निळावन्ती
मग निळ्या दरीतुन हाक
येताच काफिला उठला
नक्षत्रजडित रात्रीला
हु॑दका अनावर फुटला
त्या निळ्या दरीच्या गर्भी
घननीळ गूढसे काही
नि:शब्द काफिला भोगी
ती पिठुर रानभुल देही
काफिल्यात विरघळताना
गारूड निळेसे पडले
की स्वप्न निळावन्तीचे
मी माझ्यावर पा॑घरले
💬 प्रतिसाद
(12)
य
यशोधरा
Wed, 01/11/2017 - 10:53
नवीन
वा!
गारूड निळेसे पडले > पडले ऐवजी झाले म्हटले तर?
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Wed, 01/11/2017 - 18:54
नवीन
कविता आवडली
Sandy
- Log in or register to post comments
च
चाणक्य
गुरुवार, 01/12/2017 - 04:58
नवीन
कळली नाही. रात्र सरून सकाळ होण्याचे वर्णन आहे काय ?
- Log in or register to post comments
द
देशप्रेमी
गुरुवार, 01/12/2017 - 13:20
नवीन
उत्कृष्ट रचना ! आवडली !
- Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर
गुरुवार, 01/12/2017 - 17:55
नवीन
छानच आहे कविता !!
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Fri, 01/13/2017 - 10:29
नवीन
"चांदणे शिंपित जाशी" मधे ही निळावंति भेटली होती. त्या नंतर बर्याच दिवसांनी तिच्याशी गाठ पडतीय.
आवडली तुमची निळावंती.
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Fri, 01/13/2017 - 11:24
नवीन
पैजारबुवा,
राजा बढ्यान्ची चा॑दण॑ शि॑पत जाणारी निळावन्ती मेघडम्बरीत अवगुण्ठित आहे. तिच॑ "मेघांविण मोकळे सौंदर्य" पाहाण्यासाठीची विराट धडपड चालू आहे!
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Sat, 01/14/2017 - 07:07
नवीन
दोघींची नावे सारखी आहेत इतकेच...
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Sat, 01/14/2017 - 07:52
नवीन
खूप छान! आवडली कविता!
- Log in or register to post comments
म
माहितगार
Wed, 02/01/2017 - 05:32
नवीन
कवितेची गुढता अद्याप पुरेशी उलगडली नाही; 'मनुष्य मनाची अनाकलनीय धाव' असे काही ? या कवितेतून कविला सुचवायचे आहे का ?
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 02/01/2017 - 06:23
नवीन
सुंदर रचना
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
गुरुवार, 02/02/2017 - 07:23
नवीन
आह..
आवडलीच !
- Log in or register to post comments