Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्मरणातल्या बाप्पा

व — वृंदा१, Sat, 12/31/2016 - 09:44
बाप्पाला आणायचात तुम्ही भक्तीनं अन् हौसेनं तुम्ही देखणे आणि बाप्पाही आम्ही पळायचो मस्तीनं आताच्यासारखी तेंव्हा सजावट नसायची खूप जुन्याच मोत्याच्या माळेने बाप्पांचं खुलायचं रूप एक रंगीत लाईटचा दिवा तुम्ही सांभाळून लावलेला बाप्पांपुरताच कोनाडा डिस्टेम्परने सजलेला मोठमोठ्यानं म्हणायची तुमच्यासोबत आरती शब्द विसरायचा एखादा नजर जायची खालती भूलवायचा आम्हाला मोदकांचा ढीग घरोघरच्या प्रसादाची लावायची रीघ जुनाच कागदाचा पंखा आणि टिकल्यांचे तोरण त्या रत्नांच्या क्षणांचे सतत होते स्मरण दहा दिवस जायचे कसे भुर्रकन उडून विसर्जनाच्या दिवशी घ्यायचे गुपचूप रडून बाप्पांचा निरोप घ्यायला मुद्दाम लावायचा वेळ कळायचा नाही ना तेंव्हा सुखदुःखाचा अजब खेळ तुमच्या गोऱ्यापान कांतीवर मुकटा तेजानं शोभायचा बाप्पासुद्धा हसतमुखानं फक्त तुम्हाला न्याहाळायचा स्मरणातल्या बाप्पा आता एकच मागणं आमच्या दादांना सतत सुखी ठेवणं ......

प्रतिक्रिया द्या
727 वाचन

💬 प्रतिसाद (1)
प
पद्मावति Sat, 12/31/2016 - 10:42 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा