Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताळेबंद

र — रामदास, गुरुवार, 03/02/2017 - 06:49
तसा चोख असतो ताळा आमचा , दिसा -मासाच्या गणिताचा. कुणाची तरी वाट बघत, जागलात, काही उत्तर रात्रीचे प्रहर. ते ही वळते केलेत , संधीकालाच्या वजावटीत. ओंजळीत चेहेरा झाकून रडलात , ते ही होरे जमा धरलेत, ग्रहणाच्या हिशेबात. तसा चोख असतो ताळा आमचा , दिसा -मासाच्या गणिताचा. उरलं सुरलं केलं वळतं घसार्‍याच्या आकडेवारीत तसे काही बाक़ी नाही देण्या घेण्याच्या हिशेबात . तसा चोख असतो ताळा आमचा , दिसा -मासाच्या गणिताचा. (मुठभर राखुंडी हातात ठेवून आयुष्य म्हणाले, हीच काय ती गंगाजळी इतक्या वर्षाच्या ताळेबंदात )

प्रतिक्रिया द्या
4782 वाचन

💬 प्रतिसाद (10)
च
चांदणे संदीप गुरुवार, 03/02/2017 - 07:09 नवीन
रामदासकाकांच्या कवितेवर प्रतिसाद लिहायला मी पैला! :D बाकी, कविता डेंजोर! (तसाच, माझा प्रतिसादही..! ;) ) Sandy
  • Log in or register to post comments
अ
अॅस्ट्रोनाट विनय गुरुवार, 03/02/2017 - 07:44 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 03/02/2017 - 14:44 नवीन
:)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 03/03/2017 - 04:40 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 03/03/2017 - 04:57 नवीन
सुरेख!!
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 03/03/2017 - 05:19 नवीन
प्रणाम सर ... _/\_
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 03/03/2017 - 06:25 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Fri, 03/03/2017 - 11:50 नवीन
अतिशय सुरेख
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sat, 03/04/2017 - 04:12 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
N
NAKSHATRA Fri, 01/22/2021 - 14:08 नवीन
सुरेख!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा