Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

छळ-कपट वाले कॉल

ल
लई भारी
Mon, 02/06/2017 - 11:34
🗣 30 प्रतिसाद
आजकाल ऑनलाईन व्यवहार, डेबिट-क्रेडिट कार्ड वापराबद्दल बरीच जागरूकता आली असली तरी पण फोन वरून आर्थिक माहिती विचारून फसवणूक होण्याच्या बातम्या वाचनात येत असतातच. प्रत्यक्षात कधी अनुभव आला नाही आहे, किंवा प्राथमिक फेरीतच माझा संयम संपत असल्याने कधी खोलात जाता आलं नाही. आज हापिसातल्या सहकाऱ्याला असा कॉल आला होता ज्यामधून (माझ्यासाठी तरी) थोडी रंजक(!) माहिती मिळाली. (संभाषण हिंदी मध्ये चालू होत, सोयीसाठी मराठी.) मित्राला एका सामान्य मोबाईल नंबर वरून कॉल आला. फोन: नमस्कार सर, तुमचं डेबिट कार्ड लॉक झालं आहे, तरी मला तुमचा कार्ड नंबर सांगू शकाल का, म्हणजे मग आम्ही पडताळून पाहतो(ह्याच्या आधी जुजबी बोलणं झालं असेल कदाचित) मित्र: तुम्ही कुठल्या बॅंकेतून बोलताय? फोन: आम्ही SBI च्या शाखेतून बोलतोय. मित्र: माझं तर सिटीबँकेच कार्ड आहे. फोन: सर, आम्ही डेबिट कार्ड हेल्पलाईन मधून बोलतोय. तुम्ही जर माहिती सांगितली नाही तर कार्ड लॉक होऊन जाईल. काय करू? मित्र: होऊ दे कार्ड लॉक. फोन: ठीक आहे सर, मी तसं इथे मार्क करतो आपल्या कार्ड साठी. पण एकदा आपलं कार्ड बाहेर काढता का, आणि मला त्यावरील १६ आकडी नंबर सांगा. मित्र: भैया, मी तुम्हाला कुठलीही माहिती सांगणार नाही, तुम्ही मला फ्रॉड वाटताय. फोन: नाही सर, आम्ही फ्रॉड कसे असेन; आम्ही तर बॅंकेच्या शाखेतून बोलत आहे. इथून पुढे साधारण ५ मिनिटे तू-तू मै-मै चालू होती की फ्रॉड आहे की नाही ह्यावर. फोन करण्याराने सांगितले की मी बिहार मधून बोलतोय. (मित्र पुण्याच्या हापिसात बसला आहे) अजूनपर्यंत मान्य नव्हतं केलं की हा फ्रॉड कॉल आहे. आणि त्याने फोन बंद केला(किंवा झाला असेल) मित्राने त्या नंबर ला परत कॉल केला आणि त्या व्यक्तीने एका रिंग मध्ये उचलला. मित्र: हॅलो फोन: (बिनधास्तपणे) हां बोला सर, कशी काय आठवण काढली. मित्र: (अतिशय शांतपणे) अरे यार, बंद करा असली काम. आम्ही एक थोडं फार शिकलोय त्यामुळे समजू शकलो. आणि थोडं फार नुकसान सहन पण करू शकू. पण एखादा गरीब असेल तर त्याला तर कंगाल कराल तुम्ही. फोन: सर, आम्ही १०,००० च्या वरती बेलेंस असेल अशाच लोकांना गंडवतो!!! आणि आम्ही स्वतःच गरीब आहे सर. गरिबाला नाही लुटत आम्ही. मित्र: सही आहे दोस्त! पण का करता असं! पोलिसात तक्रार करतो तुमची. फोन: करा सर, आम्ही अशा ठिकाणी आहे की पोलीस पण नाही पोचू शकणार. मित्र: हां यार, तू पाकिस्तान मधून बोलत असणार मग भारतातील पोलीस काय करणार! फोन: नाही सर, मी पण भारतातच आहे. पण एक गोष्ट सांगू; हे काम करणारे जेवढे लोक आहेत ना, सगळेजण पोलिसांना पैसे खिलवतात. त्यामुळे पोलीस पण सामील आहेत! मित्र: भारी आहे राव, पण ही माहिती घेऊन काय करणार तुम्ही. फोन: सर, एक कार्ड नंबर सांगून बघा; मोजून ५ मिनिटात तुमचं अकाउंट साफ होऊन जाईल. मित्र: कस काय? खरेदी करता का सगळी? फोन: दोन्ही. आम्ही डुप्लिकेट कार्ड बनवतो आणि मग ATM मधून रोख रक्कम पण काढतो. मित्र: भारी आहे, तुमच्याकडे एखादी व्हॅकन्सी आहे का? फोन: या ना सर. कधी पण. मित्र: अरे पण तू तुझा खरा पत्ता सांगणार नाहीस; किंवा एखादा आडवळणी ठिकाणी बोलावशील. कधी पुण्यात आलास तर सांग. फोन: हां सर त्या अमुक अमुक> कंपनीत आलो होतो आम्ही एकदा. पण आजकाल धंदा कमी झालाय सर. दिवसाला एखादाच बकरा मिळतो. आधी सर्रास मिळायचे. मित्र: बराय, चालू दे तुझं! फोन: धन्यवाद सर! भेटू कधी तरी. मी: अवाक!!! मित्राच्या बायकोचा मोबाईल नंबर फक्त एक अंकाच्या फरकाने होता आणि तिला पण कॉल आला होता त्याच व्यक्ती कडून. त्यामुळे क्रमाने सगळे नंबर फिरवत होते असे वाटते. तो नंबर बऱ्याच लोकांनी रिपोर्ट केलाय असं दिसत होत, म्हणजे एकच सिम कार्ड बरेच दिवस वापरतोय तो! मला आश्च्यर्य या गोष्टीच वाटलं की तो माणूस बिनधास्तपणे सांगत होता की तो लोकांना लुटतोय, त्याला पोलिसांचं भय नव्हतं. त्यांच्याकडे आपली माहिती गेली कशी हा मोठ्ठा प्रश्न आहे. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर त्यांना आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम पण कळते आणि बिनधास्तपणे भेटण्याचं निमंत्रण देत होता. बरंचसं कल्पनेच्या बाहेरच आहे.

प्रतिक्रिया द्या
6542 वाचन

💬 प्रतिसाद (30)
श
शलभ Mon, 02/06/2017 - 12:33 नवीन
अवघड आहे सगळं...
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 02/06/2017 - 12:46 नवीन
भयानक! फ्रॉड कॉल चे विशेष नाही पण रिटर्न कॉल चे चिंताजनक आहे...
  • Log in or register to post comments
प
पुंबा Mon, 02/06/2017 - 13:27 नवीन
हे भयानक आहे.. डेटा सिक्यूरिटी बद्दलचं एवढं औदासिन्य कल्पनेबाहेर आहे आणि वर तोंड घेऊन डिजीटल पॉवर हाऊस आणि आयटी महासत्ता म्हणून गाजावाजा करतात.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 02/06/2017 - 15:19 नवीन
लई भारी, संभाषण रोचक आहे. म्हणे पोलीस पकडू नाही शकंत! कानूनके हात बहोत लंबे होते है. दाऊद इब्राहीमवर त्याची केस मांडण्यासाठी आज रईस चित्रपट काढायची पाळी येते. हे कर्म मुंबई पोलिसांच्या खाती बरं का! तर मग कोणी चिमुकला फड्डेखोर काय मोठा लागून राहिलाय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
द
दिगोचि Tue, 02/07/2017 - 03:18 नवीन
आज पाकिस्तानच्या ट्रिब्युन या व्रुत्तपत्रात वाचले की शाहरुखच्या या चित्रपटाला सेन्सोर बोर्डने परवानगी नाकारली आहे. याचा अर्थ मी असा लावला आहे की दावूदशी या चित्रपटाचा जरुर सम्बन्ध आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ल
लई भारी Tue, 02/07/2017 - 10:31 नवीन
आपले म्हणजे पटतंय. ह्यासाठी अशी तक्रार नेटाने लावून धरली पाहिजे असं वाटतंय. यातल्या (कायद्याच्या) तांत्रिक बाजू माहीत नाहीत आणि कधी अनुभव पण नाही; पण 'काही फसवणूक झालेली नाही' असा पवित्र घेऊन पोलीस तक्रार घ्यायला/गुन्हा नोंदवायलाच टाळाटाळ करतील का? त्याच्यापुढे जाऊन येणार कॉल दुसऱ्या राज्यातला - म्हणजे मग अजून बोंब! तरीपण मी मित्राला सुचवलंय की आपण जाऊया पोलीस स्टेशन ला. बघू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
A
AKSHAY NAIK Mon, 02/06/2017 - 16:26 नवीन
चांगला धडा शिकवायला पाहिजे अशा बदमाशांना !
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Mon, 02/06/2017 - 18:54 नवीन
इंटरेस्टींग आहे हे तर!! सरळ बोलला तो की कार्ड साफ करतो आम्ही?! क्या बात है!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Tue, 02/07/2017 - 02:48 नवीन
असाच एक फोन येतो. फ़ोन करणारा सांगतो कि तो "डी एच एस / ईमिग्रेशन / आय आर एस/ पासपोर्ट/ पोलीस या पैकी कोठून तरी बोलतोय. तुम्ही फाईल केलेले टॅक्सेस चूक आहेत आणि त्यामुळे तुम्हाला $२००० (किंवा तसलाच काही हजार चा आकडा) दंड भरावा लागेल. तो दंड तुम्ही आताच भरा नाहीतर तुम्हाला ऑफिसर xxxxx येऊन अटक करतील." नवे लोक बऱ्याचदा फसतात कारण फोन करणाऱ्याकडे पासपोर्ट नंबर पासून सगळे तपशील असतात आणि तो ते आधी कन्फर्म करून घेतो. व्हिक्टीमने पैसे द्यायला असमर्थता दाखवली तर मग मात्र अडजस्टमेन्ट म्हणून बार्गेनला सुरुवात होते. फायनली अगदीच नाही काही तर जवळच्या स्टोर मधून एखादे गिफ्ट कार्ड विकत घेऊन त्याचा नंबर मागतात. $२००० पासून सुरु झालेली मागणी $२५ मध्ये पण क्लोज होते. माझ्या एका मित्राला अटक करायला ऑफिसर मॅडोना येणार म्हणून सांगितले तर त्याने ऑफिसर स्कार्लेट जॉन्सनला पाठवा म्हणून घोषा लावला. :D शेवटी समोरच्याने कंटाळून फोन ठेवला. माझ्या एका मित्राने वैतागून शिव्या दिल्या, त्यावर तो म्हणाला "सर, गाली समझता मुझे." पुढे बोलल्यावर त्या घोटाळेबाजाने सांगितले कि तो भारतातूनच बोलत आहे आणि मित्राचा नंबर त्यांच्या डेटाबेस मध्ये आहे म्हणून फोन केला. मित्राने नंबर काढून टाकण्याबद्दल सांगितले तर तो म्हणाला कि त्याने जरी नंबर उडवला तरी डेटाबेसचे अनेक कॉपीज आफ्रिका आणि आशिया मध्ये आहेत. दुसरा कोणीतरी फोन करेन. डी एच एस : डिपार्टमेंट ऑफ होमलँड अँड सिक्युरिटी आय आर एस: इंटर्नल रेव्हेन्यू सर्व्हिस
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Tue, 02/07/2017 - 05:53 नवीन
मुंबैतली रॅकेट होती ही. अलिकडेच पोलिसांनी अटक केली त्या लोकांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत
आ
आनंदयात्री Wed, 02/08/2017 - 19:30 नवीन
ते रॅकेट इन्कम टॅक्सच्या संदर्भात फोन फ्रॉड करत होते असे वाचल्याचे आठवते. बहुदा इमिग्रेशन रिलेटेड नाही. अमेरिकेत होणाऱ्या फोन फ्रॉडची व्याप्ती अश्या गोष्टींपासून ते 'तुझा भाऊ आत्ता या क्षणाला माझ्या गनपॉईंटवर आहे, कार्ड नंबर दे आणि फोनवर रहा, पंधरा मिनिटात त्याला सोडून देउ' इथपर्यन्त आहे अशी ऐकीव माहिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ल
लई भारी Tue, 02/07/2017 - 10:41 नवीन
अमेरिकेतील हे उदाहरण किंवा भारतातील घटना यामध्ये या लोकांना आपली इत्यंभूत माहिती मिळते तरी कुठून? एकदा एका क्रेडिट कार्डवालीला मी नोकरी करत नाही असं खोटं सांगितलं(लवकर कटवण्यासाठी आणि जमलं तर पुढील ससेमिरा टाळण्यासाठी), तर तिने माझ्या कंपनी सह माझा पगार पण सांगितला! मला काही शक्यता वाटतात, जाणकारांनी प्रकाश टाकावा: - क्रेडिट कार्ड घेताना आपण पगार-पत्रक देऊन टाकतो एजन्टला. तो त्याच्या प्रति विकत असण्याची दात शक्यता आहे. - आपले टॅक्स-रिटर्न चे वगैरे कागद आपलें ऑफिस किंवा सी.ए. च्या ऑफिस मधून कोणीतरी वापरात असावे? - छोटी कंपनी असल्यास ऍडमिन/फायनांस मधील कर्मचारी अशी माहिती विकत असतील का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत
म
मोदक Tue, 02/07/2017 - 11:03 नवीन
बँकेतली लोकं माहिती विकतात हो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लई भारी
अ
अनन्त अवधुत Wed, 02/08/2017 - 00:08 नवीन
साधारणपणे जिकडे आपण टॅक्स रिटर्न्स भरतो अशा संस्था जास्त मोठ्या प्रमाणात असू शकतात. कारण हि सगळी अद्ययावत माहिती त्यांच्याकडेच असू शकते. आणि संस्था मुद्दाम हि माहिती विकत असेल असे नाही, माहितीची चोरी पण होते. विशेषतः भारतात जिथे प्रत्येक कामासाठी माणूस असतो , तिकडे अशा पद्धतीने माहिती चोरी होण्याचे प्रमाण जास्त असू शकते. उदा. सी ए/ क्रेडिट कार्ड वाला सांगतो कि त्याच्या ऑफिस मधला कोणीतरी आपल्या कंपनी मध्ये इतर काही जणांचे कागदपत्र जमा करायला येणार आहे. तुमचे कागदपत्र पण त्याच्या कडेच द्या. मग ज्याच्या कडे कागदपत्र दिले तो एक कॉपी करून घेतो. अमेरिकेत पण $२५ मध्ये कोणीतरी टॅक्स फाईल करून देतो म्हणून सगळी माहिती आपण त्याला देतो आणि मग अश्या वेळेस माहिती (हॅकिंग किंवा विकत घेऊन) ह्या चोर कंपन्या मिळवतात. $२५ कमी आहेत किंवा जास्त आहेत असा भाग नाही, पण एच & आर ब्लॉक , सिअर्स, टर्बो टॅक्स ह्या टॅक्स फाईल करणाऱ्या कंपन्या ऐवजी कोणी तरी स्वस्तात टॅक्स फाईल करतो म्हणून आपण त्यांच्या कडे विश्वासाने माहिती देतो आणि फसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लई भारी
स
स्मिता. Wed, 02/08/2017 - 10:39 नवीन
पॅरिसमधेसुद्धा असे फ्रॉड कॉल्स येतात. फोन करणारी व्यक्ती भारतीय दूतावासातून फोन करत असल्याचा दावा करून सांगते की तुम्ही इमिग्रेशन फॉर्म चुकीचा भरलेला असल्याने दंड भरा नाहितर अर्ध्या तासात पोलिस तुम्हाला अटक करण्यासाठी तुमच्या घरी पोहोचतील. या लोकांकडे पासपोर्ट क्रमांक, घरचा पत्ता, इ. बरीच माहिती असल्याने नवीन लोकांना सगळं खरं वाटतं. आजपर्यंत अनेक भारतीय विद्यार्थी या स्कॅमला बळी पडले आहेत. गंमत म्हणजे हा फोन ज्या नंबरवरून येतो तो खरंच भारतीय दूतावासाचा नंबर आहे. अनेक वेळा, अनेक लोकांनी तक्रारी करूनही रोज कोणाला ना कोणाला तरी असा फोन आल्याचे कळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त अवधुत
म
मराठी_माणूस गुरुवार, 02/09/2017 - 07:27 नवीन
गंमत म्हणजे हा फोन ज्या नंबरवरून येतो तो खरंच भारतीय दूतावासाचा नंबर आहे.
म्हणजे फोन करणारा माणुस भारतीय दुतावासतलाच आहे आणि तरीही तो सापडला नाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.
स
स्मिता. गुरुवार, 02/09/2017 - 11:41 नवीन
लोकांना फ्रॉड कॉल आल्यावर मोबाईलवर जो नंबर दिसतो तो भारतीय दूतावासातला आहे. आता बाहेरची कोणी तिसरीच व्यक्ती काही तांत्रिक करामती करून तो नंबर दाखवते की दूतावासातूनच कोणी हे करतोय हे सांगणं कठीण आहे. शिवाय खात्री नसतांना दूतावासावरच अश्याप्रकारचा आरोप करण्याचं धाडस कोणी करत नसावं (खरं सांगायचं तर मीसुद्धा नाही करणार)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 02/07/2017 - 03:56 नवीन
माझ्या एका मित्राला अटक करायला ऑफिसर मॅडोना येणार म्हणून सांगितले तर त्याने ऑफिसर स्कार्लेट जॉन्सनला पाठवा म्हणून घोषा लावला. :D शेवटी समोरच्याने कंटाळून फोन ठेवला. खो खो खो =)) =)) =))
  • Log in or register to post comments
अ
अत्रे Tue, 02/07/2017 - 04:22 नवीन
फोन नम्बर काय होता त्याचा? काही उपयोग तरी होईल लेखाचा.
  • Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब Tue, 02/07/2017 - 05:37 नवीन
ट्रू कॉलर मध्ये जाऊन "स्पॅम" असे मार्क करावे , पुढे किमान ट्रू कॉलर वापरणाऱ्या जनतेला तरी आपण वाचवल्याचे पुण्य पदरी पडावे.
  • Log in or register to post comments
ल
लई भारी Tue, 02/07/2017 - 10:34 नवीन
हा घ्या नंबर - ९५२५१४३९७९
तो नंबर बऱ्याच लोकांनी रिपोर्ट केलाय असं दिसत होत, म्हणजे एकच सिम कार्ड बरेच दिवस वापरतोय तो!
हे ट्रू कॉलर मध्येच रिपोर्ट केलेलं दिसलं आणि आम्ही पण केलं. हाच नंबर तो वापरत राहील ह्याची खात्री नाही, तरीपण हा ब्लॉक करून ठेवू शकता.
  • Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन Wed, 02/08/2017 - 15:40 नवीन
बाब्बो वाचून हतबुद्ध झालो , कायदा , लॉ अँड ऑर्डर वैगरे सर्व बहुतेक पुस्तकातच राहिलन बहुतेक
  • Log in or register to post comments
P
palambar Wed, 02/08/2017 - 16:49 नवीन
वरिल लेख वाचुन माहिति मैत्रिणि ला सांगण्याचे ठरव्ले तर त्याच दिवशि तिला फोन आला. नशीब तिला कारर्ड नं माहित नव्हता.
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 02/08/2017 - 18:02 नवीन
आम्हाला आला होता पण मायक्रोसॉफ्टकडून आहे असे सांगितले होते. नवर्‍याला शंका आली. तो शांत बसल्यावर ब्याग्राऊंडला हिंदी बोलणे ऐकू येत होते. "ये तो देसी है" असे म्हणत होते. नवर्‍याने लगेच तक्रार केली होती असे आठवते. हे फक्त भारतातच होतं असं नाही. ऑनलाईन खरेदीची प्याकेजेस, ट्याक्स रिटर्नचे चेक्स, ख्रिसमसाची दरवाजापाशी सोडलेली प्रेझेंटे पळवले गेल्याची माहिती प्रसिद्ध झाल्याचे आठवते आहे. मैत्रिणीला तुम्ही म्हणताय तसा कॉल आला होता. ती म्हणाली कोण पकडायला येणारे त्याला येऊ दे, मी वाट पाहते पण कार्ड नं देणार नाही. अर्थातच कोणी आलं नाही.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या गुरुवार, 02/09/2017 - 07:49 नवीन
हो बरोबर मलाही मायक्रोसॉफ्ट मधुनच फोन आला होता. माय कंप्युटरवर राइट क्लीक करा म्हणत होता. मी म्हणालो की मी लायनक्स वापरतो तर म्हणे "चालेल, तुम्ही माय कंप्युटरवर आधी राइट क्लीक करा" :) मग मी म्हणालो की "कहा से बात कर रहे हो, क्यो सता रहे हो?" तर म्हणे "अरे सरजी कहा हो आप. चलो छोड देते है आपको. :) आणि कट केलान मेल्याने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
इ
इरसाल कार्टं गुरुवार, 02/09/2017 - 09:51 नवीन
माझी बहिण फसली होती, पण सगळे डिटेल्स दिल्यावर तीला संशय आला आणि तीने कार्ड ब्लॉक केले. नाही तर १९ हजार गेल्यात जमा होते.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 02/09/2017 - 12:45 नवीन
सगळे डिटेल्स दिल्यावर तीला संशय आला आणि तीने कार्ड ब्लॉक केले.
कसे ? बँकेत कळवून कार्ड ब्लॉक करता येते हे माहिती आहे, त्याशिवाय इतर काही मार्गांनी ब्लॉक करता येते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल कार्टं
प
पैसा गुरुवार, 02/09/2017 - 13:34 नवीन
डेबिट कार्ड असेल तर मोबाईल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंगमधून कार्ड ब्लॉक करता येते. किंवा बँकेचा २४*७ वाला कार्ड सेंटरचा नंबर जवळ असेल तर त्याना फोन करताच क्रेडिट कार्ड ब्लॉक होते. अक्षरशः एका मिनिटात होउन जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
आ
आदिजोशी गुरुवार, 02/09/2017 - 14:23 नवीन
मला माझ्या पॉलिसीचा प्रिमियम भरण्यासंदर्भात असले कॉल येत असत. १५,००० कॅशने भरले तर १ प्रिमियम माफ वगैरे. सुरुवातीला कंटाळा येऊन नकार दिला. मग गंमत म्हणून मांडवली सुरू केली. होता होता ३,००० हजारात ३ वर्षाचे हफ्ते वळते करायची डील झाली :) मग पैसे घ्यायला राणीच्या बागेत बोलावलं होतं त्याला :) त्यानंतर बिहार मधून डेबिट कार्डवापरून कुणी तरी खरेदी केली आहे, ते ब्लॉक करायचे असेल तर कार्ड नंबर सांगा... असले कॉल येत असत. त्याला ४२०४२०४२०४२०४२०० हा नंबर दिला होता :)
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 02/09/2017 - 14:41 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा