Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

टी-परमीट घेण्याबद्दल मदत अपेक्षित

ब
बटाटा चिवडा
Fri, 02/03/2017 - 03:35
🗣 8 प्रतिसाद
नमस्कार, माझ्याकडे सध्या Renault Kwid ही टॉप मॉडेल कार आहे. कल्याण आरटीओ ला नोव्हेंबर २०१५ ला रजिस्टर्ड ही कार असून, कार साठी DNS बँकेतून ४ लाखांचे लोन काढलेले आहे व सध्या साडेतीन लाखांपर्यंत लोन बाकी आहे. मला माझी ही कार प्रायव्हेट टू कमर्शियल अशी कन्व्हर्ट करून हवी आहे, त्यासाठी पुढील काही शंका आहेत, त्यांचे निरसन कोणी करू शकेल तर नवीन व्यवसाय करण्यासाठी मदत होईल:- १. कार ला प्रायव्हेट टू कमर्शियल कन्व्हर्ट करण्यासाठी अर्थात टी परमीट घेण्यासाठी साधारण किती खर्च येऊ शकेल? हा खर्च एजंट मार्फत करावा लागेल की आरटीओ मध्ये आपण स्वतः जाऊन हे करणे शक्य आहे? शक्य असल्यास होणाऱ्या खर्चात, लागणाऱ्या वेळात आणि होणाऱ्या त्रासात किती फरक पडेल? २. कार चा १ वर्षांचा इन्शुरन्स संपला आहे. टी परमीट घेण्याआधी इन्शुरन्स ची comprehensive policy घेणं अनिवार्य आहे का? की थर्ड पार्टी इन्शुरन्स घेतला तरी चालेल? कमर्शियल साठी इन्शुरन्स प्रीमियम जास्त असेल का? ३. कार लोनवर घेतलेली असल्याने, टी परमीट घेताना बँकेची भूमिका काय असेल? लोन घेताना प्रायव्हेट कार साठी घेतले असल्याने, टी परमीट घेताना इंटरेस्ट रेट आणि पर्यायाने इ एम आय वर काय फरक पडेल? ४. टी परमीट घेल्यानंतर मी स्वतः ही कार चालविण्यासाठी माझ्या रेग्युलर ४ चाकी लायसेन्स मध्ये काही बदल करावे लागतील का? की टी परमीट कार चालविण्यासाठी वेगळा वाहन परवाना घ्यावा लागेल? असल्यास त्याचा अतिरिक्त खर्च किती? त्याशिवाय काही इतर गोष्टींची पूर्तता करणे गरजेजे असेल का? ५. टी परमीट रजिस्ट्रेशन होण्याआधी आरटीओ कडून कार चे इन्स्पेक्शन होणे अपेक्षित आहे का? त्यासाठी विशेष काही बाबींची पूर्तता करावी लागेल का? ६. व्यवसाय करण्यासाठी मी माझ्या घरच्या पत्त्यावर टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे गुमस्ता लायसन्स घेतले आहे, त्या व्यतिरिक्त इतर कोणकोणती कागदपत्रे आरटीओ मध्ये देणे अनिवार्य आहे? ह्या शिवाय इतर काही तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता असल्यास त्या देखील नमूद कराव्यात, ही नम्र विनंती... तज्ञ व्यक्तींचा सल्ला अपेक्षित. धन्यवाद... __/\__

प्रतिक्रिया द्या
5596 वाचन

💬 प्रतिसाद (8)
भ
भटकंती अनलिमिटेड Fri, 02/03/2017 - 05:10 नवीन
सगळ्यात आधी तुम्हांला शॉप ऍक्ट अथवा गुमास्ता प्रमाणपत्र घ्यावे लागेल. त्याचे आयटी रिटर्न (अगदी नो प्रॉफिट नो लॉस असलेले पण चालेल), मग पार्किंग स्पेस तुमच्या मालकीची असल्याचे (सोसायटीने दिलेले) अधिकृत प्रमाणपत्र. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हांला टी परमिट गाडी चालवण्यासाठी ट्रान्सपोर्ट लायसन्स आणि कॅबचालकाचा बॅज मिळवावा लागेल. सध्याचा रोड टॅक्स रिफंड होणार नाही. पण टी-परमिटसाठी पुन्हा रोड टॅक्स भरावा लागेल. हा परवाना दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावा लागतो. तेव्हा प्रत्येक वेळी पाच पाच वर्षांचा टॅक्स भरावा लागेल. गाडी पुन्हा पासिंग होईल. नंबर नवा येईल. इन्शुरन्सचा प्रकार बदलेल. त्याचा प्रिमियम वाढेल. या सगळ्यात मिळून येणारा खर्च पाहता लवकरच तुम्ही तो विचार सोडून द्याल अशी आशा करतो :-)
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 02/03/2017 - 06:00 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भटकंती अनलिमिटेड
ख
खटपट्या Fri, 02/03/2017 - 08:32 नवीन
भटकंती अनलीमीटेडने सांगीतलेल्या गोष्टी लक्षात घेता. व्यवसायासाठी नवीन गाडी घेणे उचीत होइल. उबेर, ओला कींवा बाकीच्या ट्रॅवल कंपन्या नवीन गाडी प्रीफर करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भटकंती अनलिमिटेड
ब
बटाटा चिवडा Fri, 02/03/2017 - 14:06 नवीन
भटकंती अनलिमिटेड यांनी सांगितलेप्रमाणे, १. गुमास्ता प्रमाणपत्र घेतलेले आहे, परंतु नवीन प्रमाणपत्राचे आय टी रिटर्न फाईल होऊ शकते का? २. कार लावण्यासाठी सोसायटीत कॉमन पार्किंग स्पेस असल्याने तुम्ही म्हणता तसे सोसायटी प्रमाणपत्र देणे कठीण आहे, त्यावर काही इतर उपाय? ३. टी परमीट मिळाल्यानंतर आधी भरलेला प्रायव्हेट वेहीकल रोड टॅक्स रिफंड मिळण्यासाठी कायद्यात तरतूद असल्याचे हल्लीच वाचनात आले, त्याची शाहानीषा करावी लागेल. ४. कार इन्शुरन्स Comprehensive policy काढली तर खर्च हा होणारच, मग प्रायव्हेट कार असो अथवा कमर्शियल असो, त्या खर्चामुळे बिझनेस आयडिया ड्रॉप करावी असे नाही वाटत. बिझनेस म्हंटला म्हणजे गुंतवणूक ही आलीच. फक्त कमर्शियल इन्शुरन्स प्रीमियम आणि नॉर्मल प्रीमियम यांतील फरक किती असेल ते जाणून घ्यायचंय? ५. नवीन गाडी घेण्यासाठी हीच खटपट करावी लागेल, तर मग सध्य मालकीची कारच त्या साठी का वापरू नये? एकतर कार ला वेटिंग नसेल आणि दुसरे म्हणजे दोन कार बाळगण्याचा खर्च नसेल, आणि ओला, उबेर मध्ये १ वर्ष जुनी कार नक्कीच पास होईल कारण कार चे रंनिंग फक्त ३५०० किमी च्या आसपास आहे. अगदीच विरोधी विचार करून कार कमर्शियल मध्ये कन्व्हर्ट न करण्याचे ठरविले आणि जास्त वापर नसल्याने कार विकण्याचा विचार केल्यास कार ला किती किंमत येऊ शकेल? Car Name: Renault Kwid Model: २०१५ Nov Running: ३५०० Kilometers (Approx.) Red Color, Top Model, ८०० cc. On Road Cost: ४.५६ Lakhs.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 02/04/2017 - 13:30 नवीन
इतक्या लवकर विकायची म्हणता आहात तर घेतलीच का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बटाटा चिवडा
ब
बटाटा चिवडा Sat, 02/04/2017 - 19:45 नवीन
विकायची इच्छा नाहीये, पण वैयक्तिक कारणामुळे विकायची वेळ आली आहे, त्यावर बोलू परत कधीतरी. तूर्तास माझ्या वरील शंकांचे निरसन केल्यास खूप मदत होईल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
प्रकाश घाटपांडे Sat, 02/04/2017 - 05:29 नवीन
मला शीर्षकावरुन विनोदी लेखन वाटले. जसे की दारु प्यायला परमीट लागते तसे चहा प्यायला परमीट लागले तर?
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Wed, 02/08/2017 - 16:37 नवीन
प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) मध्ये स्वतः जाऊन आलात का? तिथे एखाद्या RTO अधिकार्याशी स्वतः बोला नक्की मार्ग मिळेल. टी परमीट घेण्याआधी इन्शुरन्स ची comprehensive policy घेणं अनिवार्य आहे का? अर्थातच. कार लोनवर घेतलेली असल्याने, टी परमीट घेताना बँकेची भूमिका काय असेल? बँक RTO कडून NOC आणायला सांगेल, अधिक प्रोसेसिंग चार्ज घेईल इतर कोणतेही आडकाठी आणणार नाही . मी या विषयातला तज्ज्ञ नाही. मी एक Ex-banker आहे. माझा चल ध्वनी ७०४५६ ३६३४६
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा