साहित्यातील survival of the fittest म्हणजे काय ?
श्री. माहितगार यांच्या लेखकास/लेखनास वाचवावे की नाही या लेखावर एक मजेदार संकल्पना आढळली ती म्हणजे "survival of the fittest'' मला साहित्यातील फिटेस्ट याचा अर्थ न कळल्यामुळे किंवा जरा गोंधळून गेल्यामुळे हा विषय चर्चेला घेतला आहे.
survival of the fittest म्हणजे -
-आर्थिक दृष्ट्या
- वाचकांच्या संख्येचा विचार करता
- का लिखाणातील सातत्याचा विचार करता.
- का लोकप्रियतेचा विचार करता
- का सरकार मान्यता मिळाली म्हणून..
- जर एखादा लेखक लिहून मोकळा होत असेल तर ?
- जर एखाद्या लेखकाला एकच वाचक मिळाला तर तो फिट नाही असे म्हणता येते का ?
- समजा एखादा लेखकावर समजा फक्त टीकाच होत असेल तर तो अनफिट होतो का ?
- याअच्यात काळाच्या महिमेचा विचार करावा लागेल काय ?
- किंवा इतरही मुद्दे - आपल्याला सुचतील ते.
यात वेबवरचे लेखक आणि छापलेल्या पुस्तकांचे लेखक या दोन्हींचा विचार अभिप्रेत आहे.
मी लिहित असलेली मोबियस ही कादंबरी बहुतेकांना आवडलेली नाही याची कल्पना आहे. म्हणून हा धागा काढला आहे असा कृपया गैरसमज करुन घेऊ नये. व त्या दृष्टीने विचारही करु नये ही विनंती.
मला खरोखरीच हा प्रश्न पडलाय की जंगलात survival of the fittest हे ठीक आहे, तेथे जिवन मरणाचा प्रश्न असतो. शिवाय शारिरिक क्षमतेविषयी ही संकल्पना ठीक वाटते. पण साहित्यविश्र्वात एखादा जगायला लायक ( survival of the fittest) आहे हे कसे ठरवायचे ?
साधक बाधक चर्चा अपेक्षित आहे. यात साहित्याचा, लेखनाचा, लेखकाचा विचार आपण कराल अशी अपेक्षा आहे.
जयंत कुलकर्णी.
साहित्यविश्र्वात एखादा जगायला लायक ( survival of the fittest) आहे हे कसे ठरवायचे ?साहित्य तगेल का नाही हा मूळ प्रश्न आहे, साहित्यिकाच्या सर्वायवलचा प्रश्न नाही, आणि असला तरी तो साहित्य तरण्यावरच अवलंबून आहे. साहित्य तरायला एकमेव क्रायटेरिया वाचक त्याच्याशी रिलेट होऊ शकणं आहे. आणि मग बाकीच्या गोष्टी आपोआप जुळून येतात -आर्थिक दृष्ट्या :साहित्य तरलं तरच आर्थिक संभावना निर्माण होणार. -वाचकांच्या संख्येचा विचार करता: प्रसिद्धी वाढेल तशी वाचक संख्या वाढणार. -का लिखाणातील सातत्याचा विचार करता: हे लेखकाच्या अनुभवविश्वावर अवलंबूने. -का लोकप्रियतेचा विचार करता: मूळात लेखकाला स्वतःचं साहित्य आवडायला हवं ! -का सरकार मान्यता मिळाली म्हणून..: छे, असले लेखक फारच तद्दन असतील. -जर एखादा लेखक लिहून मोकळा होत असेल तर ?: ज्याला वाचक नाहीत त्या लेखनाचा काय उपयोग ? लेखन हे अनुभवाचं शेअरींग नाही काय ? -जर एखाद्या लेखकाला एकच वाचक मिळाला तर तो फिट नाही असे म्हणता येते का ?: ते `लेखन' फीट नाही. उदा. मोबियस. -समजा एखादा लेखकावर समजा फक्त टीकाच होत असेल तर तो अनफिट होतो का ?: ते लेखकाचा स्वतःच्या लेखनावर किती विश्वास आहे त्यावर अवलंबून आहे. ओशो म्हणाले होते `माझं साहित्य काळाच्या किमान ५० वर्ष पुढे आहे !' -याच्यात काळाच्या महिमेचा विचार करावा लागेल काय ?मूळात सांप्रत काळात ते तरायला हवं. -किंवा इतरही मुद्दे - आपल्याला सुचतील ते.उत्तम साहित्य निर्मितीसाठी फक्त दोनच गोष्टी लागतात. एक, अनुभवाची उत्कटता आणि दोन, तो मांडण्याची शैलीजेव्हा पोषणातून मिळालेल्या ताकदीचा वापर तो सराईव्ह होण्यासाठी करतो. इतरांपेक्षा अधिक सक्षमतेने करतो, अधिक क्रियेटिव्हली करतो.लेखनाच्याबाबतीत `आलेल्या अनुभवांचा' वापर तो `अभिव्यक्तीच्या उर्मीसाठी' इतरांपेक्षा किती सक्षमतेनं आणि अधिक क्रियेटिव्हली करतो यावर `लेखन' तगेल की नाही हे ठरतं.लेखनाचा उद्देश हे कोणीतरी वाचावे हाच असेल असे वाटत नाही.मग त्याला `डायरी' म्हणतात .