Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रंगपंचमी

प — पराग देशमुख, Wed, 02/01/2017 - 14:31
रंग मनाचा,रंग क्षणाचा, क्षणाक्षणाला विरघळणारा. क्षणात हसरा,क्षणात हळवा, डाव्या गाली ओघळणारा. पुसता अश्रू आवेगाने, रंग काजळी विस्कटणारा. अंमळ उसासे स्फुंदत असता, रंग बोचरा गहिवरणारा. मित्रांची ती चौकट जमता, रंग खुशीचा खळखळणारा. कातरवेळी काहुरणारा, पिंग गुलाबी रंग बावरा. रंग कोणता शौर्येन्द्राचा, निधड्या छाती वार झेलता? रंग कांतीचा गौर वेगळा, चाहुलीसरशी थरथरणारा. अवखळ,चंचल,शुद्ध-कांचनी, बालमनाचा रंग निरागस. तारुण्याचा रंग अंध परी, समर्थ,पामर,रसरसणारा. अनुभवाने रापून झाला, प्रौढ मनाचा रंग सावळा. समाधानी नि शांत,विचारी, वैराग्याचा रंग पांढरा. रंग उदासी,रंग कुतुह्ली, रंग लाजरा,रंग विचारी. रंग आळशी,रंग जहरी, रंग उद्यमी,लुसलुसणारा. जीवनभर हि अशी चालली, मनरंगांची "रंगपंचमी". शब्द बापुडे,पडे तोकडे, वर्णन करिता रंगपसारा -------------------------------------------------------------------------मुकुंद

प्रतिक्रिया द्या
1688 वाचन

💬 प्रतिसाद (3)
प
पैसा गुरुवार, 02/02/2017 - 06:13 नवीन
आवडले रंग!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 02/02/2017 - 07:16 नवीन
वाह ..
  • Log in or register to post comments
S
Snow White Tue, 02/07/2017 - 18:42 नवीन
रंग उदासी,रंग कुतुह्ली, रंग लाजरा,रंग विचारी. रंग आळशी,रंग जहरी, रंग उद्यमी,लुसलुसणारा. क्या बात है...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा