सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग -७
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ माझा प्रश्न आहे.
* बांधकाम/इमारत अनधिकृत कधी ठरते ?
१)न्यायालयाच्या गाईड लाईन्स काय आहेत ?
२) ७/१२, ८/अ, एन ए (नॉन अॅग्रिकल्चर ), बांधकाम परवाना हे सर्व प्रमाणपत्र असल्यावरही बांधकाम/इमारत अनधिकृत ठरवली जाते का ?
**
आपल्या प्रतिसादासाठी आभारी आहे.
💬 प्रतिसाद
(76)
ए
एमी
Mon, 02/20/2017 - 22:34
नवीन
सदाहरित धागा गुगलल्यास याआधी कमीतकमी ६ भाग झाले होते असे दिसते. रँडम ऑर्डरने काही लिंका
www.misalpav.com/node/34076
www.misalpav.com/node/38815 लेटेस्ट
www.misalpav.com/node/35967
www.misalpav.com/node/37892
www.misalpav.com/node/35297
www.misalpav.com/node/31624
अजोंच्या सिरीजचे तीनेक भाग झाले असतील. अश्या प्रकारच्या प्रश्नांसाठी माबोवर 'माहिती हवी आहे' असा ग्रुप आहे तर ऐसीवर मछोमोप्रआवि अशी धागामालिका. मिपावरदेखील काहीतरी स्टँडर्ड नाव आणि प्रत्येक धाग्याच्या गाभ्यात आधीच्या भागाची लिंक + मालिकेचा उद्देश दिल्यास बरे पडेल.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 02/21/2017 - 10:44
नवीन
टीसीएस च्या संचालक मंडळाने समभाग बायबॅकला मान्यता दिली आहे. भागधारकांच्या संमतीनंतर टीसीएस लोकांकडे असलेले काही समभात रू. २८५० प्रति समभाग या भावाने स्वतःच विकत घेणार आहे. याक्षणी टीसीएस च्या एका समभागाची किंमत रू. २४६८ प्रति समभाग इतकी आहे व मागील ५२ आठवड्यातील सर्चोच्च भाव रू. २७४४ इतका आहे. म्हणजे आपल्याकडील समभाग परत कंपनीला विकून टाकणे चांगलेच फायद्याचे आहे.
माझ्या काही शंका -
१) एखादी कंपनी आपले समभाग बायबॅक करण्यामागे काय कारणे असतात?
२) या योजनेत आपल्याकडील सर्व समभाग विकता येतात का त्यातील काही ठराविक टक्के समभागच विकता येतात?
३) या योजनेद्वारे कंपनीला परत विकत दिलेल्या समभागांमुळे जो भांडवली नफा होतो (अल्पकालीन किंवा दीर्घकालीन) तो करपात्र असतो का करमुक्त असतो?
४) एखादी कंपनी आपले समभाग बायबॅक करणार असेल तर कंपनीची आर्थिक स्थिती उत्तम आहे किंवा फारशी चांगली नाही असा निष्कर्ष काढता येतो का?
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Tue, 02/21/2017 - 11:38
नवीन
कंपनीच्या स्थितीप्रमाणे वेगवेगळी कारणं असू शकतात. उदा० प्रायव्हेट / क्लोजली हेल्ड पब्लिक कंपनी बायबॅक करण्याची कारणं म्हणजे भागधारकांच्या शेअरहोल्डिंगची टक्केवारी बदलणे. टीसीएससारखी लिस्टेड कंपनी बायबॅक करते तेव्हा भविष्यातला डिव्हिडंड कमी करणे (पर्यायाने उरलेल्या शेअरहोल्डर्सना जास्त डिव्हिडंड देणे), ईपीएस (अर्निंग्ज पर शेअर) सुधारणे (पर्यायाने शेअरची किंमत वाढवणे) अशी विविध कारणं असू शकतात.
टीसीएसच्या बाबतीत काहीतरी एम-अॅण्ड-ए अॅक्टिव्हिटी होणार अशी शंका मला बरेच दिवसांपासून आहे. (टीसीएस कोणतीतरी मोठीशी कंपनी विकत घेईल किंवा जायंट कंपनीला विकली जाईल किंवा टीसीएस आणी अजून एक मोठी कंपनी एकत्र येतील.) त्याचा प्रीकर्सर म्हणून या बायबॅक केला असण्याची शक्यता आहे. (हे अर्थात स्पेक्युलेशन आहे...)
ते टीसीएसच्या 'स्कीम'वर अवलंबून आहे.
बायबॅक करताना शेअरहोल्डर सिक्युरिटीज ट्रान्झॅक्षन टॅक्स (एसटीटी) भरेल. असा एसटीटी भरला असेल तर दीर्घकालीन भांडवली नफा टॅक्स फ्री असेल, तर अल्पकालीन करपात्र असेल.
बायबॅक झाला म्हणजे कंपनीकडे ते शेअर्स विकत घ्यायला कॅशही आहे आणि 'संचित नफा' (फ्री रिझर्व्हज) ही आहेत. पण फक्त बायबॅक या घटनेवरून असा काही निष्कर्ष काढू नये असं माझं वैयक्तिक मत.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Tue, 02/21/2017 - 12:01
नवीन
बहूधा टाटा टेक्नॉलॉजिज ही कंपनी टीसीएस मध्ये मर्ज होईल
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 02/21/2017 - 12:38
नवीन
उत्तम माहिती. धन्यवाद!
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
गुरुवार, 03/02/2017 - 03:21
नवीन
पुण्यात चांगले चेत्तीनाड चिकन कुठे मिळेल?
बजेट अंदाजे ५०० पर हेड
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 03/04/2017 - 16:13
नवीन
मराठी नाटकाबद्दल माहिती हवी आहे.
दोन अंकी, दोन पात्री (एक स्त्री व एका पुरुष) असलेलं कोणतंही चांगलं नाटक माहित आहे काय कोणाला?
नाटकाची ऑनलाइन पीडीएफ मिळाली तर उत्तमच!
ऐतिहासिक, विनोदी, गंभीर कशाही जॉनर चे चालेल!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 03/05/2017 - 10:14
नवीन
माझ्या पसंतीक्रमानुसार -
१) समुद्र (चिन्मय मांडलेकर आणि स्पृहा जोशी)
२) साठेचं काय करायचं? (निखिल रत्नपारखी आणि अमृता सुभाष)
३) यू टर्न (गिरीश ओक आणि इला भाटे)
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 03/05/2017 - 10:17
नवीन
खूप खूप धन्यवाद!
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 03/05/2017 - 12:56
नवीन
अजून २ माहिती आहेत.
४) आरोप (ले. सुरेश खरे) - हे दोनपात्री रहस्यमय नाटक ८० च्या दशकात गाजले होते. जयराम हर्डीकर या नाटकात होता.
५) ९० च्या दशकातील या नाटकात विक्रम गोखले व एक अभिनेत्री होती. नाटकाचे नाव आठवत नाही.
- Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन
Fri, 03/10/2017 - 12:26
नवीन
मुंबई मध्ये cst जवळ काल कॉइनबॉक्स / std बूथ शोधात होतो ,कोणी सांगू शकेल जवळपास ?
- Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन
Fri, 03/17/2017 - 22:53
नवीन
हिंजवडी हुन रात्री बस सेवा असेल का ?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 03/18/2017 - 04:12
नवीन
Check http://www.metrozip.in for night bus service from Hinjawadi.
- Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन
Sat, 03/18/2017 - 08:21
नवीन
धन्यवाद
पण त्या डांगे चौक च्या पुढे नाहीयेत
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 04/01/2017 - 17:39
नवीन
चांगला रूम एअर कंडीशनर हवा आहे. चांगली कंपनी, ब्रँड, किंमत, इतर माहिती इ. सांगावे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 04/01/2017 - 18:15
नवीन
गरज आणी बजेट?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 04/01/2017 - 19:33
नवीन
- अंदाजे २२० स्क्वेअर फूट खोली
- बजेट ३०-४० हजार
- Log in or register to post comments
ए
एमी
Mon, 08/07/2017 - 03:02
नवीन
खरडी डिलीट करतायेत नाहीत का :-(
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Tue, 08/22/2017 - 03:27
नवीन
मी नुकतंच आयफोन वरुन सॅमसंगवर शिफ्ट झाले. आधी मिपावर आलं की मोबाईलवरुनही डायरेक्ट मराठी टाईप होत होतं होणताही कीबोर्ड नसताना. पण सॅमसंग मधुन मात्र आता इंग्रजीतुन टाइप होतं. असं का होतं? मिपावरच्या पर्यायातुन भाषा मराठीच निवडली आहे.
लिपीकार विषयी ऐकलं म्हणुन तो डालो करायला गेले तर ते म्हणतं की हा कीबोर्ड क्रेडिट कार्ड नंबर वगैरे ही माहिती सुद्धा जमा करेल. हे पुर्वी सुद्धा एकदा वाचले होते दुसर्या किबोर्ड विषयी.
आता कसे करावे?
- Log in or register to post comments
क
कंजूस
Tue, 08/22/2017 - 03:54
नवीन
बरेचजण गुगल इंडिक डाउनलोड करतात. त्यातून मराठी निवडली की झाले काम.
किबोर्ड english/english-मराठी/देवनागरी-मराठी टॅागल होतो झटपट.
बाकी android चा काहीच भरोसा नसतो कुठे काय चेरतील. (विंडोज भारी काम होतं पण कशाला बंद केलं)
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Tue, 08/22/2017 - 14:52
नवीन
अशीच वोर्निंग इंडिक ला सुद्धा आली, तरी केला डालो!
धन्यवाद काका!
- Log in or register to post comments
ए
एमी
गुरुवार, 01/11/2018 - 12:18
नवीन
या वर्षी किती अंक, स्पर्धाचा प्लॅन आहे साहित्य सम्पादकांचा?
- Log in or register to post comments
ए
एमी
Mon, 01/15/2018 - 06:01
नवीन
किंडलवरची पुस्तकं वाचून दाखवणार कोणतं ऍप आहे का?
- Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन
Fri, 11/08/2019 - 05:29
नवीन
मला हापिसा मध्ये चहा खूप प्याची सवय आहे पण मॅनेंजर भोचक ,टेबलावर चहाचा डाग जरी पडला तरी येऊन बारकाईने निरखून जातो , बर दरवेळी पॅन्टरी मधून फडका आणून साफ करणे बरे दिसत नाही ,काय करावे ?
- Log in or register to post comments
अ
अनिकेत वैद्य
Fri, 11/08/2019 - 06:10
नवीन
डेस्क ड्रॉवर मध्ये पेपर नॅपकिन आणून ठेवा. चहाचा कप शक्यतो पेपर नॅपकिन वर ठेवा. किंवा डेस्क खराब झाल्यास लगेच पेपर नॅपकिन ने स्वच्छ करता येईल.
- Log in or register to post comments
अ
अनिकेत वैद्य
Fri, 11/08/2019 - 06:10
नवीन
डेस्क ड्रॉवर मध्ये पेपर नॅपकिन आणून ठेवा. चहाचा कप शक्यतो पेपर नॅपकिन वर ठेवा. किंवा डेस्क खराब झाल्यास लगेच पेपर नॅपकिन ने स्वच्छ करता येईल.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2