Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शांत अता या गाजा होणे नाही ..

D — drsunilahirrao, Wed, 02/08/2017 - 05:23
रंक कधीही राजा होणे नाही (त्याचा गाजावाजा होणे नाही) तू राणी आहेस चार भिंतीतच खुला अता दरवाजा होणे नाही तू तेथे मीही येथे आहे पण मला तुझा अंदाजा होणे नाही मी सारे विसरुन चाललो आहे घाव नव्याने ताजा होणे नाही मी नेकी दर्यात टाकली आहे (शांत अता या गाजा होणे नाही) डॉ. सुनील अहिरराव

प्रतिक्रिया द्या
2269 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ग
गवि Wed, 02/08/2017 - 07:51 नवीन
खुला अता दरवाजा होणे नाही ... मला तुझा अंदाजा होणे नाही
इथे जरा ओढाताण झालीय का? तुम्ही स्वतःच आमच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेत.
मी सारे विसरुन चाललो आहे घाव नव्याने ताजा होणे नाही
या दोन ओळींतला एकूण भाव खूप आवडला. यासदृश मूडवाल्या नासिर काजमीच्या दोन ओळी आठवतात: न अब वो यादोंका चढता दरिया न फुर्सतोंकी उदास बरखा यूंही जरासी कसक है दिलमें जो जख्म गहरा था भर गया वो
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao गुरुवार, 02/09/2017 - 05:40 नवीन
मला तसे जाणवले नाही, पण असू शकते.गझलेतून व्यक्त होताना बऱ्याच मर्यादा येतात. विशेषत: मला तुझा अंदाजा होणे नाही,यात. नासिरचा शेर ग्रेट ! खूप खूप धन्यवाद सरजी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
य
योगेश लक्ष्मण बोरोले गुरुवार, 02/09/2017 - 23:59 नवीन
चुटपुट लावणारी कविता ....
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 02/12/2017 - 07:24 नवीन
अगदी! म्हणजे कवितेतली भावना आणि वृत्तात जरा पक्की असती तर अजून छान वाटली असती अशीही चुटपुट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगेश लक्ष्मण बोरोले
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 02/12/2017 - 06:20 नवीन
व्वाह!
  • Log in or register to post comments
स
सत्यजित... Sat, 05/06/2017 - 04:10 नवीन
>>>तू राणी आहेस चार भिंतीतच खुला अता दरवाजा होणे नाही>>>बहोत बढिया! >>>मी नेकी दर्यात टाकली आहे (शांत अता या गाजा होणे नाही)>>>गजब शेर!क्या बात!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा