वधूपरिक्षेच्या पारंपारिक पद्धतीत सुधारणा शक्य आहे का?
वधूपरिक्षेच्या पारंपारिक पद्धतीत सुधारणा शक्य आहे का?
मुली बघण्याच्या पारंपारिक पद्धतीमध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत तसेच काही दोषसुद्धा आहेत
आपल्याला जर एखादी वस्तू विकायची असली तर आपण काय करतो? त्या वस्तूला सजवून मांडतो, त्यातले दोष झाकून असलेले अन नसलेले गुण वर्णन करून सांगतो. वधू वर परीक्षणाचही असंच आहे. ही निवडप्रक्रिया बऱ्याचअंशी दिखाव्यावर आधारीत असते. शिवाय पहायला गेल्यावर मुलगा अन मुलगी फक्त पाच ते दहा मिनीटं समोरासमोर असतात. अन तेवढ्या भेटीवरच लग्नाचे निर्णय घेतले जातात. एकमेकांचे स्वभाव कळण्याचा प्रश्नच नाही.
यावर एक उपाय असा सुचवला जातो की मुलीला एकदोन वेळा वैयक्तिकरित्या भेटावं आणि आपल्या अपेक्षा वगैरेंबाबत बोलावं. पण अशा भेटीतून खरा तो किंवा ती एकमेकांना कळतात का ही शंकाच आहे. कारण अर्थातच मुलीला(आई, वडील, बहीण, मैत्रीण इ.)घरून पढवून पाठवलेलं असतं की त्यांच्याशी असं असं बोल.चांगल स्थळ आहे जमलंच पाहिजे वगैरे वगैरे.
मला पडलेला गहन प्रश्न असा आहे की वरील परिस्थितीवर काही उपाय शक्य आहे का जेणेकरून ती त्याच्यासाठी योग्य आहे की नाही याची थोडी तरी चाचपणी करता येईल? मत,कल्पना, सल्ला, अनुभव ?
संक्षि नी म्हटल्याप्रमाणे जिचा सहवास आपल्याला चांगला वाटेल तिला निवडावं पण हे आकलन या वयात इतक्या कमी भेटींमध्ये होणं शक्य आहे का?एकदा वयात आल्यावर ते किती हा मुद्दा गौण आहे. लग्न करायचं म्हटल्यावर निवड अनिवार्य आहे, तिथे ज्येष्ठतेचा संबंध नाही. तुम्ही भेटी किती घेता यापेक्षा तुमची `फील कळण्याची' क्षमता काम करते. फीलच जर कळणार नसेल तर वय कितीही असो आणि भेटी कितीही घडोत संभ्रम कायम राहील.तरुण मुलांचं मन फार विचित्र असतं. त्याचे विचार कितीही महान असले तरी तो या तिघींपैकी जी अधिक सुंदर असेल, जिचं बोलणं अधिक मधाळ असेल तिलाच निवडणार याची शक्यता अधिक. अर्थात ही सहजप्रव्रृत्ती आहे. सौंदर्याचा आपल्यावर नकळतपणे पडणारा परिणाम या मुद्द्याला ग्राह्य धरून या भेटींमध्ये असा काय संवाद साधावा जेणेकरून आपल्याला त्यातल्या त्यात योग्य मुलगी निवडता येईल?आकर्षण हाच निर्विवाद प्राथमिक फॅक्टर आहे. उगीच गुण आवडले म्हणून लग्न केलं याला अर्थ नाही. त्यामुळे हिचे गुण चांगले आणि तीचं रुप भावतंय अशी दोन होड्यांवर एकावेळी सवारी होईल. मुलगी प्रथम दर्शनी लोभस वाटलीच पाहीजे. आणि हा फार व्यक्तिगत फॅक्टर आहे. उगीच इतरांना तुम्हाला कशी वाटते ? विचारण्याची ती गोष्ट नाही. नंतर मग साधारण तीनेक भेटीत सहवासाचा फील कळतो. खरं तर तो पहिल्या भेटीतच कळतो (म्हणजे आहे की नाही) पण केवळ दैहिक आकर्षणाचा इंपॅक्ट दूर व्ह्यायला आणि कंन्सीसटंसी वेरिफाय करायला पुढच्या तीनेक भेटी पुरेत,