Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रेम

प — पराग देशमुख, Tue, 02/14/2017 - 07:38
प्रेम म्हणजे साला , अंधार झालाय अंधार . अब्रू वेशींवर टांगलेली नि, भावनांचा चाललेला व्यापार . नजर वखवखणारी असूनही येथे, कोवळ्या कळ्यांना धुमारे फुटू लागतात. अन प्रेमाचा पाऊस पडला तरी कुजण्याइतकी, नात्यांची बीजे भिकार असतात. पैशाच चामडं पांघरून इथ , वासानेच कोल्हं सोकावत. संस्कृतीने झाकलेल सार मग, पेपरातन डोकावत . माग चालताना पश्चिमेच्या , कोवळी उन्हं पोळायला लागतात. महागड्या सिगरेटच्या ठिणग्या , गरीबाची घरं जाळायला लागतात . प्रेम-बीम काही नाही , हि मायबापांच्या अपेक्षांची होळी असते. पोरं नागवी नाचून मोकळी.अन , मायबापांच्या हाती झोळी असते . आपली कामं नीट न केली कि हि नसती थेरं सुचू लागतात. अन , ऊसाला टाकलेल्या urea ने, गाजर-गवताला पेरं फुटू लागतात. ....................................................................................................................-मुकुंद

प्रतिक्रिया द्या
876 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा