Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कुणास ठावूक कशी पण जेलात गेली शशी

म — मूखदूर्बळ, Fri, 02/24/2017 - 07:20
(टीपः हे गाणे आणि हाच विषय घेउन एक विड्म्बन मला व्हॉट्स अप वर आले होते (कवी अज्ञात) . त्याचे मी माझ्या पद्धतीने सोपस्कार करून गाणे आणिक विषय तोच ठेवून, मूळ विडम्बन काराच्या प्रतिभेला अभिवादन करून हे विडम्बन लिहीत आहे ) कोणास ठाऊक कशी पण जेलात गेली शशी शशीने हलविली मान, घेतले सुंदर ध्यान अदालत म्हणाली, व्वा व्वा ! शशी म्हणाली, सोडा मला कोणास ठाऊक कशी, पण जेलात गेली शशी पनीरने मारली उडी, भरभर चढला शिडी शशी म्हणाली, थान्ब थान्ब ! पनीर म्हणाला, नानाची टान्ग कोणास ठाऊक कशी, पण जेलात गेली शशी शशीने म्हटले पाढे आणि पलानी स्वामी आले पुढे न्यायाधीश म्हणाले, शाबास ! शशी म्हणाली, करा बास (कोणास ठाऊक कशी, पण जेलात गेली शशी शशीने वेचले खडे आणि बान्धले उदबत्तीचे पुडे जेलर म्हणाले, छान छान ! शशी म्हणाली, कस्ला त्रास ) मूळ गाणे: कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा सशाने हलविले कान, घेतली सुंदर तान दिग्दशर्क म्हणाला, व्वा व्वा ! ससा म्हणाला, चहा हवा कोणास ठाऊक कसा, पण सर्कशीत गेला ससा सशाने मारली उडी, भरभर चढला शिडी विदुषक म्हणाला, छान छान ! ससा म्हणाला, काढ पान कोणास ठाऊक कसा, पण शाळेत गेला ससा सशाने म्हटले पाढे आणि घडघड वाचले धडे गुरुजी म्हणाले, शाबास ! ससा म्हणाला, करा पास

प्रतिक्रिया द्या
1313 वाचन

💬 प्रतिसाद (2)
ज
जव्हेरगंज Fri, 02/24/2017 - 10:20 नवीन
ससा आवडला!! शशी काय जमली नाही!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Fri, 02/24/2017 - 11:50 नवीन
चांगली निरम्यात बुडवून काढली... कोणास ठाऊक कशी पण जेलात गेली शशी ||धृ|| शशी पडली तीनदा पाया घेतली अम्मांची छाया जनता म्हणाली व्वा व्वा! कोर्ट म्हणाले, खा हवा! कोणास ठाऊक कशी पण जेलात गेली शशी ||१|| पनीरने मारली उडी भरभर चढला शिडी शशी म्हणाली, थांब थांब! पनीर म्हणाला, जा लांब! कोणास ठाऊक कशी, पण जेलात गेली शशी ||२|| पलानीने म्हटले पाढे आणि आला सरसर पुढे शशी म्हणाली, शाबास! कोर्ट म्हणाले, करा बास! कोणास ठाऊक कशी, पण जेलात गेली शशी ||३|| Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा