Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ट्रिंग ट्रिंग !!!!!

ब — बटाटा चिवडा, Fri, 02/24/2017 - 05:53
ट्रिंग ट्रिंग असा वाजतो जेव्हा Tone.. तेव्हा सर्वाना आठवतो तो "Telephone" १९९० च्या दशकात केलेला तो पहिला कॉल आजही आठवतो चाळमालकांच्या घरातला हॉल... हॉल मध्ये फोनचा "डब्बा" असायचा ठेवलेला येता-जाता निरखत असायचो आम्ही त्याला.. चाळीतले ते जोशी , नाडकर्णी , आणि पाटील सर्वांचे कॉल त्या डब्बा फोन वर यायचे.. अन कोणाचा फोन आला आहे हे सांगायला लहान मुलांनी घरोघरी पळायचे... काही वर्षांनी, आमच्याही घरी आला तो Landline चा डब्बा इतका आनद झाला जणू घरी आले गणपती बाप्पा... त्या फोनचीही निराळीच होती तऱ्हां ८ - ८ दिवस ‘Dead’ होऊन वाजायचे त्याचे बारा... STD कॉल लावण्यासाठी होती "Trunk Call System" १८७ नंबर वर असलेली बाई सांगायची "You are in waiting"... क्रॉस कनेक्शन्स ची तर असायची भलतीच धमाल-मस्ती मित्राकडे फोन लावला तर ऐकू यायची २ मारवाडींची शाब्दीक कुस्ती... काही वर्षांनी, घरोघरी Wireless आणि Caller-ID वाले फोन आले मैत्रिणींच्या घरी फोन करायचे वांधे सुरु झाले... मध्यंतरी PAGER नी Replace केला Wireless ना पण Pagers बंद नाही पाडू शकले Landline चा जमाना... २१ व्या शतकातले पर्व म्हणजे Mobile, I-phone आणि Broadband Internet सर्वांच्याच हातात दिसतात किमान २ Handset … पण आजही जेव्हा घरोघरी दिसतो ट्रिंग ट्रिंग वाला "डब्बा" वाटते कोणताच I-Phone घेऊ शकणार नाही Landline ची जागा..!!! -आपला बटाटा चिवडा __/\__

प्रतिक्रिया द्या
1308 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा