Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(डोलकरांचे मनोगत)

ज — ज्ञानोबाचे पैजार, गुरुवार, 01/12/2017 - 07:12
(डोलकरांचे मनोगत) पेरणा अर्थातच शतदा भरला एक प्याला शेवटचा मी तृप्त पाहुनी खंबा हा टिचर्सचा रिचवले हजारो पेग मी उदरात सदैव राहो, दरवळ हा गोल्ड फ्लेकचा चखण्याची देउन आहुती पोटाला मी किंचित पिळले अलगद त्या लिंबाला नसता जेवण व्यर्थ मानले असते मज आहे कारण आज घरी जाण्याला धडपडत लटपटत रिक्षात पाय ठेवियले कुठे जायचे ते अडखळत सांगितले जरी घरी आल्यावर पडली उपेक्षा पदरी निळकंठा सम ते अमृत मानूनी प्राशीयले !! हे विजय मल्या थोर तुझे उपकार तू दिली आम्हाला रम व्हिस्की बीयर गायबला जरी तू बँकांना देउन तुरी सदैव राहिल तुझी आठवण यार मोह नसे अन्य कुठलाही देहाला सिंहाचा वाटा जरी असे पार्टीला, डोळे फिरले पाय जरी लटपटले, मी नाही घालले लोटांगण धरणीला !! - थोडा दानव

प्रतिक्रिया द्या
7718 वाचन

💬 प्रतिसाद (21)
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 01/12/2017 - 07:40 नवीन
टायटलपासून कविनामापर्यंत सगळंच भारी ! आता मोह नित्यनवे या देहाला, बाला बाराची यावी मम सेवेला, हे हृदय हर्षिले, शीश उचलले, वंदन करण्या त्या टंच गोरीला !!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 01/12/2017 - 07:49 नवीन
क्या बात है सर... जिओ.... बाराची बाला खरोखर सेवेला आली तर मात्र पंचाईत होईल. बार बालांबद्दल वाचताना "शीश" ऐवजी चुकून भलतेच काहितरी वाचले गेले आणि दांडी उडाली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 01/12/2017 - 07:59 नवीन
=)) क्विता जब्राट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
क
कवि मानव गुरुवार, 01/12/2017 - 10:46 नवीन
:)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 01/12/2017 - 07:55 नवीन
पैजारबुवा, जबरदस्त हो! खरा काजू काय, चलदूर अंघोळकर काय, थोडा दानव काय, एकसे बढकर एक, तोड नाही!
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 01/12/2017 - 09:21 नवीन
थोडा दानव :))
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 01/12/2017 - 10:29 नवीन
आशीर्वाद असू द्या माऊली! _/\_
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर गुरुवार, 01/12/2017 - 10:30 नवीन
प्रेरणा कवितेतील विचार काय, तुम्ही लिहिता काय, यामुळेच आपला देश आज जिथे आहे तिथे(च) आहे. लोक घ्यायचं ते घेत नाहीत, नाही ते घेतात. काय मेलं त्या बाटल्यांत जीव अडकतो काय माहीत.
  • Log in or register to post comments
क
कवि मानव गुरुवार, 01/12/2017 - 10:47 नवीन
अचूक बोललात _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
न
नीलमोहर गुरुवार, 01/12/2017 - 10:37 नवीन
सिरिअसली मी डोलकर, दर्याचा राजा वाल्या डोलकराचे मनोगत वाचायला आले होते :(
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 01/12/2017 - 11:24 नवीन
डोलकर म्हटल्यावर दर्याचा राजा आठवणं, हे पुणेकर नसल्याचं लक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
न
नीलमोहर Fri, 01/13/2017 - 10:19 नवीन
एकवेळ अज्ञानी असल्याचं लक्षण आहे म्हणा, पुणं किंवा पुणेकर काही नाही त्यात, डोलकर हे स्थळ सापेक्ष असतात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
क
कवि मानव गुरुवार, 01/12/2017 - 10:46 नवीन
:)))))))))))))))))))))))))))))))))) अल्टिमेट विडंबन.... सावरकर सुद्धा हसत असतील वरून :)))))
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 01/12/2017 - 12:10 नवीन
काय हे!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 01/12/2017 - 13:05 नवीन
पैजारबुवा रॉक्स....!!!
  • Log in or register to post comments
द
देशप्रेमी गुरुवार, 01/12/2017 - 13:16 नवीन
अगागागा..... अलौकिक आहे हो तुमची प्रतिभा ....... विडंबन सम्राटाला आमचा सलाम !!
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर गुरुवार, 01/12/2017 - 17:42 नवीन
अप्रतिम !! पैजारबुवांचा अजुन एक जबरदस्त षटकार !!
  • Log in or register to post comments
र
रातराणी गुरुवार, 01/12/2017 - 19:48 नवीन
हा हा! हे कसं काय राहून गेलं वाचायचं! तुफान जमलंय :)
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Fri, 01/13/2017 - 05:46 नवीन
मूळ "कविता" ट ला ट अन री ला री करून "जुळवलेली" , अन त्यावर "इड॑बन" . कमाल आहे सहनशक्तीची
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Fri, 01/13/2017 - 05:58 नवीन
धडपडत लटपटत रिक्षात पाय ठेवियले रिक्षात? एकट्यानंच का जायचं पण? असो, कविता जब्बरदस्त- नेहेमीप्रमाणेच. (हे नेहेमी का म्हणायचे? बाकरवडीपेक्षा सातत्य आहे आपल्या काव्याच्या चविष्टपणात)
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_कुलकर्णी Wed, 01/18/2017 - 06:49 नवीन
डोळे फिरले पाय जरी लटपटले, मी नाही घालले लोटांगण धरणीला !!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा