Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वेदना..

र — राघव, गुरुवार, 02/23/2017 - 13:39
फुकाचे भरवसे मिळतात सारे, हवे ते नेहमीच हुलकावते.. मागावयाचे कुणाला-कशाला.. वेदना मनातील वदू लागते! जगातील घडणे - जगाचे बिघडणे.. जगाचीच सारी दोषांतरे.. विवेकात शक्ती किती ती असावी.. डोळ्यात दिसती जुनी जळमटे! कधी दिव्य काही मनातून उठते [की] स्वतःचीच झोळी खुजी भासते.. फुटक्या घड्याची ओंजळ कितीशी.. थेंबासही ती नको वाटते! आशा-निराशा.. पुन्हा तीच रेषा.. गिरवण्यात आयुष्य शिलगावते! असावी मनाची किती लक्तरे ती.. वेचावयाला उलटती युगे! राघव

प्रतिक्रिया द्या
1024 वाचन

💬 प्रतिसाद (4)
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 02/23/2017 - 18:32 नवीन
@
कधी दिव्य काही मनातून उठते [की] स्वतःचीच झोळी खुजी भासते.. फुटक्या घड्याची ओंजळ कितीशी.. थेंबासही ती नको वाटते!
››› आहाहा! सल्लाम!
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Tue, 03/21/2017 - 21:12 नवीन
इतका विरोधाभास ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
म
मदनबाण Wed, 03/22/2017 - 00:58 नवीन
छान !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 3 पेग :- Kannada Rapper Chandan Shetty
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Wed, 03/22/2017 - 12:13 नवीन
छानच !!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा