बाप फितूर झाला.........
जीवनात दूखा:ने डोळ्यात पूर आला
तू हासला जरासा ,थकवा दूर झाला
तू जन्मलास अन मी जगलो असा नव्याने
प्रारब्ध गवसला जो, निशब्द सूर आला
उचलता हात बाळा, दिधला जरी धपाटा
काहूर मनी माझ्या, भरुनी उर आला
इवले हात रेखिती आभाळावर नक्षी
तू रागावला कधी, चंद्रास खूर आला
तूझी पावले उन्ही,बघता या मेघांनी
भिजवण्या धरणी,पाऊस आतूर झाला
तूझी ओढ इतूकी, कामास दूर सारी
तूज भेटाया रोज बाप फितूर झाला
💬 प्रतिसाद
(12)
ह
हतोळकरांचा प्रसाद
Wed, 01/18/2017 - 14:29
नवीन
व्वा, छान आहे!
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Wed, 01/18/2017 - 17:32
नवीन
मस्त! आवडेश!
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
गुरुवार, 01/19/2017 - 07:09
नवीन
मस्त, एकदम खरी कविता
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 01/19/2017 - 07:12
नवीन
एका बापाच्या भावना कवितेत छान उतरल्यात!
- Log in or register to post comments
श
शलभ
गुरुवार, 01/19/2017 - 08:11
नवीन
मस्त..आवडली
- Log in or register to post comments
अ
अरिंजय
गुरुवार, 01/19/2017 - 08:38
नवीन
मस्त, छान कविता
- Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर
गुरुवार, 01/19/2017 - 08:59
नवीन
चांगले लिहिताय....
- Log in or register to post comments
क
कवि मानव
गुरुवार, 01/19/2017 - 09:49
नवीन
मस्त - आवडली !!
- Log in or register to post comments
क
केडी
गुरुवार, 01/19/2017 - 09:54
नवीन
फार भारी जमली आहे. एकदम बाप!
- Log in or register to post comments
ड
डॉ श्रीहास
गुरुवार, 01/19/2017 - 16:33
नवीन
आवल्डी... मस्त लिहीता..
- Log in or register to post comments
स
सही रे सई
Fri, 01/20/2017 - 05:06
नवीन
व्वा मस्त जमल्ये.. विशेष करून शीर्षक अगदी लक्षवेधी झाल आहे. पण नशिबाने शीर्षकावरून वाटली तशी कविता नकारात्मक नाहीये हे खूप छान वाटल.
- Log in or register to post comments
द
देशपांडेमामा
Fri, 01/20/2017 - 12:50
नवीन
आवडेश!
देश
- Log in or register to post comments