wordpress.com/ नतमस्तक आहे मी आपल्या पुढे. खुप आवड्ले ट्ग्या राव तुम्ही लिहिलेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या
स
साती Wed, 10/01/2008 - 18:33 नवीन
सहमत टग्या! आय्.पिल्.ला कुणाचा आरोग्याच्या दृष्टीकोनातून विरोध असेल तर समजू शकतो. संस्कृतीवर आघात वैगेरेमुळे नाही. नवरात्रात या गोष्टी वाढलेल्या दिसणे हा कदाचित संधी मिळत असल्याचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट असावा. ज्यांना असं वागायचंय ते कधी ना कधी वागणारच. मुळात आपण बाळबोधपणे आपल्या समाजात असं काही नाही , असलं तर हल्लीच वाढलंय वैगेरे समजतो किंवा तसा दावा करतो हेच चुकीचं आहे. विवाहबाह्य्,विवाहपूर्व संबंध हे इथे पूर्वीपासूनच आहेत, अन्यथा इतके अनाथाश्रम दिसले नसते. (आता अनाथाश्रमांच्या जागी आय. पिल. आणि निरोधची पाकिटे दिसतील कदाचित. यांपैकी चांगले कुठले हे कोण ठरवणार?) साती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या
न
नीधप Fri, 10/03/2008 - 04:33 नवीन
परफेक्ट!!! एकदम करेक्ट - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/01/2008 - 19:01 नवीन
माझ्या मते या विषयावर शास्त्रीय पद्धतीने माहिती काढली जायला हवी. आपण जी काही चर्चा करत आहोत त्याने किती घरे आणि मने उद््ध्वस्त होणार आहे याचा आपण विचारतरी करीत आहोत काय? चर्चा करुन घरं उध्वस्त होणार असं तर तुम्ही सुचवत नाही आहात ना? बाकी पुन्हा एकदा टग्याशेटशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
स
सखाराम_गटणे™ Wed, 10/01/2008 - 18:19 नवीन
>>> जे काही मुले-मुली करतात, ते काही चुक असे नाही, हा निसर्ग नियम आहे. पुर्वी मनावर ताबा असावा, जीवनाचा हेतु उदात्त असावा, मेणबत्तीसारखे दुसर्‍यासाठी जळावे इति. इति. आता, जो तो जीवन उपभोगणे च्या मागे लागला आहे, आता प्रत्येकाचे जीवन उपभोगणे वेगळे. बालविवाह पुन्हा चालु करावेत असे माझे मत आहे. हे जे आकडे आहेत ते इतर साधने फेल झाल्यानंतरचे आहेत. आणी दरवेळीच गर्भधारणा दरवेळीच होते असे नाही. काही पपया, धोतरा असे उपाय आहेतच. ----- वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Wed, 10/01/2008 - 18:25 नवीन
http://vipravani.wordpress.com/ पपयाने **काही होत नाही.
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Wed, 10/01/2008 - 18:31 नवीन
लेखाचे नाव पाहून वाटले जरा "टंकलेखना"त गडबड असावी. आम्हाला बुवा ते "आय पी एल" वाटले. पण लेखकाचे नाव पाहून काही तरी नवीन प्रकार असणार म्हणून वाचले आन बॉ आपले डोके गरागरा फिराय लागले. गुगलावरुन "आय पील" काय आहे हे समजून घेतले. आम्हाला अगम्य अज्ञानातून बाहेर काढल्याबद्दल प्रभू साहेबांचे तसेच प्रतिसाद देणार्‍यांचे डोंगरा येवढे उपकार. आपला, (अज्ञानी) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 10/02/2008 - 04:16 नवीन
लगे रहो मुन्नाभाय!!!:) जे काही मुले-मुली करतात, ते काही चुक असे नाही, हा निसर्ग नियम आहे. सहमत! आणि आज जेंव्हा आयुष्यातील बाकीची ध्येये मिळवण्याच्या ध्यासामुळे (चांगल्या अर्थाने) लग्नाला उशीर होतो. त्यामुळे हे असे वर्तन होणे सहाजिकच!! पुर्वी मनावर ताबा असावा, जीवनाचा हेतु उदात्त असावा, मेणबत्तीसारखे दुसर्‍यासाठी जळावे इति. इति. आता, जो तो जीवन उपभोगणे च्या मागे लागला आहे पूर्णपणे असहमत!! पूर्वीचे लोक काही उदात्त , सत्शील वगैरे नव्हते!! लग्नाआधी अनैतिक संबंध ही मनुष्यजातीची हजारो वर्षांची परंपरा आहे. कुंतीचेच उदाहरण घ्या. कर्ण कसा काय जन्माला आला? बालविवाह पुन्हा चालु करावेत असे माझे मत आहे. ह्ये मात्र तुफान ईनोदी!!! सख्या, तुझ्यासाठी आता एखादी १० वर्षांची बालिका शोधूयात!!!:) हे जे आकडे आहेत ते इतर साधने फेल झाल्यानंतरचे आहेत. आणी दरवेळीच गर्भधारणा दरवेळीच होते असे नाही. सहमत! पण ठराविक वयात गर्भधारणा व्हायचा संभव जास्त असतो. हे निसर्गतःच होते. विशितल्या मुलीला चाळिशीतल्या स्त्रीपेक्षा गर्भधारणा होण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असते असे म्हणतात! काही पपया, धोतरा असे उपाय आहेतच. पपया....!! कोणत्या युगात वावरतात आहेत रे हे लोक!!!! अरे दादरच्या गर्भपात क्लिनिकची जाहिरात गेली ३५ वर्षे तरी होते आहे रे मुंबईच्या लोकल गाड्यांमध्ये!!! जरा आजूबाजूला वाचा रे प्रवास करतांना!!!!!:) माझ्या मते कायद्याने सज्ञान असलेल्या पुरुष आणि स्त्रीयांनी आपखुषीने लैंगिक संबंध ठेवण्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. फक्त त्यातून निष्पन्न होणार्‍या परिणामांची काळजी आनि जबाबदारी घेण्याची तयारी असणे आवश्यक आहे. परिणाम (गर्भधारणा) टाळण्यासाठी आज अनेक उपाय उपलब्ध आहेत. तेही जर आजकालच्या तरूण्-तरुणींना माहीती नसतील तर त्यांच्या अज्ञानाची कीव करावी तेव्हढी थोडीच!!! निरोधाची जाहिरात गेली ३०-३५ वर्षे तरी लोकलच्या डब्यात होत आहे. बाकी पालकांचं म्हणाल (ते १-५ प्रश्न आणि त्याची पालकांनी दिलेली उत्तरे) हा केवळ भोंदूपणा (हिपोक्रसी) आहे असे मी म्हणेन!! आपल्या मुला-मुलीना योग्य ते लैंगिक शिक्षण देण्याची अंतिम जबाबदारी पालकांची आहे. आपले किती पालक ती पार पाडतात? वरील प्रतिक्रियांमध्ये कुठेतरी अमेरिकन आया आपल्या मुलीना संततीप्रतिबंधक साधनांची माहिती देत असल्याबद्द्ल उपहासपूर्वक उल्लेख आहे. पण मला सांगा, त्यात काय चूक आहे? आपल्या मुलांवर आपण २४ तास तर लक्ष ठेवू शकत नाही (आणि तसे ठेवूही नये!) मग आपल्या पाल्याला या विषयात सज्ञान करण्यात काय चूक आहे? पालकांनो एक लक्षात ठेवा! तुम्हाला आवडो वा न आवडो, तुमची वयात आलेली मुलं-मुली हे लैंगिक संबंधांबद्दल उत्सुक असणारच! ते तुम्ही कितीही म्हटलं तरी टाळू शकत नाही!! आता त्यांना योग्य माहिती देऊन पुढील परिणामांविषयी (व ते टाळण्याविषयी) जागृत करणं ते तुमच्या हातात आहे. आपण ऍक्टिव्ह रोल घ्यायचा कि पॅसिव्ह राहुन फक्त माझी मुलं हे असं काही करणारच नाहीत या फोल कल्पनेमध्ये मश्गुल व्हायचं हे तुमच्या हातात आहे!!!! आमेन!!!!!:)
  • Log in or register to post comments
क
कलंत्री गुरुवार, 10/02/2008 - 04:45 नवीन
विचार प्रवर्तक आणि दिशा देणारा असा हा प्रतिसाद आहे. हा विषयावर आपल्या घरी चर्चा झाली तर त्यातुन शिक्षण होईल हे १००% मान्य. इतकेच कश्याला आपल्या मुलांच्या आणि मुलींच्या मित्रमंडळींना एकत्र आणून यावर अभ्यास चर्चा करायला हरकत नसावी. प्रभूसाहेबांच्या मते आपण १९४७ ची विचारसरणी ठेवत आहे यातही तथ्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
व
विनायक प्रभू गुरुवार, 10/02/2008 - 04:56 नवीन
http://vipravani.wordpress.com/ अय शेख तेरी तू देख. आपल्या मुलांचे आपण बघा. मित्रमंडळीचे पालक " आमच्या मुलाना बिघडवता का" म्हणुन जोडे हाण्तील. भारतीय प्रजासताकाचा विजय असो. असे जोडे अनेक वेळा खाउनही जिवंत आहे मी. आपला नम्र वि.प्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
प
पिवळा डांबिस गुरुवार, 10/02/2008 - 05:12 नवीन
असे जोडे अनेक वेळा खाउनही जिवंत आहे मी. जिवंत असल्याबद्दल अभिनंदन!!:) पण एक लक्षांत ठेवा विनायकराव! तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांवरच तर सर्व भिस्त आहे आमची!!! अन्यथा हिपोक्रिट संस्कृतीरक्षकांनी एव्हांना एका समस्त समाजाचा संपूर्ण नास केला असता....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
क
कवितानागेश Mon, 09/08/2014 - 15:00 नवीन
प्रतिसाद आवडलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
व
विनायक प्रभू गुरुवार, 10/02/2008 - 04:32 नवीन
http://vipravani.wordpress.com/ आयुष्यातील ३० वर्षे जाळली ह्या क्षेत्रात. पण शिकल्या सवरल्या लोकांच्या मनोव्रुत्तीत ह्या विषयात फारसा फरक नाही. ह्यांची आपली १९४७ भारत देश स्वतंत्र झाला टाईप विधाने चालू असतात. आपण विषय खोलात जाउन लिहील्याबद्दल मनापसुन धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 10/02/2008 - 04:45 नवीन
हॅपी टू हेल्प!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
ग
गणा मास्तर गुरुवार, 10/02/2008 - 06:01 नवीन
खरेतर आपला समाज कुठल्यातरी खोट्या कल्पनांपायी बोलायला घाबरतो. काल परवाच काही जपानी सहकार्‍यांसोबत लग्न, लैंगिक संबंध याबाबत चर्चा झाली. इथे शक्यतो प्रेमविवाह होतात आणि लग्नाआधी जोडीदाराबरोबर लैंगिक संबंध असतातच असतात. किंबहुना असे सबंध ठेवायला जोडीदाराने नकार दिला तर त्यात काहितरी कमतरता, आजार आहे असे समजले जाते. इथे टीव्ही मालिकांमधुन सेफ सेक्सची माहिती दिली जाते. कदाचित विषयांतर झाले असावे. पालकांनी मुलांना याची माहिती नेमकी कशी द्यावी यावर कोणी प्रकाश टाकु शकेल काय? संवादाला सुरुवात कशी कोठुन आणि कधी करावी. (खरेतर एखाद्या चांगल्या लेखमालेच्या प्रतिक्षेत) - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/02/2008 - 06:10 नवीन
संस्कार, नितीमत्ता, जीवनमुल्य वगैरे वगैरे शब्द कानावर पडले की हल्ली नाकं मुरडली जातात. निसर्ग १२-१३ वर्षापासून मुलीला माता बनण्याचे अधिकार देतो. कायदा १८व्या वर्षापासून हा अधिकार प्रदान करतो. तरी शिक्षण, करियर, स्वातंत्र्य उपभोगणे इ. इ. कारणांसाठी मुलींची लग्ने २५ वर्षे आणि त्या पुढे होतात. लग्ना आधी इतरांशी शरीरसंबंध (गर्भनिरोधके वापरून) ठेवलेला जीवनसाथी किती मुला-मुलींना चालतो? एखाद्या मुलीशी लग्न ठरल्यावर एखादा मित्र म्हणाला, 'आयला, फटाका आहे पोरगी. आम्ही दोघांनी कित्येकदा अमु़क अमु़क हॉटेलात रात्र-रात्र मजा केली आहे. बिनधास्त लग्न कर. मजा मारशील लेका.' असे म्हंटले किंवा एखाद्या मुलीची मैत्रीण म्हणाली, 'अग सॉलीड रोमँटीक आहे तो पोरगा. मी आणि तो अमुक अमु़क हॉटेलात कित्येक रात्री जागलो आहोत. अग झोपूच देत नाही. काय धमाल करतो म्हणून सांगू...' तर किती मुले मुली ठरवलेले लग्न पार पाडतील? ९९% मुले-मुली ताबडतोब लग्न मोडतील. तरीपण ह्या ९९% मुलामुलींसमोर वरील (संस्कार, नितीमत्ता, जीवनमुल्य) शब्द उच्चारले तरी तेही नाकेच मुरडतील. लग्नापूर्वी शरीरसंबंध (अगदि जिच्याशी/ज्याच्याशी लग्न ठरलेले आहे ती व्यक्तीशीही...) नितीमत्तेत बसत नाहीत. ही नितिमत्ता कोणी ठरवली? त्यांना काय अधिकार? ह्या प्रश्नांचे ढोबळ मानाने उत्तर असे देता येईल की 'समाजाने'. (कोणी एकाने नाही). समाज आरोग्यपूर्ण आणि एकसंघ राहावा ह्या उद्देशाने असे अलिखित नियम केले गेले. लग्नापुर्वीच्या शरीर संबंधांमधून जर संतती जन्मास आली आणि त्याची जबाबदारी पित्याने नाकारली तर अनौरस संतती वाढत जाईल आणि अशा संततीची भावनिक वाढ नीट आणि योग्य दिशेने न झाल्याने, जन्मतःच आपल्याला नाकारलेले आहे ह्या चिडीतून ती संतती समाजाचे नियम झुगारून स्वतःच्या नियमांनी कशीही वागू लागेल आणि समाजाच्या आरोग्याचे संतुलन बिघडेल. हे सर्व होऊ नये म्हणून सामाजिक आणि व्यक्तिगत नितिमत्ता महत्त्वाची आहे. पुर्वीच्या काळी साधने नव्हती (एवढी प्रचलीत आणि सहज उपलब्ध नव्हती) तेंव्हा कायदे जरा जास्त कडक होते. ती त्या काळची गरज होती. आज तसे नाही आय्. पील. आहे , निरोध आहे.तेंव्हा आता तशी नितीमत्ता बाळगण्याचे कारण काय? आता संतती रोखता येऊ शकते. करून सवरून नामा निराळे राहता येते. तरी पण सुखी संसारातील एकनिष्ठता आणि विश्वास ह्याला तडा जाणार्‍या गोष्टीने लग्न संस्था कमकुवत होऊ शकते. आणि पुन्हा वैयक्तीक तसेच सामाजिक नुकसानच होते. अनेकांशी शरीर संबंध आल्यावर जर संसारात मन रमले नाही तर पुरूषाला किंवा स्त्रीला लग्ना नंतरही, लग्न बंधनात राहूनही, इतरांशी शरीरसंबंध ठेवण्याचे आकर्षण वाटू शकते. आणि शेवटी लग्न म्हणजे काय तर, 'कायदेशीररित्या स्त्री पुरूष शरीर संबंध' अशी एक उथळ व्याख्या तयार होईल. असे होणे कोणाच्या हिताचे आहे? मुलांना जर जाणवले की आपले बाबा दुसर्‍या स्त्री बरोबर झोपतात किंवा आईचे दुसर्‍या कोणा पुरुषाशी शरीर संबंध आहेत तर त्याचे भावविश्व उध्वस्त होइलच कि नाही? मुसलमान धर्मातही 'चार विवाहांना संमती आहे' 'चार अनैतिक संबंधांना नाही'. अनैतिक शरीर संबंध हा समाजातील आजचा बदल नाहीए. पुरातन काळापासून चालत आलेला आहे. पुरूष प्रधान समाजात 'अंगवस्त्र' ही उच्चभ्रू समाजाची मिरासदारी होती. वेश्या व्यवसाय हा विश्वातला सर्वात जुना व्यवसाय आहे. पण 'अंगवस्त्र' बाळगणार्‍या कुटुंबप्रमुखाच्या कुटुंबातील इतर घटकांची मानसिक कुचंबणाच व्हायची. घरच्या लक्ष्मीला कधीच मनःस्वास्थ लाभायचे नाहि. पण कुटुंबप्रमुखाचा घरात 'पोलीसी कायदा' असायचा. 'ह्या विषयावर कोणी काही चकार शब्द काढायचा नाही' अशी सक्त ताकिद असायची. वेश्या व्यवसायालाही, ज्यांची लग्ने होत नाहीत, व्हायची आहेत, झालेली आहेत पण काही कारणाने घरात सुख नाही अशा पुरूषांनी इतर निरपराध स्त्रीयांवर बलात्कार करून नये म्हणून सरकारने परवानगी दिलेली आहे असे म्हणतात. तरी पण तेही आपल्याकडे नितीमत्तेत बसत नाही. वेश्या गमनी पुरुषाकडे चांगल्या नजरेने बधितले जात नाही. शारीरीक गरज कितीही तीव्र आणि नैसर्गिक असली तरी त्यावर ताबा ठेवता येतच नाही असे नाही. हे आपण स्वानुभवावरून आणि आजूबाजूच्या अनेक ओळखिच्या उदाहरणांमधून पाहू शकतो. एखाद्याने अन्याय झाला म्हणून संतापाच्या भरात समोरच्याचा खून केला तर आपली सहानुभूती त्याला मिळू शकते पण तरीही तो गुन्हेगारच ठरतो. समाज रक्षाणासाठी केलेल्या कायद्या बाहेर तो वागलेला असतो. आपल्या भावनांवर, त्या कितीही नैसर्गिक असल्यातरी, ताबा ठेवण्यास तो असमर्थ ठरलेला असतो. आपली कितीही सहानुभूती त्याला मिळाली तरी पण ' त्याने असे वागायला नको होते' असाच सर्व हितचिंतकांचा सूर असतो. त्यात काही गैर आहे का? शिक्षणाच्या, ज्ञानाच्या प्रसाराने, व्यक्तिस्वातंत्र्याच्या अवास्तव कल्पनांमुळे, घरातल्यांच्या संस्काराच्या अभावाने, नितिमत्ता, जिवनमुल्ये आदी विषयांवर घरात होणार्‍या संवादाच्या अभावाने, बळावलेल्या आत्मकेंद्रीत वृत्तीमुळे, वाढत्या बंडखोरीमुळे, शरीर सुखाची चटक, चोरून शरीरसुख मिळविण्यातील थरार आदी घटकांमुळे विवाहपुर्व शरीर संबंधांचे प्रमाण हल्ली जास्त वाढलेले आहे असे दिसते. श्री. विनायक प्रभू ह्यांना त्यांच्या वैद्यकिय अनुभवातून हे प्रकर्षाने जाणवले आणि हे चित्र भयावह आहे असे वाटले. नविन पालकांनी, ज्यांची मुले अजून लहान आहेत त्यांनी, ह्या विषयावर सखोल विचार करून आई-वडीलांनी आपापसात चर्चाकरून आपल्या मुलांवर कसे संस्कार करावेत हे त्याना ठरविता यावे. त्यांना वास्तवाचे भान करून द्यावे म्हणून हा लेखनप्रपंच मांडला आहे असे मला वाटते. एका चांगल्या गहन विषयाला चर्चेसाठी मांडल्या बद्दल श्री विनायक प्रभू ह्यांचे आभार आणि अभिनंदन.
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ गुरुवार, 10/02/2008 - 06:45 नवीन
सहमत, >>लग्ना आधी इतरांशी शरीरसंबंध (गर्भनिरोधके वापरून) ठेवलेला जीवनसाथी किती मुला-मुलींना चालतो? ज्यांना गरब्यातील संबध म्हणजे काहीच वाटत नाही, त्यांनी उत्तर द्यावे. शिक्षणाच्या, ज्ञानाच्या प्रसाराने, व्यक्तिस्वातंत्र्याच्या अवास्तव कल्पनांमुळे, घरातल्यांच्या संस्काराच्या अभावाने, नितिमत्ता, जिवनमुल्ये आदी विषयांवर घरात होणार्‍या संवादाच्या अभावाने, बळावलेल्या आत्मकेंद्रीत वृत्तीमुळे, वाढत्या बंडखोरीमुळे, शरीर सुखाची चटक, चोरून शरीरसुख मिळविण्यातील थरार आदी घटकांमुळे विवाहपुर्व शरीर संबंधांचे प्रमाण हल्ली जास्त वाढलेले आहे असे दिसते. पुर्णपणे सहमत, व्यक्तिस्वातंत्र्याचा उपयोग काही तरी चांगले, समाज उपयोगी कार्य करण्यासाठी करा, ----- वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
पिवळा डांबिस गुरुवार, 10/02/2008 - 07:05 नवीन
>>लग्ना आधी इतरांशी शरीरसंबंध (गर्भनिरोधके वापरून) ठेवलेला जीवनसाथी किती मुला-मुलींना चालतो? ज्यांना गरब्यातील संबध म्हणजे काहीच वाटत नाही, त्यांनी उत्तर द्यावे. आपल्याला काय चालते आणि काय नाही हा इथे प्रश्नच नाहिये असे मला वाटते..... आता यापुढे आपल्याला असेच चॉईस मिळणार आहेत (आपण जर अगदी घनघोर खेड्यात जाउन विवाह केले नाहीत तर!!) वर निर्देशित केलेल्या कोणत्याही कारणाने असोत, विवाहपूर्व संबंध अस्तित्वात असणार हि शक्यता आता नाकारता येत नाही. आता हल्लीच्या मुला-मुलींपुढे प्रश्न हा आहे की आपल्याविषयी काळजी करणार्‍या, आपल्यावर आजतरी प्रेम करणार्‍या व्यक्तिशी लग्न करणार की तिच्या पूर्वेतिहासात जाऊन तिला होकार/नकार देणार.... सखारामजी, नव्या पिढिचे पाईक या नात्याने तुमच्या प्रतिसादाची वाट पहात आहोत..... २० वर्षांपूर्वीच लग्न करून सगळे करून भागलेला, डांबिसकाका :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
स
सखाराम_गटणे™ गुरुवार, 10/02/2008 - 08:27 नवीन
आता हल्लीच्या मुला-मुलींपुढे प्रश्न हा आहे की आपल्याविषयी काळजी करणार्‍या, आपल्यावर आजतरी प्रेम करणार्‍या व्यक्तिशी लग्न करणार की तिच्या पूर्वेतिहासात जाऊन तिला होकार/नकार देणार.... मी खरे उत्तर देतो, उगाच तोंडदेखले नको. दोन्हीही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. पुर्वे इतिहास पण तितकाच म्हत्वाचा आहे. इतिहास हा माणसाच्या भविष्याचा आरसा असतो. (प्र. वाळींबे), प्रेम हे महत्वाचे आहेच आणि त्या बरोबर चारीत्र ही महत्वाचे आहे. जर मी बाहेर गुण उधळत असेन तर मुलीने गुण उधळले असतील तर तीला बोलण्याचा मला हक्क नाही. हे मी मानतो. लग्नापुर्वी संबंध ही गोष्ट दुर्लक्ष करण्याजोगी नाही, हे ही तितकेच खरे. ----- वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस गुरुवार, 10/02/2008 - 19:45 नवीन
दोन्हीही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. पुर्वे इतिहास पण तितकाच म्हत्वाचा आहे. इतिहास हा माणसाच्या भविष्याचा आरसा असतो. (प्र. वाळींबे), प्रेम हे महत्वाचे आहेच आणि त्या बरोबर चारीत्र ही महत्वाचे आहे. जर मी बाहेर गुण उधळत असेन तर मुलीने गुण उधळले असतील तर तीला बोलण्याचा मला हक्क नाही. हे मी मानतो. लग्नापुर्वी संबंध ही गोष्ट दुर्लक्ष करण्याजोगी नाही, हे ही तितकेच खरे. तुझ्या उत्तरावरून मला असे समजते की तुला म्हणायचे आहे की ही केस्-बाय-केस आणि तारतम्याने विचार करायची गोष्ट आहे. १००% सहमत! गुड जॉब!! आयुष्य हे कधी ब्लॅक एन्ड व्हाईट नसतं, त्यात ग्रे रंगाच्या अनेक शेडस असतात. अभिनिवेशाला बळी पडूनकोणतीही एकच बाजू कवटाळून न बसता प्रत्येक बाबीचा सर्वांगिण विचार करून मत बनवणे हेच शहाणपणाचं असतं रे! :) अति सर्वत्र वर्जावे, हट्टनिग्रही न पडावे, प्रसंग पाहोनी वर्तावे, विवेकी पुरुषे -समर्थ रामदास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
स
सखाराम_गटणे™ Fri, 10/03/2008 - 05:25 नवीन
मत समजावुन घेतल्याबद्दल आभारी आहे. ----- वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
अ
अवलिया गुरुवार, 10/02/2008 - 09:52 नवीन
वर निर्देशित केलेल्या कोणत्याही कारणाने असोत, विवाहपूर्व संबंध अस्तित्वात असणार हि शक्यता आता नाकारता येत नाही. इतकेच काय विवाहपश्चात बाह्य संबंध ही सुद्धा आता सामान्य गोष्ट बनत जाणार आहेच. तुम्ही फक्त स्वतःवर नियंत्रण ठेवु शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
आ
आनंदयात्री गुरुवार, 10/02/2008 - 07:40 नवीन
जियो पेठकर काका जियो. अत्यंत सुंदर प्रतिसाद दिला आहे तुम्ही !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
म
मदनबाण गुरुवार, 10/02/2008 - 07:49 नवीन
काकाश्रींशी १००% सहमत... मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
व
वाटाड्या... गुरुवार, 10/02/2008 - 18:24 नवीन
पेठकर काकांशी १००% सहमत. ज्या लोकांनी असल्या प्रकाराला (व्यभिचाराला) एक प्रकारे मान्यता दिली आहे त्यांना एक प्रश्न : पुर्वी ज्या बायकांनी यवनांच्या अत्याचारापासुन आपल्या शील रक्षणासाठी प्राण दिले त्या बायकांची तुमच्या लेखी काय किमत आहे? अवांतर : जर कोणी म्हणेल की त्या बायका (ज्यात कुमारीका ही होत्या) मुर्ख होत्या तर आपले तोंड गप आणि कोणी म्हणेल की त्या बरोबर होत्या तर मग अश्या मुल्यांच आपण समर्थन कसे करु शकतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 10/02/2008 - 19:05 नवीन
मुकुलराव, मला असं वाटतंय की तुम्ही दोन वेगवेगळ्या गोष्टींमधे गल्लत करताय. यवनांच्या अत्याचारांपासून स्वतःला वाचवण्यासाठी प्राण देणार्‍या बायका आणि स्वखुशीने शरीर संबंध ठेवणार्‍या यांत बराच फरक आहे. पहिल्या प्रकारात अत्याचार होते आणि दुसर्‍यात राजीखुशी, या मुलींच्या मनाविरुद्ध (बर्‍याचदा) गोष्टी घडत नाहीत. या मुलींवर उद्या कोणी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर त्याही पेटून उठतीलच ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...
व
वाटाड्या... गुरुवार, 10/02/2008 - 19:22 नवीन
मी फक्त नीतीमत्तेची गोष्ट करत होतो. नीतीमत्ता एकच..'त्या' गोष्टी फक्त लग्न झालेल्या जोडीदाराबरोबरच कराव्यात ही नीतीमत्ता...व्यक्तिस्वातंत्र्य मिळाले म्हणुन शेण खाण्याच्या प्रवृत्ती बद्दल इथे कोणाच्या तरी प्रतिसादात मी काहीशी सहमती बघत आहे अथवा अश्या गोष्टींना सहमती मिळत आहे ज्या लग्नाशिवाय करायला प्रोत्साहन देते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
स
सखाराम_गटणे™ Fri, 10/03/2008 - 06:18 नवीन
मुकुल, मला वाटते की तुला असे म्हणायचे आहे. ज्या स्त्रीया आपला संबध नवर्‍याशिवाय दुसर्‍या कोणाशी येउ नये म्हणुन प्राणत्याग करतात आणि आज कालच्या स्त्रीयांना ह्या नवर्‍याशिवाय दुसर्‍या कोणीशी संबध म्हणजे काहीच वाटत नाही. आणि त्या गोष्टी व्यक्तिस्वातंत्र्य च्या नावाखाली चालतात. म्हणजे पुर्वीच्या जोहार करण्यार्‍या स्त्रीया मुर्खे होत्या काय? नीतीमत्त्ता ही चुकीची भ्रामक कल्पना आहे काय? ----- वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 10/03/2008 - 06:39 नवीन
व्यक्तिस्वातंत्र्य मिळाले म्हणुन शेण खाण्याच्या प्रवृत्ती बद्दल इथे कोणाच्या तरी प्रतिसादात मी काहीशी सहमती बघत आहे अथवा अश्या गोष्टींना सहमती मिळत आहे ज्या लग्नाशिवाय करायला प्रोत्साहन देते... लग्न न करता आयुष्यभर एकत्र रहाणारी, खर्‍या अर्थाने सहजीवन जगणारीही जोडपी असतीलच ना? त्यांच्यावर असं बोलण्यामुळे अन्याय होतो असं मला वाटतं. एका कागदावर सही केली किंवा गळ्यात दोरा बांधला की झालं का सगळं? मी स्वतः या गोष्टीचा गेले अनेक महिने विचार करत आहे. माझं वैयक्तिक मत असं आहे की एका कागदावर सही केल्यामुळे मला काहीही फरक पडला नाही. बॉयफ्रेंडचा नवरा झाला आणि गर्लफ्रेंडची बायको; पण आमची एकमेकांबद्दल असलेली मतं, आमच्या एकमेकांबद्दलच्या भावना, आमची कमिटमेंट फक्त त्या सह्या आणि कागदामुळे बदलल्या नाहीत. मान्य आहे की अशी उदाहरणं सामान्यतः दिसत नाहीत, पण मला तुमचं विधान सरसकट वाटलं म्हणून फक्त! बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...
स
सुचेल तसं गुरुवार, 10/02/2008 - 19:22 नवीन
अतिशय सुंदर प्रतिसाद (नेहेमीप्रमाणे).. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
व
वेताळ गुरुवार, 10/02/2008 - 07:10 नवीन
खर तर गरबा हे एक निमित्तमात्र आहे. गणपती उत्सवात हे घडत नाही का? घडते आणि ते मी पाहिले आहे. त्यामुळे शरिरसुखासाठी आसुसलेल्या जोडप्याना कोणताही सण चालतो.बाकी तीन तीन दिवस चालणारया लग्नात देखिल तुम्हाला हेच बघायला मिळेल.उत्सव किंवा समारंभ आला कि उत्साह येणार. आणि त्यातुन उन्माद येणार. "बाई" ही उपभोग्य वस्तु ठरविली गेल्यानन्तर संस्कृती उरतेच कोठे. असहमत....इथे जे काही घडते ते दोन्ही बाजुला आपण काय करणार आहोत, हे माहित असताना होत असते. किंबहुना मुलीच पुढाकार घेतात.कधीतरी गरबा किंवा गणपती मध्ये रात्री बाहेर पडा ,लक्षात येइल. आजकाल मुलीचे ऑर्कुट प्रोफाइल बघा,त्याना इम्रान हशबी आवडतो.चॉईस बदलत आहे राव. आपण आपल्या संस्कृती चा टेंभा मिरवायची काही गरज पण नाही. मुळात शरिरसबंध हे अतिशय वाईट असतात हे मुलामुलीच्या मनात लहान पणा पासुन बिंबवले जाते. हीच गोष्ट त्याच्यातील उत्सुकता वाढवण्यास कारणीभुत ठरते. त्यातुन हे चोरटे सबंध निर्माण होतात.हिच जर माहिती त्याना योग्य वयात मिळाली तर शरिरसबंधाचे फायदे तोटे लक्षात येतील.आदिवासीच्या पाड्या मध्ये तरुण मुलामुलींना राहण्याची वेगळी व्यवस्था असते.वयात आल्यावर त्याना आपसुक च सगळ्या गोष्टीची माहिती मिळते.परंतु आपण आपल्याला पंरपरा ,रुढी ह्याच्या बंधनात जखडुन ठेवले आहे.लग्नासाठी कुमारिका मुलगी हवी. बाकि मुलाने कोठेही शेण खाल्ले तरी चालते. ह्यातुन आता बाहेर पडले पाहिजे.आपण आपल्या विचारसरणी त बदलत्या काळाप्रमाणे बद्दल घडवले पाहिजे. ह्याचा अर्थ मुक्तस्वैराचार करावा असा नाही. बाकी कंडोम व आयपील चा वापर वाढला हि चांगली गोष्ट आहे का नाही हे अजुन उमगले नाही. वेताळ
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 10/03/2008 - 06:02 नवीन
गणपती उत्सवात हे घडत नाही का? शक्यतो गणपती उत्सवात असे घडत नसावे. कारण माझ्या माहीतीनुसार गणपती उत्सवात बुधवरात जाणार्‍या लोकांची संख्या जास्त असते त्यामुळे निरोधाचा खप वाढत असेल पण गर्भनिरोधक गोळ्यांचा खप देखील वाढतो का? जाणकारानी प्रकाश टाकावा. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
व
विनायक प्रभू गुरुवार, 10/02/2008 - 07:19 नवीन
http://vipravani.wordpress.com/ वापर वाढला आहे हे नक्की. आजही कंडोम नीट कसा वापरावा ह्याचे शास्त्र फक्त ३५% पुरुषांना माहित असते. आय पीलने गर्भपात होतो हा समज रूढ आहे. खरे तर आय पील ने गर्भ धारणा ट्ळते.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस गुरुवार, 10/02/2008 - 07:30 नवीन
आजही कंडोम नीट कसा वापरावा ह्याचे शास्त्र फक्त ३५% पुरुषांना माहित असते. कर्म आमचं! दुसरं काय!!! तुमच्यापुढे खूप काम बाकी आहे, विनायकरावजी!! या सगळ्या ६५% अडाण्यांना शहाणं करायचं!!!!:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
स
सखाराम_गटणे™ गुरुवार, 10/02/2008 - 08:21 नवीन
>>आजही कंडोम नीट कसा वापरावा ह्याचे शास्त्र फक्त ३५% पुरुषांना माहित असते. सहमत, आम्हाला ११ वीलाच हे शिकवले होते. ----- वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 10/02/2008 - 20:57 नवीन
गटणे साहेब, आपली शाळा / आपले कॉलेज कुठले? ;) बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
ट
टारझन गुरुवार, 10/02/2008 - 21:02 नवीन
ऐकावं ते नवलंच .. ११वीला गर्भनिरोधक साधनांचं प्रशिक्षण ? प्रॅक्टीकल पण होतं काय रे बाबा ? गटण्या असले बाँब टाकून आम्हाला पेचात नको टाकत जाउस लेका.... बिपीनभौ .. जरा पत्ता काढा हो गटणेच्या ११वीच्या शाळेचा ... ज्या ६५% लोकांना अजुन कंडोम कसे वापरावेत हे माहित नाही .. त्यांना उपयोग होइल :) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 10/03/2008 - 06:41 नवीन
तेही कॉलेजातूनच पण तसे काही प्रशिक्षण किंवा शिक्षण वगैरे दिले नव्हते कोणी. ज्ञानाच्या देवाणघेवाणीतूनच समजले होते. :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
सखाराम_गटणे™ Fri, 10/03/2008 - 07:14 नवीन
आम्हाला प्रात्याक्षिक दाखवले होते, अगदी मस्त, हवेचा बुडबुडा अडकुन काय त्रास होतो हे पण सागिंतले. ----- वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
व
विनायक प्रभू Fri, 10/03/2008 - 07:28 नवीन
http://vipravani.wordpress.com/ ज्ञानाची ही देवाणघेवाण सहसा उघड्याकडे गेले वागडे आणि रात्रभर कुड्कुडले असे अस्ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
व
विनायक प्रभू Fri, 10/03/2008 - 09:24 नवीन
http://vipravani.wordpress.com/ ज्याला बुड्बुड्याची शिश्टीम कळली., तो सर्व बुड्बुड्यापासुन मुक्त होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा