Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझी एक गोची होते

अ — अनन्त्_यात्री, Mon, 02/13/2017 - 06:18
वृत्तबद्ध लिहिताना माझी एक गोची होते यमक जुळवू जावे तर अलगद काही निसटून जाते माझी कविता "जुळत" नाही टोटलच बघा लागत नाही (अन जुळलीच बेटी चुकून तर..) कमावलेली कृत्रिमता हट्टीपणे हटत नाही कवितेचे झटपट वर्ग कुठे कोणी घेतं का? असल्यास जरा सांगा मला प्रतिभा विकत मिळते का? (एक कोडं सुटत नाही ...) भावना इतक्या तरल कशा? शब्द इतके रुक्ष कसे ? मग त्याची कविता वाचता वाचता डोळ्यात पाणी येतेच कसे?

प्रतिक्रिया द्या
2697 वाचन

💬 प्रतिसाद (16)
च
चांदणे संदीप Mon, 02/13/2017 - 06:35 नवीन
खोल खोल रूतलेल तसंच सोडून दिलेलं पुन्हा कधीतरी सललं, पहिला पाऊस पडल्यावर जुन्या वाळक्या खोडातून नवं काहीतरी फुटलं, कितीही खंबीर होऊन तटस्थ, व्रतस्थ राहिलो तरी आत गलबललं, विसरलेला कप्पा आवरताना तासनतास खिळवणारं काहीतरी गवसलं, जाणिवेत जवळ नसणारं पण आठवणीत हसणारं एक कुणी असलं, मित्रांच्या संगतीत, निवांत रात्रीच्या रंगल्या गप्पात तिचं नाव निघालं, की… …कविता होते! नाहीतर... गोची होते! :) Sandy
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Mon, 02/13/2017 - 06:53 नवीन
नाहीतर... गोची होते! :) हे नसतं तरी चाललं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
च
चांदणे संदीप Mon, 02/13/2017 - 10:38 नवीन
नाहीतर... गोची होते! :)
हे फक्त कवीसाठी आहे.... इतरासांठी नाही! :) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
सस्नेह Mon, 02/13/2017 - 08:42 नवीन
संदीप भौ, वाईच मोठ्ठी लिवा की !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
च
चांदणे संदीप Mon, 02/13/2017 - 10:40 नवीन
परत केव्हातरी लिहितो... हे आत्ता हायज्याकिंग मोडवर चाललंय... :प Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
अ
अभ्या.. Mon, 02/13/2017 - 12:47 नवीन
सॅन्डीबाबा, तेरा हायज्याकिंग मेरेकू लैच आवड्या हय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
अ
अभ्या.. Mon, 02/13/2017 - 12:49 नवीन
इत्ता आवड्या हय, इत्ता आवड्या हय, इत्ता आवड्या हय..... की विडंबन पाडनेको ........(कवाआली टाळ्या देऊन) जी चाहता हय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
च
चांदणे संदीप Mon, 02/13/2017 - 15:06 नवीन
इर्शाद घ्या! :प Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ज
जव्हेरगंज गुरुवार, 02/16/2017 - 13:57 नवीन
लय भारी!! एकदम काळजातली!! वरची आणि खालची दोन्ही कविता बेस्ट!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
अ
अनन्त्_यात्री Mon, 02/13/2017 - 06:47 नवीन
स॓दीप, क्या बात है!!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Mon, 02/13/2017 - 10:41 नवीन
लिहीत राहा! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री
प
पैसा Mon, 02/13/2017 - 11:13 नवीन
आवड्या. कविता आणि संदीपभौ ची कविता सुद्धा.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 02/16/2017 - 05:38 नवीन
खिक्क....यमके गुर्जींना संपर्क करा
  • Log in or register to post comments
द
दीपा माने Mon, 02/20/2017 - 03:44 नवीन
मोजक्या शब्दांत अमाप अर्थ दाखवण्यातली तुमची प्रतिभा आवडली.
  • Log in or register to post comments
द
दीपा माने Mon, 02/20/2017 - 03:45 नवीन
मोजक्या शब्दांत अमाप अर्थ दाखवण्यातली तुमची प्रतिभा आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Wed, 02/22/2017 - 05:29 नवीन
जव्हेरग॑ज, स॑दीप, पैसा, दीपा...धन्यवाद!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा