Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हे राजा आम्ही असे चुकत तर नाहीयोत नं

अ
अत्रन्गि पाउस
Tue, 01/10/2017 - 11:07
🗣 1 प्रतिसाद
हे राजन अत्यंत गांजलेले आम्ही मोठ्या विश्वासाने तुझ्याकडे बघतोय ...सतत आणि नेहेमीच तुझ्या प्रत्येक कृती कडे मोठ्या कौतुकाने बघतोय त्याचा काहीतरी सकारात्मक अर्थ लावतोय ....प्रामाणिकपणे .. तुझ्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतोय ...डोळे झाकून तू सज्जनांच रक्षण करशील त्याचं दु:ख नाहीसे नाही तरी निदान कमी करशील अशी आशा लावलीये आम्ही ...ती वेडी आशा तर नाहीयेना राजन ? वेगवेगळ्या सुख, सुविधा सवलतीनचा त्याग म्हणजे काहीतरी उदात्त अशी स्वातंत्र्य पूर्व काळातील मानसिकता आम्ही पण मोठ्या उत्साहाने अंगिकारली ...सगळ्यांनी नाही पण बऱ्याच जणांनी वेगवेगळे तज्ञ उलट सुलट बोलतात तुझ्या प्रत्येक गोष्टींवर ...आम्ही खूप दुर्लक्ष करतो त्यांच्याकडे ...वाटत कि अस्सल देशप्रेम असच असत, निस्वार्थ राज्यकर्ता असाच असतो हे कदाचित आमच्या सारखे त्यांना हि ठाऊक नाही ...आम्हाला ठाऊक आहे कि ज्या गुरुकुलातून तू आलास तिथे एकापेक्षा एक थोर लोकांनी ह्या देशासाठी खूप काही केले ...सर्वस्व अर्पून, पिढ्यान पिढ्या आणि निरलसपणे पण तरीही ...हे बोलवत नाही रे ...पण काय कोण जाणे, अलीकडे तुझे हितशत्रू, जे आम्हालाही आमचे शत्रूच वाटतात नव्हे ते तसे आहेतच, ते जे बोलतात ते ऐकावस वाटू लागलंय खरंच तू भ्रष्टाचारी लोकांना शिक्षा करणार आहेस नं ? गुन्हेगारांना धडा शिकवणार आहेस नं ? देशाच्या शत्रूला अद्दल घडवणार आहेस नं ? आमच्याकडून घेतलेल्या जास्तीच्या करांचा सत्कारणी उपयोग होणारे नं ? हे राजन कारण वर म्हटल्या प्रमाणे अत्यंत गांजलेले आम्ही मोठ्या विश्वासाने तुझ्याकडे बघतोय ...सतत आणि नेहेमीच तुझ्या प्रत्येक कृती कडे मोठ्या कौतुकाने बघतोय त्याचा काहीतरी सकारात्मक अर्थ लावतोय ....प्रामाणिकपणे .. हे राजा आम्ही असे करून चुकत तर नाहीयोत नं कारण जर तुही तुझ्या पूर्वसुरींच्या दिशेने गेलास तर मात्र आम्हाला आणि ह्या देशाला पुढची ५०० वर्षे कुणीही त्राता नाही हे नक्की ...
वर्गीकरण
काथ्याकुट

प्रतिक्रिया द्या
1320 वाचन

💬 प्रतिसाद (1)
म
मनिमौ Tue, 01/10/2017 - 15:07 नवीन
आवडेश
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा