Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जखमात यौवनाच्या

श — शार्दुल_हातोळकर, गुरुवार, 01/19/2017 - 14:00
जखमात यौवनाच्या झाले किती दिवाणे असती कुणी विलासी कोणी उदासवाणे असतात काळजाचे गुंते जुने-पुराणे शून्यात जाई कोणी घेतो कुणी धीराने लाखो तऱ्हा तयांच्या नि शेकडो ठिकाणे बाजार काळजाचा लाखो इथे दुकाने मदिरा कुणा सुखावी कोणास आर्त गाणे भासे आयुष्य कोणा ती पेटली स्मशाने ते दुःख झाकण्याला करती किती बहाणे ओठात गोड हासु कोणा नटाप्रमाणे ती आग अंतरीची जाळी कणाकणाने ना सांगता कुणा ये हे मोकळेपणाने होती अबोल का हो? ना बोलती कशाने हळुवार त्या स्मृतींना कि त्यागती अशाने? मजनू इथे फिरस्ते तुडवित माळराने आयुष्य कंठती अन् घायाळ काळजाने जखमात यौवनाच्या होती कुणी शहाणे बदलुन पायवाटा तरती अनुभवाने सुरुवात जीवनाची करती कुणी नव्याने उजळुन जन्म सारा पुन्हा नव्या दिव्याने - शार्दुल हातोळकर

प्रतिक्रिया द्या
3138 वाचन

💬 प्रतिसाद (19)
ए
एस गुरुवार, 01/19/2017 - 14:06 नवीन
वा. कविता आवडली.
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी गुरुवार, 01/19/2017 - 17:25 नवीन
अरे वा... मस्तच लिहिली आहे. काही ओळी जरा विसंगत वाटतात. भावनेने नाही-शब्दांने पण मस्तच...
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 01/19/2017 - 18:32 नवीन
अ प्र ति म! त्रिवार सलाम.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 01/19/2017 - 18:37 नवीन
सुरेख कविता!
  • Log in or register to post comments
ख
खग्या गुरुवार, 01/19/2017 - 22:00 नवीन
सुन्दर
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Fri, 01/20/2017 - 06:15 नवीन
' उजळुन जन्म सारा पुन्हा नव्या दिव्याने ' सकारात्मक शेवट आवडला,
  • Log in or register to post comments
क
किरण कुमार Fri, 01/20/2017 - 08:57 नवीन
शब्द आवडले , सूरेख
  • Log in or register to post comments
ग
गौरी कुलकर्णी २३ Fri, 01/20/2017 - 12:59 नवीन
छान काव्यरचना ! काळजाला भिडली... शेवटच्या चार ओळी सकारात्मक विचारसरणी मांडतात !!
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Fri, 01/20/2017 - 13:29 नवीन
जबरदस्त!
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Fri, 01/20/2017 - 18:10 नवीन
एस, कुलकर्णी सर, आत्मबंध, पैसाताई, खग्या, नीलमोहर, किरण, गौरी, जव्हेरगंज भाऊ, सर्वांना मनापासुन धन्यवाद!! __/\__
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Fri, 01/20/2017 - 19:29 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 01/20/2017 - 19:31 नवीन
क्या बात!
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sat, 01/21/2017 - 16:39 नवीन
धन्यवाद ज्योती अलवनि आणि रातराणी !
  • Log in or register to post comments
स
समाधान राऊत Mon, 01/23/2017 - 10:21 नवीन
ते दुःख झाकण्याला करती किती बहाणे ओठात गोड हासु कोणा नटाप्रमाणे
  • Log in or register to post comments
द
देशप्रेमी Tue, 01/24/2017 - 09:56 नवीन
खुप सुंदर काव्यरचना!! सकारात्मक शेवट खुप उत्तम झाला आहे. एका प्रतिभावंत कवीची झलक दिसत आहे!!
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर गुरुवार, 01/26/2017 - 16:16 नवीन
देशप्रेमी, माझ्या साध्याच साहित्यसेवेचे तुम्ही मोठ्या मनाने कौतुक केले, त्याबद्दल तुमचे त्रिवार आभार !! __/\__
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 01/27/2017 - 01:36 नवीन
सुरेख... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Puli Urumudhu... :- Vettaikaaran
  • Log in or register to post comments
क
कवि मानव Fri, 01/27/2017 - 11:55 नवीन
खूप छान.. सुंदर शब्द.. यवनाच्या नाना स्थिती आवडली !!
  • Log in or register to post comments
प
पराग देशमुख Sat, 01/28/2017 - 06:43 नवीन
भावली... ओळी आठवल्या... कवी नाही... खेळण्यास एक नवा, डाव पाहिजे | सक्ले जुना, नवीन घाव पाहिजे ||
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा