रोकडरहित व्यवहारांसाठी भीम अॅप कसे वापरावे याची मराठीत माहिती.
कॅशलेस अर्थात रोकडरहित व्यवहार अधिक सहज व्हावेत या दृष्टीने कालच (३० डिसें २०१६) माननीय पंतप्रधानांनी "भीम" अॅपची घोषणा केली.
यूपिआय अॅपचीच ही सुधारित आवृत्ती आहे आणि वापरायला अधिक सोपं आहे. पेटीएम प्रमाणे मोबईल नंबर वापरून पैसे पाठवणे, क्यूआर कोड वापरून समोरच्याचा नंबर घेणे अशा सुविधा यात दिल्या आहेत.माझ्या मोबाईल वर अॅंड्रॉईड ६.०.१ आहे आणि त्यात ते यशस्वीरित्या इन्स्टॉल झालं आणि काम करत आहे.
हे भीम अॅप कसे वापरावे याची सोपी प्रक्रिया समजून घ्या मराठीतून. मी लिहिलेल्या या सचित्र ब्लॉगपोस्ट मधून
http://kaushiklele-learnmarathi.blogspot.in/p/marathi-instructions-to-use-bhim-app.html
तुम्ही वाचा; इतरांनाही सांगा, नक्की शेअर करा. आणि ब्लॉगपोस्ट कशी वाटली तेही सांगा.
धन्यवाद,
कौशिक लेले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की आँखों में कुछ महके हुए से राज़ हैं आप से भी खूबसुरत आपके अंदाज हैं... :) :- Ghar (1978)