जनातलं, मनातलं

गप्पागोष्टी

Primary tabs

मी सध्या शारजाह (यु.ए.ई.) येथे असतो. इकडे कुणा मिसळप्रेमी॑ची भेट होइल का?

सखाराम_गटणे™

बिपीन कार्यकर्ते, कुदंन त्याच परीसरात आहेत बहुतेक.

-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची.
:)

गणपा

अरे वाह अजुन एक मिपा कर आला का आमच्यात.
मी दुबई/शारजाह ला असतो सध्या ऑफिसच्या कामा निमित्ताने आफ्रिका खंडात आहे, परत आल्यवर भेटुया, आणि मग तु, मी, बिपीन आणि कुदंन मिळुन एक यु.ए.ई. कट्टा करु.

( बिपीन भौ कुदंन भौ करयचा का यु.ए.ई. कट्टा ?)
-गणपा.

यूएई कट्याला मित्र देशातील (मस्कत) मिपाकर आमंत्रीत आहेत का? डिसेंबराती तारीख पकडलीत तर मी विचार करू शकेन. मला आवडेलही यायला.

काका.... नेकी और पूछ पूछ... कट्टा करायचाच. अशी परवानगी नका विचारू बॉ... मस्कत ला कोण आहेत मिपाकर? मी शारजाला आहे... किती दिवसांपासून मनात आहे पण इथे लोकसंख्याच नाही आपली तर काय करा म्हणून गप होतो. आपण ठरवू तारीख वगैरे...

बिपिन.

टारझन

बिप्पीन भौ .. सगळे मिळून एकदा थोडं पश्चिमेला या ना ... मस्त निसर्ग आहे .. आणि टस्कर पण आहे :)

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

बिप्पीन भौ .. सगळे मिळून एकदा थोडं पश्चिमेला या ना ... मस्त निसर्ग आहे .. आणि टस्कर पण आहे ...

आणि मोठ्या मनाची माणसं पण आहेत ना... ;)

आणि भौ त्या टस्करची आठवण नको काढूस... क्य चीज है यार वो टस्कर भी....

बिपिन.

टारझन

हो बिप्पीन भाव ..
अत्तिशय मोठ्ठ्या मनाची आणि अत्तिशय चांगल्या स्वभावाची गरीब माणसं आहेत. एक टस्कर और बस ... :)
मात्र तुमच्या साठी आम्ही टस्कर्स चे १०-१२ क्रेट्स आणून ठेउ :)

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

मी डिसेंबरात १० दिवसांकरीता येतो आहे मस्कतला. 'कट्याला' उत्सुक खूप मित्र भेटतील पण मिपाकर मी एकटाच आहे. (माझ्या माहीतीत तरी..).
माझी यायची तारीख ठरली की कळवितो. मस्त कट्टा-गिट्टा करू, फोटो-गिटो पाडू अन 'छ्छोट्टासा' वृत्तांत टाकू मिपावर.

विसोबा खेचर

घासूराव,

कृपया खरडफळ्याचा वापर केलात तर बरं होईल.. :)

तात्या.

घासू

नक्कीच तात्या. आपण फक्त आदेश करा.