बोलू नकोस काही
बोलू नकोस काही
मज कळतात भावना त्या
नको आठवू पुन्हा
मज स्मरतात यातना त्या
तू शब्द होवूनी यावे
मजसंगे बोलायाला
मी स्तब्ध उभा केव्हाचा
तूजसंगे चालायाला
तू गीत होवूनी यावे
त्या माझ्या वाटेवरती
मी आतूर उभा केव्हाचा
अन काटे अवतीभवती
मी झिजलो आहे येथे
भिजण्याच्या त्या आशेने
मी रडलो आहे येथे
विरहाच्या त्या भाषेने
येणा-या झुळकेपाठी
मी असाच का मग फसतो
पाहूनी माझी प्रतिमा
मज भास तूझा हा असतो
आता उगाच क्षणभर
मी डोळे मीटूनी बसतो
ह्रदय खोलूनी माझे
मी तूला भेटूनी हसतो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Iuliana Beregoi - Vina mea (Official Video 4K)