BMc त्रिशंकू निवडणूक कवित्व ,माझा एक ठोकताळा
मुंबई महानगरपालिकेत बहुमत मिळवण्यासाटी काय होईल ?
१) जर शिवसेना भाजप एक झाले ?
विरोधक ह्याचे भांडवल करू शकतात का? तसेच एक मेकाची उणे दुणे ५ वर्षे आइकावें लागतील ,दार वेळी युती तुटे व हे परत येतात ह्याचच प्रतिकूल परिणाम होऊ शकतो का ?
२) भाजप काँग्रेस एक झाले तर ?
आता एक बघा
विधानसभा निवडणुकीत आधी राष्ट्रवादीने पाठिंबा दिला ,नंतर शिवसेनेने ,आता इथे काँग्रेस आली तर भाजप कोना बरोबरही युती करते असे होईल का ?
३) शिवसेना काँग्रेस
शक्यता खुप कमी आहे ,पण होऊ शकते का ?
४) तिढा जास्त दिवस राहिला परत निवणूक
राजकीय जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे
वसेना समजुतदारपणा दाखविणार की पुन्हा पुन्हा वल्गनाच करणार काय माहित !आता उद्याच्या सामना मध्ये बातमी असेल की'भाजपा नामक शायिस्तेखान, शिवसेनेला घाबरुन महापौर पदाच्या शर्यतीतून पळून गेला'
शिवसेना हा अत्यंत उन्मत्त व आडमुठ्या लोकांचा पक्ष आहे. पारदर्शकता, लोकायुक्त, समिती असल्या गोष्टींना ते काडीचीही किंमत देणार नाहीत. आम्ही आमच्या पद्धतीने महापालिका चालवू, तुम्हाला काय करायचेय ते करा असे ते मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान देऊन, आम्हाला आवाज देण्यासाठी तुमच्या बुडात दम नाही असेही ते जाहीरपणे सांगून ते भाजपला खिजवत राहतील. 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार' अशी फडणविसांची परिस्थिती होणार आहे. आपल्याला भाजप घाबरला या समजूतीत ते अजून माज करतील आणि शेवटी आपण माघार घेण्याच्या निर्णयाचा भाजपला पश्चाताप होईल.वेगवेगळ्या जिल्हा परीषदांचे अध्यक्षपद भाजपला मिळू नये यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र येऊन अध्यक्षपदे आपापसात वाटून घेणार असल्याच्या बातम्या दाखवित आहेत. हे होणारच होते. शिवसेना दगाबाजी करणार यात कोणालाही शंका नव्हती. मुंबई महापालिकेच्या लढाईत एकतर्फी माघार घेऊन शिवसेनेला रान मोकळे करून दिल्याचा भाजपला नक्कीच पश्चाताप होणार आहे. शिवसेना हा अत्यंत कृतघ्न व उन्मत्त पक्ष असून या पक्षाशी तातडीने संबंध तोडून टाकणे हेच भाजपसाठी फायदेशीर ठरेल. अन्यथा पदोपदी शिवसेनेकडून अडवणूक व विश्वासघात सहन करावा लागेल.