आकर्षण, प्रेम आणि जवळीक
आज प्रथमच त्याने तिचा हात हातात घेतला आणि दोघांच्या हृदयाचे ठोके वाढले, अंगावर रोमांच उभे राहिले. प्रेमाचे ते काहीच क्षण पण खूप काही देवून गेले. पुढचे कित्येक तास ती हुरहुर मनात पिंगा घालत राहिली. एकमेकांबद्दलच्या प्रेमाने आणि शारिरिक आकर्षणाने दोघे संमोहित झालेत.
हा अनुभव.. खूपच रोमांचक वाटतो , हो ना ?
***********************************************************
पण प्रश्न पुढचा आहे. त्याची ,तिची जवळीक अधिकृतरीत्या समाजमान्य झाली. दोघांचे लग्न झाले. काही वर्षे गेलीत.. चाळीशी जवळ आली..म्हंटलं तर तरुण म्हंटलं तर थोडं वय होत आहे... आता हातात हात घेतल्याने अंगावर रोमांच उभे रहात नाहीत, त्याच्या वा तिच्या स्पर्शाने मनात हुरहुर निर्माण होत नाही... ती एक चांगली व्यक्ती आहे, तो ही चांगला आहे. एकमेकांबद्दलची काळजी आदर, प्रेम अजूनही कायम आहे. पण आधी होतं तसं जबरदस्त शारिरीक आकर्षण आता वाटत नाही (एकतर त्याला किंवा तिला..हे कुणाबद्दलही होवू शकतं पण सध्या जास्त करुन त्याच्याबद्दल लिहित आहे) ..तसं म्हंटलं तर तो अजून तरुण आहे, जवळून सुंदर , तरूण मुलगी गेली की हमखास वळून पहातो, पण पत्नीकडे पुन्हा वळून पाहावे असे वाटत नाही. ती चांगली वागते, त्याची तिच्याबद्दल काही तक्रार नाही पण तरी विशेष आकर्षण वाटत नसल्याने तो शारिरिक जवळीक फारशी करत नाही. असं करुन आपण तिच्यावर अन्याय करतो आहे असंही त्याला वाटतं , पण शरीराने ओढ दिल्याशिवाय जवळीक करण्यात त्याला रस वाटत नाही. तो दुसर्या स्त्रीशी जवळीक करतो आहे असंही नाही. पण तरी त्याची-तिची बराच काळ जवळीक होत नाही.
प्रत्येक लग्नात (किंवा तत्सम दीर्घकालीन स्त्री-पुरुष संबंधात) हे असं (एका बाजूने अथवा दोन्ही बाजूने ) होत असावं का ? यावर उपाय काय ? आहे तसं चालू द्यावं का ? की शरीराने ओढ दिली नसतानाही स्वतःच्या शरीराला जवळीक करण्याची आज्ञा देत रहावं का ?
हा विषय तुम्हाला महत्वाचा वाटतो का ? मला वाटतं हा विषय बहूधा कधी मिपावर चर्चिला गेला नसावा. बहूधा कुणाला स्वतःचे अनुभव सांगणे प्रशस्त वाटणार नाही पण जनरिकली चर्चा होवू शकते.
आमच्यासारख्या प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची तुम्ही दिशाभूल करत आहात आणि आमचे खरडण्याचे कष्टही वाया घालवलेत.दाखवा आता हे डांग्यांना . आणि खरी गंमंत तर पुढेचे ... मूळ समस्या तशीच राहाणारे ! मग काय झाला उपयोग सदस्यांचा वेळ घेऊन ? आणि डांगे कुणाला शिकवतात सुसंस्कृतपणा ?संक्षि, तुम्हाला या विषयावर नेहमीप्रमाणे भरभरुन एक्स्पर्ट गायडन्स करायचे आहे पण धागालेखक एकाच फांदीवर बसत नाहीये म्हणून तगमग होत आहे काय?मला सदस्याची पूर्ण बॅकग्राऊंड माहिती आहे (त्यांच्या इथल्या लेखनावरुन), त्यांचा नक्की प्रॉब्लमही माहितीये आणि नेमकं उत्तरही माहिती आहे. मी उगीच इकडून तिकडून काल्पनिक प्रश्नांना उत्तरं देण्याची फेकाफेका करत नाही आणि एखाद्याला सोडवावं ही माझी प्रामाणिक इच्छा असते (अर्थात याचा तुम्हालाही अनुभव असेलच). अगदी लेटेस्ट सांगायचं तर पिराचे आणि माझे इतके वाद असून सुद्धा तिच्या प्रश्नाला मी दिलेली उत्तरं तीनंही तितक्याच दिलखुलासपणे अॅप्रिशियेट केलीयेत. सबब मला तुमच्याकडून कोणत्याही उपदेशाची गरज नाही.