पाऊस असा रडतो
पापण्यांच्या दाराशी हाक येती
जीवास जखमांचे रंग फुटती
घन वेदनांतूनी पाऊस असा रडतो
दूर दूर वारा टाहो फोडतो
उरात क्षितिजाच्या वैषम्य पेटले
वैरी वादळ डोळ्यांत आले
आगीत बुडाला प्राण वेडापिसा
राऊऴातला नाद अस्त झाला कसा
💬 प्रतिसाद
(1)
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 02/23/2017 - 10:29
नवीन
विषय विस्कळीत झालाय.
- Log in or register to post comments