Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नोटबंदीचे अभंग

भ — भारी समर्थ, Fri, 12/30/2016 - 15:37
एटीयमचिये द्वारी। उभा क्षणभरी। तेणे पाचशेच्या चारी। मिळतीया।। कार्ड चार हाती। स्लॉटमधे घासी। निकडीची रोकड मग। निघतीया।। रांगेत बहु जन। स्वतःचेच धन। घामेजलेले तन। ताटकळ्या।। ब्यांकेतही तेच। होई खेचाखेच। शिव्या कचाकच। निघतीया।। ऐसे शूराभिमानी। न देखिले कोणी। तयांसी देशाभिमानी। म्हणतीया।। एकच दिला धक्का। गुर्जर तो पक्का। 'मित्रों' ऐसी हाक। मारतोया।। सुका म्हणे बास। किती रोखावे श्वास। काय ३१ डिसेंबरास। करतोया??? - भारी समर्थ!

प्रतिक्रिया द्या
4619 वाचन

💬 प्रतिसाद (11)
म
मदनबाण Fri, 12/30/2016 - 15:41 नवीन
भारी ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- twenty one pilots: Heathens (from Suicide Squad: The Album) [OFFICIAL VIDEO]
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 12/30/2016 - 19:33 नवीन
महागाई मेली | जरा हटली नाही | काढे शब्द वावगा तो | देशद्रोही || कार्डाचे चार्जेस | सोसा तुमचे तुम्ही | आम्ही खेळू लॉटरी | नशीबाशी || बारासहस्त्र कोटी | छापण्यात गेले | छापे घालून केली | घंटाकमाई || नव्या नोटांवर | पुन्हा तोच खेळ | भ्रष्टाचार जोमानं | बोकाळला || मेले किती तरी | जरा खंत नाही | याला म्हणती छाती | छप्पनइंच ||
  • Log in or register to post comments
च
चिगो Mon, 01/02/2017 - 12:53 नवीन
क्या बात हैं, सर.. व्वा. जबरा.. अभंग भारी जमलेयत, भारी समर्थ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ए
एस Sat, 12/31/2016 - 06:00 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Sat, 12/31/2016 - 07:18 नवीन
देशद्रोही कुठले. :)
  • Log in or register to post comments
र
रातराणी Sat, 12/31/2016 - 09:42 नवीन
भारीच आहेत!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 12/31/2016 - 09:46 नवीन
ह्या ह्या ह्या! =))
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 12/31/2016 - 09:50 नवीन
तेणे पाचशेच्या चारी। मिळतीया।।
चुकीची माहिती पसरवू नका. पाचशेच्या चार नोटा कुठल्याच एटीएम मध्ये मिळत नाहीत. एकच दोन हजाराची नोट मिळते.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 01/03/2017 - 05:26 नवीन
यांचे अभंगाच्या पोथ्या इंद्रायणीत बुडवून टाका म्हणून धर्मपीठाचे फर्मान येईल. तरी आम्ही टाळकरी टाळ कुटच राहणार..!!
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 01/03/2017 - 05:28 नवीन
"सुका म्हणे" विशेष आवडले. सुका कोण आहे ?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 01/03/2017 - 06:13 नवीन
एकतीसच्या संध्याकाळी| निघाला फुसका बार| भक्त बसले अपेक्षा फार | लावूनिया||
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा