Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

महापालिका, जिल्हा परीषद निवडणूक निकाल

श
श्रीगुरुजी
Tue, 02/21/2017 - 18:46
🗣 296 प्रतिसाद
महापालिका व जिल्हा परीषद निवडणूक निकालांसाठी धागा. http://www.loksatta.com/bmc-elections-2017/bmc-election-2017-exit-polls-results-pmc-elections-2017-exit-polls-results-thane-municipal-corporation-election-bjp-shivsena-congress-ncp-1415185/ इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असून, भाजपच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इंडिया टुडे आणि अॅक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार, शिवसेनेला मुंबईत ८६ ते ९२ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्या खालोखाल भाजपला ८० ते ८८ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. २०१२ मधील निकालांचा विचार केल्यास भाजपच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीचा परिणाम एक्झिट पोलमध्येही दिसून येतो आहे. काँग्रेसला ३० ते ३४ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ३ ते ६ जागांवरच यश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भाजप व शिवसेना या दोघांनाही ३२% मते मिळतील असा अंदाज आहे. पुणे महापालिकेत सत्तांतर होण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. पुण्यात गेल्या १० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आहे. पण या निवडणुकीत भाजपला पुण्यात स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तविला आहे. एकूण १६२ जागांपैकी ७७ ते ८५ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला ६० ते ६६ जागा मिळण्याची शक्यता आहे. ठाण्यामध्ये शिवसेना सत्ता राखण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. या महापालिकेत विशेष म्हणजे भाजप तिसऱ्या क्रमांकावर घसरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस २९ ते ३४ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागपूर महापालिकेत भाजपच पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून, भाजपला ९१ ते १०० जागा मिळण्याची शक्यता आहे. या महापालिकेत एकूण १५१ जागा आहेत. मुंबई - शिवसेना – ८६ ते ९२ भाजप – ८० ते ८८ काँग्रेस – ३० ते ३४ मनसे – ५ ते ७ राष्ट्रवादी – ३ ते ६ पुणे - भाजप – ७७ ते ८५ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस – ६० ते ६६ शिवसेना – १० ते १३ ठाणे - शिवसेना – ६२ ते ७० राष्ट्रवादी काँग्रेस – २९ ते ३४ भाजप – २६ ते ३३ नागपूर - भाजप – ९१ ते ११० काँग्रेस – ३५ ते ४१ शिवसेना – २ ते ४ _________________________ एबीपी माझा च्या अंदाजानुसार पिंचि मध्ये राष्ट्रवादी, नाशिकमध्ये सेना आणि अकोला, अमरावती व सोलापूर मध्ये भाजप प्रथम क्रमांकावर असेल. _________________ दिल्ली व बिहार च्या कटु अनुभवापासून मी कोणत्याही सर्वेक्षणावर विश्वास ठेवणे बंद केले आहे.
वर्गीकरण
निवडणूक

प्रतिक्रिया द्या
49270 वाचन

💬 प्रतिसाद (296)
ध
धर्मराजमुटके Wed, 02/22/2017 - 04:10 नवीन
तुम्ही सतत राजकीय घडामोडींवर लक्ष ठेऊन असता त्यामुळे तुमचे निकालपुर्व अंदाज वाचायला आवडतील.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 02/22/2017 - 10:32 नवीन
माझे अंदाज या धाग्यात दिले आहेत. इथे पुनरावॄत्ती करीत नाही. ईंडिया टुडे - अ‍ॅक्सिस च्या अंदाजाप्रमाणेच झी-२४ तास ने देखील आपल्या मतदानोत्तर सर्वेक्षणावर आधारीत जागांचा अंदाज दिला आहे. त्यांच्या अंदाजानुसार खालील परिस्थिती असेल. मुंबई - शिवसेना ९०-९६, भाजप ७८-८२, काँग्रेस २७-३०, राष्ट्रवादी ३-५, मनसे ७-९ ठाणे- शिवसेना ६०-६५, भाजप २०-२५, काँग्रेस ३-५, राष्ट्रवादी २८-३०, मनसे २-३ नागपूर - शिवसेना ४-६, भाजप ८४-८७, काँग्रेस ३४-३६, राष्ट्रवादी ४-६, मनसे ०-२ पुणे - शिवसेना १२-१७, भाजप ५५-६०, काँग्रेस १६-२१, राष्ट्रवादी ५५-६०, मनसे ६-११ दोन्ही वृत्तसस्थांचे अंदाज एकमेकांशी सुसंगत आहेत. त्यात फारसा फरक नाही. माझे मत वेगळे आहे. महापालिका निवडणुकीचे यापूर्वी कधी सर्वेक्षण केले होते का याविषयी माहिती नाही. परंतु इतक्या मायक्रो लेव्हलला सर्वक्षण करून अंदाज काढणे फारसे शक्य वाटत नाही. लोकसभा निवडणु़कीचा बराचसा अचूक अंदाज काढता येतो कारण त्या निवडणुकीत कोणताही एक मतदारसंघ घेतला तरी सॅम्पलमध्ये विविधता जास्त प्रमाणात असते. महापालिका निवडणु़कीत एखादा विशिष्ट प्रभाग म्हणजे काही जवळ्पासच्या गल्ल्या असू शकतात व तिथे राहणार्‍या नागरिकांमध्ये विविधता खूप कमी प्रमाणात असते. पुण्यात सदाशिव, शनिवार, नारायण इ. पेठांमधील प्रभागात सर्वेक्षण केले तर बहुतेक एकतर्फी अंदाज व्यक्त होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे इतक्या मायक्रो लेव्हलला सर्वेक्षण करणे हे एक धाडस आहे. वरील दोन्ही अंदाजावरून काही शंका येताहेत. नागपूरमध्ये जरी भाजपचे प्राबल्य असले तरी एखादी लाट असल्याप्रमाणे तिथे भाजपला संपूर्ण बहुमत किंवा त्यापेक्षा कितीतरी जास्त यश मिळेल असे वाटत नाही. मागील निवडणुकीत १५२ पैकी ६२ जागा भाजपकडे होत्या. त्यात फार तर १०-१२ जागांची भर पडू शकेल. परंतु ९० पेक्षा जास्त किंवा अगदी ११० जागा मिळतील यावर विश्वास बसणे कठीण आहे. मुंबईत राष्ट्रवादीचा फारसा प्रभाव नसला तरी त्यांना तिथे २०१२ मध्ये १२ जागा होत्या. त्यात घट होऊन जेमतेम ३-६ जागा मिळणे इतकी अधोगती होईल असे वाटत नाही. ते पूर्वी इतकेच किंवा त्याच्या आसपास यश मिळवतील असे वाटते. पुण्यात सुद्धा भाजप सर्वात मोठा पक्ष नक्की होईल, परंतु पूर्ण बहुमत मिळेल असे वाटत नाही. अ‍ॅक्सिसच्या अंदाजानुसार जर भाजप व सेना या दोघांनाही ३२% मते मिळणार असतील तर अगदी अर्ध्या टक्क्याचा फरक सुद्धा किमान १०-१२ जागा इकडून तिकडे हलवू शकतो. त्यामुळे तिथे ठाम निष्कर्ष काढणे अवघड वाटते. बघूया उद्या काय होतंय ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
प
पैसा Wed, 02/22/2017 - 04:35 नवीन
प्रत्यक्ष निकाल येतात तेव्हा वेगळेच काहीतरी घडलेले असते. एका मित्राच्या फेसबुक वॉलवरून साभार -
ह्या # एक्झिट_पोल वर आधारित चर्चा म्हणजे, डिलीव्हरीसाठी बायकोला आत नेल्यावर हातात असलेल्या रिकाम्या वेळात मुलगा होईल का मुलगी हा अंदाज बांधून, बाळाचं नाव ठरवून.... त्या नावानी शाळेचा फॉर्म भरणाऱ्या अस्वस्थ बापासारखे उद्योग आहेत!! काढा की # कळ दोन दिवस....।।।।
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 02/22/2017 - 07:14 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
संदीप डांगे Wed, 02/22/2017 - 08:04 नवीन
अगदी अगदी! ह्या पोल्स चा जनतेला नक्की काय उपयोग आहे हे माहित नाही, पण उपयोगहीन कोणतीही गोष्ट माध्यमांकडून घडत नाही... शोधले पाहिजे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 02/22/2017 - 08:34 नवीन
जनतेला उपयोग वगैरे काही नाही, ते पोल्सचे कार्यक्रम लोक बघतातकी मन लावून! मग टीआरपी मिळतो दुसरं काय? बहुतेक चॅनेल्स सेफ गेम खेळताना दिसतात. सगळ्यांचे अंदाज एकमेकांपेक्षा फार वेगळे नसतात. चुकले तर सगळ्यांचेच चुकले त्यामुळे तुमच्यापेक्षा आमचं बरोबर वगैरे कोण बघत बसणार. राजकारणात इंटरेस्ट घेणाऱ्यांसाठी शुद्ध करमणुकीचा कार्यक्रम असतो असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
त
तुषार काळभोर Wed, 02/22/2017 - 07:42 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/22/2017 - 08:30 नवीन
असं कसं, असं कसं ?! या दोन दिवसात घातला जाणारा धुमाकूळ जनता मोठ्या आवडीने पाहते आणि त्यामुळे वर गेलेल्या टीआरपीप्रमाणे टीव्हीवरील जाहिरातींचे दरही वर जातात... असे सुगीचे दिवस कोण चुकवेल ?! ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
त
तुषार काळभोर Wed, 02/22/2017 - 08:40 नवीन
केवळ अंदाज - चुकू शकतात, बरोबर आल्यास अभ्यास करून अंदाज व्यक्त केल्याचा दावा केला जाणार नाही. पुण्यात भाजप – ६५ - ७०/ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस – ५०-६० / शिवसेना – २०-२५ /मनसे- ५-१० / अपक्ष-इतर - ०-५ पुण्यात मनसेला दहा हासुद्धा अगदी फारफेच्ड अंदाज आहे. मनसे पुण्यात नसल्यासारखीच होती. तुलनेत रिपाइं तरी भाजपसोबतच्या युतीमुळे नोटिस्ड झाली. यावेळी भाजप वि आघाडी अशीच निवडणूक झाली. शिवसेनेला केवळ पूर्वसंचितावर काही पारंपारिक जागा मिळतील. निवडणुकीनंतर शिवसेनेचा आधार महत्वाचा असू शकतो (भाजप-आघाडी दोघांसाठी) नाशकात मनसे इतक्या खाली जाईल असे वाटत नाही. (आबप-माझा चा अंदाज पत्रकारांच्य मतांवर ठरवलेला आहे). तिथला काहीच अंदाज नाही, पण मनसे तिथे असावी अशी इच्छा/ अपेक्षा आहे. मुंबईत भाजपा/शिवसेनेला परस्परांशी युती करण्यावाचून पर्याय नसेल.(नसलाच पाहिजे, मनसे/राष्ट्रवादी/कॉन्ग्रेसची साथ घेण्यापेक्षा त्यांनी परस्परांशी निवडणुकोत्तर युती करावी). ठाण्यात राष्ट्रवादीने भाजपला मागे टाकले तर आश्चर्य वाटेल. जिप/पंस मध्ये काँ-राकाँचा वरचष्मा राहील. नगरपालिकांप्रमाणे भाजपला तितकेसे स्पेक्टॅक्युलर यश मिळणार नाही. ** परत एकदा : हे सर्व अंदाज आहेत.
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Wed, 02/22/2017 - 09:00 नवीन
स्वतः केलेल्या कामांचा अहवाल दाखवून मते मागणाऱ्या मनसेला निवडणुकीत यश मिळाले असे वाटत राहते. विधानसभेला देखील राज ठाकरे महाराष्ट्राविषयीचे व्हिजन डॉक्युमेंट दाखवत असतानाच भाजप-सेना यांचा काडीमोड झाला आणि सगळं फुटेज त्यांना मिळालं. निदान काहीतरी वेगळा विचार तरी त्यांनी मांडला आहे सातत्याने! मीडिया फक्त मारामारी भांडण यांनाच महत्व देतो असे वाटते. जर त्यांनी खरंच काम करून दाखवली असतील तर निदान नाशिक मध्ये तरी मनसे राहावी.
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 02/22/2017 - 10:27 नवीन
जर त्यांनी खरंच काम करून दाखवली असतील तर निदान नाशिक मध्ये तरी मनसे राहावी.
याच्याशी प्रचंड सहमत! तसे होण्याची शक्यता कमी आहे तरी ते घडावेच असे वाटते. नाहीतर याचा अर्थ सरळ आहे, जनतेसाठी विकास आणि त्याची प्रचारातील मांडणी हा निवडणुकांच्या वेळी महत्वाचा मुद्दा नाही. त्यामुळे पुढच्या निवडणुकांचा प्रचार आताच्या शिवसेना भाजपच्या प्रचारापेक्षा फार वेगळा नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
म
मोदक Fri, 02/24/2017 - 06:33 नवीन
राज ठाकरे / मनसे पण निवडणूक लढवत आहेत हे खूप उशीरा कळाल्यासारखे झाले. त्यात त्यांची नाशकातली प्रतिमा म्हणजे "इतका दंगा करत होते तर नाशिक मिळवून काय दिवे लावले..?" अशीच होती. जर खरंच चांगले काम केले असेल तर सुरूवातीपासून तसा दंगा करणे आवश्यक होते. कितीही सॉलिड मुद्दे असले तरी, शेवटच्या चार दिवसात समोर आल्याने (आणि त्यांच्या ट्रॅक रेकॉर्ड नुसार) ते चमकोगिरी वाटले असण्याची शक्यता आहे. एकंदरीत त्यांचे मार्केटिंग कमी पडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
स
संदीप डांगे Wed, 02/22/2017 - 09:06 नवीन
माझ्या अंदाजाप्रमाणे... निवडणुक लढवलेल्या सर्व उमेदवारांमधून कोणी ना कोणी शंभर टक्के निवडून येणार आहे. लावा पैज! :-)
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 02/22/2017 - 17:31 नवीन
तुमचा अंदआहे१००% बरोबर आहे ! मात्र मी १०१% सांगतो की काही उमेदवार शिवसेनेचे, काही भाजपा, राकाँ, काँग्रेस आणि इतर पक्षांचे देखील निवडून येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 02/22/2017 - 17:36 नवीन
तुमचा अंदाज साफ चुकणार आहे ह्याची तुम्हाला अजिबात माहिती नाही, अभ्यास वाढवा आणि सुमडीत पारडे फिरवणार्‍या 'अपक्षां'नाही ध्यानात ठेवत चला...! =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ध
धर्मराजमुटके Wed, 02/22/2017 - 17:48 नवीन
आन ते लगे हाथ 'मोठे व्हा' आशिर्वाद बी देऊन टाका जी ! =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 02/22/2017 - 17:54 नवीन
पुढच्या प्रतिसादासाठी राखून ठेवला होता.. पण लहान मुलांसारखा उतावीळपणा करुन तुम्ही सर्व सोंगट्या उचलून खेळ बंद पाडला... 'मोठे व्हा' इतकंच म्हणेन! =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
आ
आदूबाळ Wed, 02/22/2017 - 10:33 नवीन
कब है निकाल?
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 02/22/2017 - 10:38 नवीन
उंद्या हाय झान्गडगुथ्था!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 02/23/2017 - 05:37 नवीन
आत्ता थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारपर्यंत चित्र स्पष्ट व्हायला हरकत नाही. आता कोणता पक्ष कोठे बहुमतात येतो, कोणता पक्ष दुसर्‍या पक्षाबरोबर वैचारीक युती करतो आणि कोणता पक्ष दुसर्‍या पक्षाबरोबर चुंबाचुंबी आणि शय्यासोबत करतो ते पाहणे रोचक ठरेल.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 02/23/2017 - 05:42 नवीन
ख्यिक!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 02/23/2017 - 05:38 नवीन
मतमोजणी सुरू झाली आहे. पहिले कल लवकरच हाती येतील. "मुंबईकरांच्या हितासाठी आम्ही एकत्र येत आहोत" हे आज संध्याकाळी कोणकोण म्हणणार एवढेच बघायचे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंत८२ गुरुवार, 02/23/2017 - 05:48 नवीन
अमरावतीत भाजपच्या रिता पडोळे यांची बिनविरोध निवड, पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचे रवी लांडगे बिनविरोध
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 02/23/2017 - 05:49 नवीन
अगदी पहिले कल हाती आले आहेत. मुंबई, सोलापूर, पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये तसेच सोलापूर जिल्हा परिषदेत प्रत्येकी एका जागेवर भाजप उमेदवार पुढे आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 02/23/2017 - 05:54 नवीन
पुण्यात भाजप २ जागांवर आघाडी. मुंबईत शिवसेना आणि भाजप प्रत्येकी १ जागेवर पुढे. अमरावती, सोलापूर, पिंचि मध्ये भाजप प्रत्येकी १ जागेवर पुढे. नाशिकमध्ये १ जागेवर राष्ट्रवादी आणि १ जागेवर अपक्ष पुढे नांदेड जिल्हा परीषदेत काँग्रेस पुढे. अशोक चव्हाणांचा प्रभाव चालत आहे असे दिसते.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 02/23/2017 - 06:00 नवीन
मुंबई: शिवसेना ४ आणि भाजप २. माजी महापौर श्रध्दा जाधव आघाडीवर नागपूर, अमरावती, सोलापूर, पिंचि महापालिका: भाजप प्रत्येकी १ जागेवर पुढे नाशिक जिल्हा परिषदेत भाजप पुढे तर नांदेडमध्ये काँग्रेस पुढे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 02/23/2017 - 06:02 नवीन
पुण्यात राष्ट्रवादी ४ आणि भाजप ५ जागांवर तर काँग्रेस १ जागेवर पुढे. (एकूण १० ) पिंचि: शिवसेना ३ आणि भाजप १ मुंबई: शिवसेना ५ आणि भाजप २ (एकूण ७)
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 02/23/2017 - 06:04 नवीन
पुणे: भाजप ११, राष्ट्रवादी ५ आणि अपक्ष १ मुंबई: शिवसेना ६ भाजप २ ठाणे: शिवसेना १
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 02/23/2017 - 06:08 नवीन
मुंबई: शिवसेना ८ भाजप ३ काँग्रेस १ पिंचि: शिवसेना ४ भाजप २ राष्ट्रवादी २ ठाणे: शिवसेना २ भाजप १ पुणे: भाजप ११ राष्ट्रवादी ५ अपक्ष १
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 02/23/2017 - 06:11 नवीन
मुंबई: शिवसेना १२ भाजप ७ काँग्रेस २ इतर १ पिंचि: शिवसेना ४ भाजप २ राष्ट्रवादी २ ठाणे: शिवसेना २ भाजप १ पुणे: भाजप १२ राष्ट्रवादी ६ काँग्रेस १
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 02/23/2017 - 06:16 नवीन
मुंबई: शिवसेना १५ भाजप १० काँग्रेस ३ राष्ट्रवादी १ पिंचि: शिवसेना ४ भाजप २ राष्ट्रवादी २ ठाणे: शिवसेना ८ भाजप १ पुणे: भाजप १३ राष्ट्रवादी ६ काँग्रेस १ शिवसेना १ शिवसेनेने ठाण्यात जोरदार आघाडी घेतली आहे. पुण्यात भाजप पुढे. मुंबईत सध्या शिवसेना पुढे आहे पण एबीपीवर असे म्हणत आहेत की आतापर्यंतचे कल मध्य मुंबई (दादर, लालबाग इत्यादी) भागातून जास्त आले आहेत. अजून उपनगरांमधील तितके कल आलेले नाहीत. मनसेला फार प्रभाव दाखविता आलेला दिसत नाही.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 02/23/2017 - 06:18 नवीन
मुंबई: शिवसेना १८ भाजप ११ काँग्रेस ५ राष्ट्रवादी १ इतर २ पिंचि: शिवसेना ४ भाजप ३ राष्ट्रवादी २ ठाणे: शिवसेना ८ भाजप १ पुणे: भाजप १९ राष्ट्रवादी ७ काँग्रेस १ शिवसेना १ नाशिकः भाजप ४, शिवसेना २ मनसे १ राष्ट्रवादी २
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 02/23/2017 - 06:26 नवीन
मुंबई: शिवसेना ३१ भाजप २० काँग्रेस ६ राष्ट्रवादी २ मनसे २ इतर २ पिंचि: भाजप ५ शिवसेना ४ राष्ट्रवादी ४ ठाणे: शिवसेना ८ भाजप १ पुणे: भाजप २० राष्ट्रवादी ७ काँग्रेस १ शिवसेना १ इतर १ नाशिकः भाजप ४, शिवसेना २ मनसे १ राष्ट्रवादी २ नागपूरः भाजप ७ आताचे चित्रः शिवसेनेने मुंबई आणि ठाण्यात आघाडी घेतली आहे. पुण्यात भाजप पुढे. नागपूरमध्येही भाजप पुढे. नाशिकमध्ये मनसेला तितका प्रभाव दाखवता आलेला नाही.
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते गुरुवार, 02/23/2017 - 06:26 नवीन
राष्ट्रवादी ४ सेना ३ भाजप १ पुण्यात भाजप ने चांगली आघाडी घेतलीये
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 02/23/2017 - 06:33 नवीन
सध्याचे कल कायम राहिले तर अपेक्षेप्रमाणे मुंबईत शिवसेना सर्वात मोठा पक्ष होणार. पुणे, नागपूर, सोलापूरमध्ये भाजप पुढे. एकूणच चित्र असे दिसत आहे की जवळपास सर्व शहरी क्षेत्रांमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यात लढत होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता 'मार्जिनल प्लेअर' झाले आहेत. ठाण्यातील आणि नागपूरमधील कल का अडकले आहेत हे समजायला मार्ग नाही.
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते गुरुवार, 02/23/2017 - 06:42 नवीन
नाशिक मध्ये मनसे अजूनही पिछाडीवर आहे .अकोला अमरावती चे निकाल पण अडकले आहेत अजून
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 02/23/2017 - 06:42 नवीन
मुंबईत आता ४० जागांवर शिवसेना, २६ जागांवर भाजप, ९ जागांवर काँग्रेस, ३ जागांवर मनसे, २ जागांवर राष्ट्रवादी तर २ जागांवर इतर पुढे पुण्यात ४७ पैकी ३० ठिकाणी भाजप, नागपूरमध्ये १६ पैकी १५ ठिकाणी भाजप, नाशिकमध्ये २१ पैकी १२ ठिकाणी भाजप पुढे. विदर्भात भाजपने आपला गड राखला आहे असे म्हणायला हवे. मुंबईत मात्र शिवसेनेला मात देण्यात भाजपला यश येताना दिसत नाही.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 02/23/2017 - 06:47 नवीन
मुंबईत शिवसेना आतापर्यंत अर्ध्यापेक्षा थोड्या कमी जागांवर पुढे आहे. दादर, वरळी या पारंपारीक बालेकिल्ल्यांमध्ये शिवसेनेने मुसंडी मारली आहे. पिंचिमध्ये आता राष्ट्रवादी पुढे गेला आहे. पुणे, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूरमध्ये भाजप आरामात पुढे आहे. ठाण्यात शिवसेना पुढे आहे. विदर्भातील अकोला, अमरावती आणि नागपूर येथे आतापर्यंतचे कल अगदीच एकतर्फी आहेत.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 02/23/2017 - 07:00 नवीन
मुंबईत आता ११० पैकी ५६ जागांवर शिवसेना, ३२ जागांवर भाजप, १० वर काँग्रेस, ५ वर मनसे, ४ वर राष्ट्रवादी पुढे. शिवसेना निम्म्यापेक्षा जास्त जागांवर पुढे. पुण्यात ५७ पैकी ३० ठिकाणी भाजप पुढे ठाण्यात शिवसेनेहा जोर थोडा मंदावला आहे. ३३ पैकी १४ ठिकाणी शिवसेना पुढे नाशिकमध्ये २७ पैकी १७ ठिकाणी भाजप पुढे सोलापूरमध्ये १७ पैकी १० ठिकाणी भाजप पुढे नागपूरमध्ये २३ पैकी १९ ठिकाणी भाजप पुढे
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते गुरुवार, 02/23/2017 - 07:15 नवीन
सातारा रा कॉ,सिंधुदुर्गात राणे, नांदेड मध्ये चव्हाण . नगर मध्ये विखे पाटील
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 02/23/2017 - 07:17 नवीन
आतापर्यंत मुंबईतील १४२ पैकी शिवसेना ७२ , भाजप ४०, काँग्रेस १४, मनसे ७, राष्ट्रवादी ५ आणि इतर ४ ठाण्यात ३६ पैकी शिवसेना १५, भाजप ८, राष्ट्रवादी ५ नाशिकमध्ये ३१ पैकी भाजप १८ नागपूरमध्ये २९ पैकी भाजप २० आणि काँग्रेस ९ पुण्यात ७१ पैकी भाजप ३८ आणि राष्ट्रवादी १५ मुंबईत शिवसेना स्वबळावर विजय मिळवायच्या मार्गावर आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 02/23/2017 - 07:25 नवीन
मुंबई महानगर पालिकेत, बहुमतासाठी किती जागांची आवश्यकता असते?
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत गुरुवार, 02/23/2017 - 07:51 नवीन
एबीपी माझा वर एकूण जागा २२७ दाखवल्या आहेत. त्यानुसार बहुमतासाठी ११४ जागांची आवश्यकता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
व
वरुण मोहिते गुरुवार, 02/23/2017 - 07:32 नवीन
नाशिक मध्ये मनसेची पिछाडी आश्चर्य कारक आहे . बहुधा माणसे चे बहुतेक नगरसेवक भाजपात गेल्याचा भाजप ला फायदा मिळाला असावा का ?
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 02/23/2017 - 07:41 नवीन
मुंबईत या क्षणी शिवसेनेला ८१ तर मनसेला १० जागांवर आघाडी आहे. काही जागांवर शिवसेना-मनसेमध्ये मतविभागणी झाल्यामुळे पिछाडी आली असेल ही शक्यता आहेच. मनसेला बरोबर घेतले असते तर कदाचित शिवसेनेने यापेक्षा अधिक नेत्रदीपक विजय मिळवला असता.
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते गुरुवार, 02/23/2017 - 08:04 नवीन
कारण प्रभाग छोटे असतात काही जागा लोक उमेदवार पाहून ठरवतात , आता मनसेला जागा सोडल्या असत्या आणि त्याच जागा निवडून आल्या असत्या मनसेच्या असं सांगता यात नाही . निश्चित आकडेवारी आली कि समजेल मतविभागणी कुठे झालीये .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
प
प्रसन्न३००१ गुरुवार, 02/23/2017 - 07:50 नवीन
नाशिक - माजी महापौर यतीन वाघ यांना पराभवाचा धक्का
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 02/23/2017 - 07:53 नवीन
ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर येथील निकाल अडकले आहेत गेल्या काही वेळापासून. समजत नाही काय चालू आहे ते.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 02/23/2017 - 08:29 नवीन
गम्मत केली. बर्‍याच प्रभागांची मोजणी १:३० ला चालू होणार असे सांगितले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
म
मनिमौ गुरुवार, 02/23/2017 - 08:16 नवीन
अत्यंत समाधानकारक निकाल येत आहेत. जवळपास 35 वर्षांनंतर सत्ता स्पष्ट पणे भाजप कडे जातेय. MIM ने 5 जागांवर विजय मिळवून चंचुप्रवेश केलाय. सुशीलकुमार शिंदे यांचा करिश्मा ओसरत आहे. भाजप 22 सेना 19 राकाँ 00 काँग्रेस 05 MIM 5
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा