अव्यक्त भावना ही, शब्दांविनाच बोले
अव्यक्त भावना ही, शब्दांविनाच बोले,
अस्वस्थ मम मनाला उमजून तेच आले ..
डोळ्यांमधून स्वप्ने, आरास आज झाली..
स्वप्ने तुझीच मजला, माझ्यामध्ये मिळाली ..
ओठी फुलून आले, माझे अबोल गाणे..
अस्वस्थ मम मनाला उमजून तेच आले ..
कित्येक चांदण्यांचे नक्षत्र आज झाली ..
रात्रीस स्वप्न पडूनी, उषा तिथे मिळाली
जणू शिंपल्यात मजला मोती नवे मिळाले ..
अस्वस्थ मम मनाला उमजून तेच आले ..
डोळयात आसवांची दाटी घडून आली
कृत-अर्थ जीवनाची, त्रिज्या मिटून गेली ..
मृत्यूस अमृताचे, वरदान जे मिळाले ..
अस्वस्थ मम मनाला उमजून तेच आले ..
💬 प्रतिसाद
(7)
स
संजय क्षीरसागर
Wed, 01/18/2017 - 15:23
नवीन
पण कवितेत कल्पनांचे वैभव आणि अनुभवामुळे येणारी अर्थाची सघनता नसेल तर ती मनाचा ठाव घेऊ शकत नाही.
- Log in or register to post comments
ख
खग्या
गुरुवार, 01/19/2017 - 14:38
नवीन
अर्थात?
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/19/2017 - 07:01
नवीन
अप्रतिम..
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 01/19/2017 - 07:05
नवीन
कविता आवडली!
- Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर
गुरुवार, 01/19/2017 - 09:03
नवीन
आवडली कविता.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
गुरुवार, 01/19/2017 - 10:39
नवीन
छान आहे, आवडली कविता!
- Log in or register to post comments
क
किरण कुमार
गुरुवार, 01/19/2017 - 10:41
नवीन
उत्तम शब्दरचना आणि अर्थही , आवडली
- Log in or register to post comments