आईवडिलांबद्दल पुस्तके लिहिणे – अधिकचा मजकूर
आपण सगळेच जाणतो की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या आईवडिलांची भूमिका फार फार महत्वाची असते. आयुष्य चालत राहतं,काळ वाहत राहतो आणि एक दिवस आपल्याला आई किंवा वडिलांचा कायमचा वियोग सहन करावा लागतो. शेवटी प्रत्येकाला एक दिवस जायचेच आहे हे माहीत असूनही हे दुःख सहन करण्याच्या पलीकडचे असते.त्यांच्या जाण्याने आपण आत आत कुठेतरी पोकळ होऊन जातो.आपल्याजवळ त्यांच्या लाखो आठवणी असतात.आपल्याला असं वाटतं की हे आठवणींचं भांडार आपल्यानंतरही कायम राहावं.आपली आई कशी होती किंवा वडील कसे होते हे पुढच्या पिढ्यांनाही कळावं.मी स्वतःही यातून गेले आहे,जात आहे.मलाही वाटतं की आपले प्रियजन फक्त फोटोत न राहता त्यांच्यातले गुण,आपल्यासाठी त्यांनी केलेले श्रम,लाखो लाखो आठवणी शब्दबद्ध व्हाव्यात.आपले मत अपेक्षित आहे.मला हे काम प्रामाणिकपणे आणि मनापासून करण्याची इच्छा आहे.अर्थात हे काम व्यावसायिक तत्वावर करणार आहे.कारण हे फुलटाईम काम आहे.आपले मत अपेक्षित आहे.मी जरी हे काम व्यवसाय म्हणून करणार असले तरी दर्जा,रिसर्च अशा कोणत्याही बाबतीत कधीही कमी पडणार नाही.
यात थोडीशी माहिती जोडायला मला आवडेल. अर्थातच प्रत्येकाच्या वागण्याचा,जगण्याचा पाया मानवी भावना हाच असतो. असेही म्हटले जाते की आपल्या वागणुकीचा पाया आपल्या बालपणात दडलेला असतो. आपल्यावर आपल्या मित्रमंडळीचा प्रभाव असतो,शेजारीपाजारी राहणाऱ्यांचा असतो, आसपासच्या समाजाचा असतोच असतो पण मुख्य प्रभाव असतो आपल्या आईवडिलांचा. तेच आपल्या जीवनाचे मुख्य शिल्पकार असतात. माझे स्वतःचे उदाहरण द्यायचे तर माझ्या वडिलांनी माझ्यात वाचनाची सवय अगदी बालपणापासून रुजवली,वाढवली. आजही वाचन हाच माझा दुसरा श्वास आहे, असे मी मानते. शब्द मी जाणीवपूर्वक वापरते आहे पण मी खरोखरी असे मानते की माझ्यात जे काही चांगले गुण आहेत ते माझ्या आईमुळे आहेत, वडिलांनी तर मला वाचनाची सवय लावून मला जन्मभराची अनमोल भेट दिली आहे. माझ्यात जे दोष आहेत ते माझे माझे आहेत असे मी मानते. शेवटी माणूस आपल्या मनाला आणि सद्सद्विवेकबुद्धीला नजरेआड करून नीट जगू शकत नाही. हेच एक कारण आहे की मला हे काम करायचे आहे. पूर्णपणे मनापासून आणि माझे सर्व जीवनकौशल्य वापरून.वाचल्याबद्दल धन्यवाद.
💬 प्रतिसाद
(9)
म
मोदक
Tue, 01/03/2017 - 03:43
नवीन
"मुलांनी लिहिलेल्या आई वडिलांच्या आठवणी" अशा थीमची पुस्तके वाचून काढा, तुम्हाला नक्की काय लिहायचे आहे आणि कसे लिहायचे आहे याचा तुमचा असा वेगळा फॉरमॅट नक्की तयार होईल
१) सांगे वडिलांची कीर्ती - वपु
२) आशक मस्त फकीर - वीणा देव (गोनिदा)
३) बापलेकी - (बहुदा) ह. मो. मराठे
४) डॉक्टर कणेकरांचा मुलगा - शिरीष कणेकर
५) वपु - स्वाती चांदोरकर
६) ग्राहकहितचे दिवाळी अंक - सन 2004 (आई), सन 2005 (वडील)
अशी अनेक पुस्तके आहेत.
- Log in or register to post comments
प
पुंबा
Tue, 01/03/2017 - 05:34
नवीन
चीपर बाय द डझनः या जॉनरचे सर्वाधीक सुंदर पुस्तक. 'सांगे वडीलांची कीर्ती, तो एक मुर्ख' ह्याला अपवाद ठरणारे नितांतसुंदर पुस्तक.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Tue, 01/03/2017 - 05:10
नवीन
तुम्हाला "तुमच्या" आई वडीलांविषयी लिहायचे आहे ना? मग लिहा ना.. त्यासाठी दोनदा धागा काढुन इथे नक्की काय चर्चा अपेक्षित आहे तुम्हाला? शिवाय मी तर असंही म्हणेन की फक्त आठवणी शब्दबद्ध करणे इतकाच हेतु असेल तर ब्लॉगवर किंवा मिपासारख्या संकेतस्थळवर लेखमालाही लिहु शकता. त्याची एखादी सुंदर प्रिंट घेऊन तुमच्यापुरतं पुस्तकही बनवु शकता. तुमच्या आई वडीलांचे फोटो त्यात लावुन चांगला अल्बम / पुस्तक तयार होईल.
पण..
मी जरी हे काम व्यवसाय म्हणून करणार असले तरी दर्जा,रिसर्च अशा कोणत्याही बाबतीत कधीही कमी पडणार नाही.
ह्या वाक्याने तर मी फार कन्फ्युज झालेय. तुम्ही "इतरांच्या" आईवडीलांच्या आठवणी "व्यवसाय" म्हणुन शब्दबद्ध करणार आहात का? तसं असेल तर हे कुणाला समजलय इथे असं वाटत नाही. तुम्ही सुद्धा ते स्पष्ट्पणे मांडलेलं नाही. आणि तसं नसेल तर मग स्वतःच्या आईवडीलांविषयी लिहीणे व्यवसाय कसा असेल?
आणि अजुन एक..
"जरी" व्यवसाय म्हणुन करणार असले "तरी" दर्जात कमी पडणार नाही म्हणजे? जर व्यवसाय म्हणुन करणार असाल तर दर्जात कमी पडायलाच नाही पाहिजे ना?
माफ करा, पण मला ह्या धाग्याचा हेतुच नीटसा कळलेला नाही.
- Log in or register to post comments
म
मोदक
Tue, 01/03/2017 - 08:04
नवीन
+१
मिपाकरांचे नक्की कशासंदर्भात मत अपेक्षित आहे ते स्वच्छ लिहा. मगच नेमकी मदत / सल्ला मिळू शकेल.
- Log in or register to post comments
म
महासंग्राम
Wed, 01/18/2017 - 11:00
नवीन
आगगग,तुफान बॅटिंग
- Log in or register to post comments
व
वृंदा१
Tue, 01/03/2017 - 09:12
नवीन
एक लेखिका म्हणून इतरांच्या आईवडील किंवा प्रियजनांच्या आठवणी लिहून त्यावर पुस्तक बनवणे हा नवीन व्यवसाय एक आव्हान म्हणून करणार आहे.वर उल्लेख केलेली पुस्तके वाचलेली आहेत.या नवीन उपक्रमाबाबत मार्गदर्शन हवे आहे.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Tue, 01/03/2017 - 14:29
नवीन
हो, मग तसं कळत नाहीये की तुम्हाला इतरांच्या आईवडीलांवर पुस्तक लिहिण्याचा व्यवसाय करायचा आहे.
ते आधी स्पष्ट लिहा. आणि त्यात नक्की मार्गदर्शन म्हणजे नेमके प्रश्न काय आहेत हे ही स्पष्ट करा. लोक अंदाजानेच लिहीत आहेत, त्याचा काय उपयोग?
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Tue, 01/03/2017 - 12:09
नवीन
पुस्तकाचे नेमके स्वरुप कसे असणार आहे ?
एक खूप सार्या आठवणींचा संग्रह की विषयानुरुप उहापोह ?
मुळात पुस्तकाचे उद्दिष्ट काय ? कोणता वाचकवर्ग तुमच्या मनात आहे ? पालक की मुले ?
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 01/18/2017 - 14:06
नवीन
ह्या सगळ्या लिखाणाने काय साध्य होईल?
- Log in or register to post comments