Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शतजन्म शोधिताना.....

प — पराग देशमुख, Tue, 01/24/2017 - 12:37
ठरवून मुलुख सारा,भिजवून परतलो मी कळ आतल्या जीवाची,चेतवून परतलो मी | अतृप्त आर्त वारा,त्रासून प्राशिला मी मर्जी नसे मनाची,भिजवून चाललो मी || बेरंग या जगाला, रंगून टाकताना रुधीरार्त आर्त माझे हलकेच सांडताना | तुज रंग रंजीताचा,रक्तरंज हा दिसेना मनी माझिया सखी हे,काहूर हासवेना || न्हावून घे बरे तू ,आसुसल्या सुखाने दुखवू कसा पुन्हा मी बोलू कुण्या मुखाने? कोंडून दुःख सारे,विस्फोट आज व्हावे हे देह संचिताचे,भेदून लखलखावे || येशील का जगी तू,बनुनी पुन्हा धरा ती मी मूक (कि मुक्त )मेघ नभीचा,बरसेल बेहीसाबी | सोसून वेड सारे,रुजूदे पुन्हा मलाही समजू नकोस काटा,मी पुष्प ते गुलाबी || रुजुनि तुझ्या ऊराशी,इकवार जन्म घ्यावा हर याक्ष-प्रश्निकाला,जगुनी जवाब द्यावा | ते मूक प्रेम माझे,स्पर्शून सांगताना देईन साथ तुजला,शतजन्म शोधिताना.... || व्यथा कधी न कळली हि कथा असे कोणाची? "नभ-आर्त धरित्रीची" वा "प्रेम-प्रेमिकांची" | मज पामरे बळेची इतुकेच फक्त झाले ते दिव्य प्रेम त्यांचे, मी शब्दबद्ध केले || -मुकुंद.

प्रतिक्रिया द्या
3112 वाचन

💬 प्रतिसाद (12)
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 01/25/2017 - 17:06 नवीन
सुंदर!
  • Log in or register to post comments
क
कवि मानव Fri, 01/27/2017 - 11:40 नवीन
मला आवडली !!
  • Log in or register to post comments
क
कवि मानव Fri, 01/27/2017 - 11:42 नवीन
एक उत्सुकता आहे.... कशावर आहे हि कविता ?
  • Log in or register to post comments
प
पराग देशमुख Fri, 01/27/2017 - 15:00 नवीन
माझ्या एका मित्त्रासोबत अस घडल आहे, अस म्हटल्यावर जो अर्थ निघतो त्यावरच ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवि मानव
प
पैसा Fri, 01/27/2017 - 15:24 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 01/28/2017 - 07:00 नवीन
छान! आवडली कविता!
  • Log in or register to post comments
प
पराग देशमुख Sat, 01/28/2017 - 15:24 नवीन
धन्यवाद...!!! आत्मबंध,कवि मानव, पैसा आणि हतोळकरांचा प्रसाद...धन्यवाद कवितेचं शीर्षक एका महाकवीच्या लिखाणातून उसण घेतलेलं आहे त्यामुळे कोणाला आवडेल कि नाही अशी धाकधूक होती आता हायस वाटतंय.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 01/28/2017 - 15:26 नवीन
मस्त !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- The Humma Song... ;) – OK Jaanu
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sat, 01/28/2017 - 17:07 नवीन
छानच आहे!!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 01/29/2017 - 08:41 नवीन
आवडली .
  • Log in or register to post comments
प
पराग देशमुख Wed, 02/01/2017 - 08:40 नवीन
मदनबाण, शार्दुल_हातोळकर, यशोधरा प्रतिक्रियांसाठी आभार
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 02/02/2017 - 07:20 नवीन
आवडेशच... (माफ करा पण जरा लांबल्यासारखी वाटली.) पुलेशु !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा