दगड!
चित्र श्री संदीप डांगे यांजकडून साभार
ब्लॉग दुवा
रागाची ती उचल काय, दगड!
विचारांची मजल काय, दगड!
जात पात वजा भाग गणित
गणिताची उकल काय, दगड!
अभेद्य त्यांच्या आयुष्याची शिल्पं
पुतळे तोडून तुटंल काय, दगड!
देऊळ म्हणून आत गेलो बघत
गर्दीपुढे अचल काय, दगड!
बळावलेला ज्वर आहे, जबर
औषधानं निघंल काय, दगड!
तोड-फोड टीका निषेध कहर
सरतेशेवटी सफल काय, दगड!
नीट बघा, कळणार नाही फरक
हात, बाण, कमळ काय, दगड!
उद्या पुन्हा देतीलच ते वचन
निर्लज्जांचं नवल काय, दगड!
आमंत्रणं, आरक्षणं सकल
उरलेल्यांची दखल काय, दगड!
पोखरतील विकून खातील असंच
देशामध्ये उरंल काय, दगड!
चिडचिडच व्हायची लिहून अखेर,
कविता काय, गझल काय, दगड!
- अपूर्व ओक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अम्बरसरिया..मुंडयावे कचिया कलियाँ ना तोड़, तेरे माँ ने बोले हैं मुझे तीखे से बोल... :- Fukrey