मोबाईल घेण्यासंदर्भात मदत हवी आहे.
… त्याचे झाले असे माझा भ्रमणध्वनी गेली दोन वर्षं आपल्या धन्याची इमाने इतबारे त्याच्या वकुबाप्रमाणे चाकरी करत होता…पण अचानक गत आठवड्यात असहकाराचे निशाण उगारले… आता झाली का पंचाईत ! आता कसं करायचं आणि काय करायचं असा यक्षप्रश्न अस्मादिकासमोर उपस्थित झाला ? येत्या मराठी दिनाच्या निमित्ताने नवीन भ्रमण ध्वनी घेण्याचे योजत आहे… तरी कोणता भ्रमण ध्वनी घ्यावा हा गहन पेच अस्मादिकांस पडला आहे… तरी मिपाकर हा गुंता सोडवण्यास नेहमी प्रमाणे मदत करतील हीच आशा बाळगतो… माझे budget रु. १३०००/- आहे. तरी मिपाकरांनी विविध पर्याय सुचवावे. भ्रमण ध्वनीत प्रगत तंत्रज्ञान असणे अपेक्षित. वरील विषयावर साधक बाधक चर्चा होणे अगत्याचे आहे. जास्तीत जास्त पर्याय सुचवावे आणि ते का योग्य आहेत ह्याचा उहापोह झाल्यास दुधात केशरच…. मिपाकर आणि मिपा व्यासपीठाचा आभारी !
ता.क. - MI -४ note च्या specifiaction सारखे अजून कोणते मोबाईल बाजारात उपलब्ध आहेत ह्याविषयी ऊहापोह व्हावे ही नम्र विनंती.
घेतल्यावर फक्त कोणता घेतला तेवढं सांगा म्हणजे झालं, कारण मतदान केल्यावर कोण निवडून आला हे समजलं नै तर उगीचच व्होटिंग कार्ड फाडून टाकावं असं एक दोन दिवस वाटत राहतं.हे बाकी झकास !