डेटा महापूर
आंतरजालावर अनुभवांचा महापूर , भावनांचा महापूर, सल्ल्यांचा महापूर, कवितांचा महापूर, लेख, कथा निबंधांचा महापूर ....तत्वज्ञान पंथांचा तर महापुराचा धबधबा जणू ....
बऱ्याच वर्षांपूर्वी एका मुलाखतीत अस विचारलं होत कि "डेटा अनालिसिस चे अंतिम भवितव्य काय ?" तेव्हा "अंतर्ज्ञान" असं उत्तर देऊन मुलाखत काराला त्या उमेदवाराने नि:शब्द केले होते
कोणताही विषय घ्या ...अपरंपार डेटा उपलब्ध ..खरी, खोटी , पूर्ण, अपूर्ण...आमच्या भाषेत structured / unstructured डेटा आणि मग त्याचं पृथ:करण, चर्वित चर्वण, त्याचे प्रत्येक टप्प्यावरचे निष्कर्ष मग त्या निष्कर्षांचा वेगळा डेटा आणि मग त्यावरची अनुमाने ... पुढे जाऊन त्या अनुमानांचे पडताळणी आणि जर बरोबर असेल तर अजून अनुमाने आणि त्या अनुमान काढण्याची एक थियरी ...आशा अजून थियरी आणि त्यांचा सांगोपांग तौलनिक डेटा..वेगवेगळ्या जीवन सूत्रांची भरमार, निष्कर्षांचा रतीब आणि एकूणच ह्या सगळ्याचा एक व्यमिश्र काढा ...प्या लेको ....
निसर्गाचे गूढ आपल्याला जवळपास उलगडले आहेच, आयुष्यातील सगळी ाव्हेरियेबल्स आता लक्षात आलेलीच आहेत सगळी व्यक्त अव्यक्त सूत्र आपल्या लक्षात जवळपास आलेलीच आहेत ती कोडी सुटायच्या बेतात आहेत सगळ एकदा पूर्ण झालं कि मग कदाचित विश्वामित्रा प्रमाणे जणू प्रतिसृष्टी तयार करू शकूच कि काय असा अविर्भाव ...
कोणतीही गोष्ट आली समोर कि बसवा तिच्यायला एखाद्या कोष्टकात, हाणा एखाद तार्किक, बनवा एखादा पंथ आणि नानू सरंजामे म्हणतो तसे 'होऊ द्या रेजीमेंटेशन'
हा प्रवास अपरिहार्य असला तरी हे उन्नयन का अध:पतन का अजून काही ????
हा प्रवास अपरिहार्य असला तरी हे उन्नयन का अध:पतन का अजून काही ????डेटा इज लाइक मेंटल फूड . तो योग्य प्रमाणात ग्रहण करुन, व्यवस्थित प्रोसेस केला, तर निश्चितच मनाचं उन्नयन . प्रमाणाबाहेर किंवा आवश्यकतेपेक्षा जास्त जमा झाला, तर हार्ड डिस्क हँग होणार हे नक्की ! आणि बायो-हार्ड डिस्क चुकून क्रॅश झाली तर.... खोलखोल अध:पतन.