बोल नुपूरांचे
ऐन समयी नित्य येई
त्या लहरींतूनी मंजूळ ध्वनी
तरंगे किनारी फुले सुगंधी
अंतरंगी भावपिसारा पसरूनी
रेशमी हिंदोळ्याच्या शुभ्र तटी
मनोहर निर्झराची मुक्त वाणी
फुलून आल्या दिशा दाही
चोहीकडे हसे वसुंधरा कामिनी
हिरव्या दलांत बोल नुपूरांचे
निळ्या अंबरी चुकली धरणी
💬 प्रतिसाद
(2)
प
पैसा
Wed, 02/08/2017 - 13:15
नवीन
चांगला प्रयत्न.
- Log in or register to post comments
च
चांदणशेला
गुरुवार, 02/09/2017 - 05:48
नवीन
धन्यवाद
- Log in or register to post comments