तुझ्या ऊन्हाचं कौतुक..
तुझ्या ऊन्हाचं कौतुक
किती करावं करावं
माप पदरी सुखाचं
किती भरावं भरावं
बघ तुळशीला आल्या
मखमालीच्या मंजिर्या
चिऊताईच्या दातांनी
किती खुडावं खुडावं
खिडकीच्या गजावर
झुले डांगराचा वेल
बोटभर आधारानं
वर चढावं चढावं
नंदी बसलेला दारी
गळी लेणं घुंगराचं
येताजाता भक्तीभावे
तिथं नमावं नमावं
झुल्यावर लेकरांची
किलबिल चारीठाव
सांज सरता सयेने
पाय वळावं वळावं
पुण्य कुठल्या जन्माचं
आज फळुनिया आलं
भरलेल्या गोकुळात
दिस सरावं सरावं
झुल्यावर लेकरांची किलबिल चारीठाव सांज सरता सयेने पाय वळावं वळावंचारीठाव म्हणजे सतत असा अर्थ होतो.