Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काबील रईस

व
वाल्मिकी
Sat, 02/04/2017 - 12:46
🗣 16 प्रतिसाद
नमस्कार मंडळी गेलाबाजार बाजीराव मस्तानी आणिदिलवाले वर जेवढ्या जिलब्या पडल्या तेवढ्या काबील / रईस जुगलबंदी वर पडली नाही म्हणून हा प्रपंच दोन्ही चित्रपट साम्यस्थळे खूप आहेत ,माझे एक निरीक्षण १) दृष्टी दोष एकात चस्मा आहे ,दुसऱ्यात नेत्र हीं आहे २) आयटम नंबर दोन्ही मध्ये मध्यंतराजवळ आयटम सोंग आहे ते पण रीमिक्स ३) मुख्य कलाकाराचा मृत्यू एकटा हिरो मरण पावतो दुसऱ्यात हेरॉईन ४) नरेंद्र झा हा कलाकार काबील मध्ये इन्स्पेक्टर आहे तर रईस मध्ये डॉन ५) हिरो हेरॉईन पहिल्यांदा दोन्ही चित्रपट नवीन जोडी जमावल्यात तरी तुम्हाला अजून काही साम्य आढळ्यास नक्की कळवा

प्रतिक्रिया द्या
4550 वाचन

💬 प्रतिसाद (16)
ज
जव्हेरगंज Sat, 02/04/2017 - 14:02 नवीन
अजून एक, दोन्हीही भंगार आहेत.
  • Log in or register to post comments
व
वगिश Sat, 02/04/2017 - 15:14 नवीन
आणि दोन्ही बघणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
अ
अॅस्ट्रोनाट विनय Sun, 02/05/2017 - 07:00 नवीन
परीक्षण आणि चर्चेचे धागे काढायचे असतील तर जरा दर्जेदार चित्रपटांवर काढा हो. काबिल चर्चेच्या काबिल नाही अन रईसची तेवढी श्रीमंती नाही.
  • Log in or register to post comments
अ
अॅस्ट्रोनाट विनय Sun, 02/05/2017 - 07:03 नवीन
अर्थात दिलवालेची पण ती लायकी नव्हती हे वेगळे बोलणे न लगे
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 02/07/2017 - 21:37 नवीन
लोकहो, बंडल असला तरी रईस जरूर पहा. तो दाऊद इब्राहीमविषयी सहानुभूती उत्पन्न व्हावी म्हणून काढला आहे. त्या चित्रपटाचं बारकाईनं निरीक्षण करायला हवं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अॅस्ट्रोनाट विनय Wed, 02/08/2017 - 17:38 नवीन
अरे बापरे, असं आहे का? (गामाजी यासंदर्भात अजून थोडा उजेड पाडू शकाल का) रईसमध्ये एका गुन्हेगाराचं उदात्तीकरण केलेलं आहे एवढं कळालं. पण चित्रपटातील नायक (?) जसा मारतो तसा अंत दाउदचा व्हायला हवा.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 02/08/2017 - 20:29 नवीन
अॅस्ट्रोनाट विनय, एस. हुसेन झैदी यांनी लिहिलेल्या डोंगरी ते दुबई या मुंबईच्या गुन्हेगारी विश्वावरच्या पुस्तकात बरीच माहिती हे. त्यानुसार १९९३ सालच्या सुरवातीस दाऊदने जी तस्करी केली ती किरकोळ हत्यारांची आहे असा दाऊदचा समज करून दिला होता. मात्र प्रत्यक्षात आरडीएक्स पाठवलं होतं. ही स्फोटकं पुढे मार्च १९९३ मध्ये मुंबईच्या कुप्रसिद्ध १३ बॉम्बस्फोटांत वापरली गेली. त्यात २५७+ निरपराध बळी गेले आणि दाऊद भारताचा कायमचा शत्रू झाला. यापुढील ही माहिती वरील पुस्तकात नाही. माझे अंदाज आहेत. दाऊदचा डबल क्रॉस (=सापळ्यात पकड) करण्यात आला आहे. बॉम्बस्फोट झाले १३ मार्च १९९३ रोजी. दुसऱ्या त्याची आई अमिनाबाई घाईघाईने दुबईला पळून गेली. तिला (खराखोटा) पासपोर्ट एका राजकीय नेत्याने मिळवून दिला. आता प्रश्न असा उद्भवतो की एव्हढे मोठे धमाके होणार असले तर दाऊदने अगोदरच कुटुंबीय हलवले असते. मात्र तसं झालं नाही. म्हणजे हे धमाके दाऊदला अंधारात ठेऊन करण्यात आले. याउलट याकूब मेमन आणि त्याचे सगळे कुटुंबीय सुमारे एक वर्षापूर्वीच आखतात स्थायिक झाले होते. त्यामुळे मेमन बंधूंवरील दाऊदचा संशय बळावला. म्हणून याकूब मेमनला १९९४ साली भारतात परत पाठवण्यात आलं. आता त्या सुप्रसिद्ध राजकीय नेत्याची फाटली. याकूब मेमन काहीबाही बोलून बसला तर त्या राजकीय नेत्याचे सगळे पत्ते उघड होणार. म्हणून याकूबला मुद्दाम तुरुंगात सडवला. मेलेल्या याकूबपेक्षा जिवंत याकूब त्या राजकीय नेत्याच्या अधिक फायद्याचा होता. म्हणून त्याला मरू न देता ओलीस ठेवला. मोदींनी हा ओलीस उडवला. दाऊद आजही स्वत:ला भारतीय म्हणवतो आणि निरपराध समजतो. दाऊद आता म्हातारा होत चालला आहे. त्याला व्याधीही जडल्या आहेत. पाकिस्तान हा अत्यंत असुरक्षित देश आहे. आयेसाय दाऊदला ठार मारून त्याचा धंदा ताब्यात घेऊ इच्छिते. आणि आता तर ट्रंप निवडून आले आहेत. त्यांनी मुस्लीम दहशतवादाविरुद्ध आघाडी उघडली आहे. उद्या अमेरिका कारवाई करून दाऊदला उडवू शकते. दाऊदला एकाऐवजी दोन शत्रूंचा सामना करायचा आहे. या पार्श्वभूमीवर (बहुतेक) दाऊदने आपलं निरपराधत्व मोदींच्या गळी उतरवलं आहे. परंतु भारतीय जनमानस अजूनही त्याच्या तीव्र विरोधात आहे. शिवाय त्या विशिष्ट राजकीय नेत्यालाही भलतीच अंडीपिल्ली बाहेर यायच्या भीतीमुळे दाऊद परत यायला नकोय. यावर व्यूहरचना म्हणून मागील दाराने दाऊदविषयी व एकंदर दहशतवादाविषयी सहानुभूती निर्माण करण्यासाठी रईससारखे चित्रपट दाऊदकडून काढले जातात. आपण या चित्रपटांचं बारीक निरीक्षण करायला हवं. असं एकंदरीत माझं मत आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अॅस्ट्रोनाट विनय
प
पैसा गुरुवार, 02/09/2017 - 06:33 नवीन
बाब्बौ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 02/09/2017 - 09:53 नवीन
दाउद पाकिस्तानात नसून पुण्यात आहे. आत्ताच त्याच्याबरोबर कँटिनमध्ये बसून मी डबा खाल्ला. त्याने डब्यात मटण आणले होते. मजा आली. १५ ऑगस्टला आमच्या कंपनीत झेंडावंदन झाले तेंव्हासुद्धा तो आला होता. नंतर 'कर चले हम फिदा' हे गाणे लागले असताना त्याचे ओलावलेले डोळे मी स्वतः पाहिले आहेत. तो मोदी साहेबांशी फोनवर सारखा गप्पा मारतो आणि कधी कधी त्यांचे स्काईप कॉल पण चालू असतात. ९३ साली अगरबत्त्या, साइबाबाचे फोटो आणि बोकड यांची तस्करी केली याबद्दल त्याला पश्चात्ताप होत असल्याची त्याची जबानी ऐकून मोदी साहेबांना पण एकदा रडू आले होते. हे मी त्याची स्काईप मीटिंग चोरुन पाहिली तेंव्हा कळले. ९३ साली मुंबईत बॉमस्फोट झालेच नाहीत ते कराचीत झाले. पण एका बड्या राजकीय नेत्याच्या दबावामुळे वर्तमानपत्रांनी खोट्या बातम्या छापल्या हे कळल्यावर तर मोदी साहेबांच्या अश्रूना पारावार उरला नाही. 'मी ट्रंप साहेबांशी बोलतो आणि तुला युएस ला एखाद्या सेफ जागी शिफ्ट करतो' असेदेखील ते म्हणाले होते. असो. ४ वाजता त्याच्याबरोबर चहाला जायचे आहे. त्याला क्रीमरोल खूप आवडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान गुरुवार, 02/09/2017 - 16:28 नवीन
ओ येडाभाव, उतरा आता येष्टीतनं. पेडगाव आलं तरीबी हितंच तुमी? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
च
चिर्कुट Sat, 02/11/2017 - 14:43 नवीन
असले डेंजर विचार येण्यासाठी कोणता चष्मा लावून शिनुमा बघावा म्हणे?? नक्की पाहिला आहे का सिनेमा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
मराठी कथालेखक गुरुवार, 02/09/2017 - 06:58 नवीन
पण हा चित्रपट तर दाऊद नव्हे तर 'अब्दूल लतीफ' नावाच्या गुन्हेगाराच्या जीवनावर बेतलेला आहे असंच सगळीकडे बोललं जातंय. या लतीफचा गुजरातमध्ये अवैध दारुचा धंदा होता. बरेचसे संदर्भ त्याच्याशीच जुळतात. विकीपीडियावर तेच पण लिहलंय
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 02/09/2017 - 09:02 नवीन
मराठी कथालेखक, तुमचं म्हणणं अचूक आहे. मात्र थेट दाऊदवर चित्रपट काढला असता तर लोकांच्या नजरेत आला असता. म्हणून मागील दाराने दाऊदविषयी सहानुभूती निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. चित्रपट लतीफवर बेतलेला असला तरी सहानुभूतीचा अंगुलीनिर्देश दाऊदकडे होतो आहे. तसंही पाहता लतीफ केंव्हाच अल्लाला प्यारा झालेला आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक गुरुवार, 02/09/2017 - 09:37 नवीन
हो .. तेच तर.. दाउद अजून जिवंत आहे. दाउदशी काहीच संदर्भ जुळत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ध
धर्मराजमुटके Mon, 02/13/2017 - 14:29 नवीन
कॉन्स्पीरन्सी थेअरी मांडायच्या ठरल्या तर काहीही करता येते. आता हेच बघा रईस चित्रपटात 'उडी उडी जाय' गाणे आहे त्यात पुढे जाऊन भारतात उरी येथे हल्ला करणार होते असे सुचवायचे होते. पण डायरेक्ट उरी म्हटले तर संशय येणार मग उडी उडी असा बदल केला आणि हे एक प्रेमगीत म्हणून त्याचे चित्रीकरण केले.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 02/14/2017 - 07:41 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा