हॉटेल (रेस्टॉरंट) मधली टीप आणि सर्व्हिस चार्ज
हॉटेल (रेस्टॉरंट) मधला सर्व्हिस चार्ज हा एक नवीन झोल का बर सुरु झालाय ??
रेस्टॉरंट चालकांनी मेनू कार्ड मधले दर सर्वकरसमावेशक करून जाहीर करणे आणि ग्राहकांनी खाल्लेल्या पदार्थांच्या मेनू कार्ड वरील दराबरोबर एकूण बेरीज जुळते आहे हे बघून बिलावर एक पै सुद्धा टीप न देता तिथून बाहेर पडणे
हे इतके सोपे करता येणार नाही का ????
💬 प्रतिसाद
(4)
प
पैसा
Wed, 01/04/2017 - 04:50
नवीन
काय झालं?
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Wed, 01/04/2017 - 06:19
नवीन
खरे तर असे वेगळे चार्ज लावणेच योग्य असायला हवे.
म्हणजे मी एक डोसा खाला आणि त्याचा दर ५० रु अधिक टॅक्स असा असेल तर हॉटेलने तो ४० रुपये अधिक सर्विस चार्ज १० रुपये असा (उदाहरणार्थ) लावला पाहिजे. त्यानंतर ४० रुपयांवर व्हॅट आणि १० रुपयांवर सर्विस टॅक्स लावला पाहिजे. सध्या ५० रुपयांवर दोन्ही टॅक्स लावले जात आहेत.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Wed, 01/04/2017 - 06:21
नवीन
वस्तूच्या किंमतीवर व्हॅट आणि सर्विसच्या किंमतीवर सर्विस टॅक्स असे असायला हवे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 01/04/2017 - 07:34
नवीन
थत्ते सरांशी सहमत. वस्तू व सेवा यावर वेगवेगळा कर आकारला जातो तो तसाच ग्राहकांकडून वसूल केला गेला पाहिजे.
त्याचबरोबर आपले बील किती व कसे येणार याची पूर्ण पारदर्शक माहिती ग्राहकाला आगावू दिल्या गेली पाहिजे.
मॅक्डी, बर्गरकिन्ग, सबवे, इत्यादी ठिकाणी जे रेटकार्ड लावलेलं असते त्यात बेसरेट असतात, खरे बील वाढवून येते. असा प्रकारही चुकीचा आहे.
- Log in or register to post comments