भारतीय आर्थिक वर्ष (१ एप्रिल- ३१ मार्च) बदलावे काय ?
भारतीय आर्थिक वर्ष (१ एप्रिल- ३१ मार्च) बदलावे काय ?
सध्या भारतीय आर्थिक वर्ष दरवर्षी १ एप्रिल पासून सुरु होते आणि ३१ मार्चला संपते. ही प्रथा आपल्याकडे ब्रिटिश राजवटीत आलेली आहे कारण ब्रिटिश साम्राज्य जिथे जिथे होते तेथे त्यांनी स्वतःच्या सोयीसाठी असे आर्थिक वर्ष योजलेले होते. आपल्याकडे भारतात १ एप्रिल- ३१ मार्च आर्थिक वर्ष बहुदा १८६० पासून आहे.
ब्रिटन वगळता अनेक प्रगत देशांमध्ये कॅलेंडर वर्षाला जुळणारे आर्थिक वर्ष म्हणजे १ जानेवारी ते ३१ डिसेम्बर अशी योजना आहे.
ह्या वर्षी भारत सरकारचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी ला सादर होऊन एक नवी आर्थिक प्रथा सुरु झाली आहे. त्यामुळे १९८४ सालापासून वेगवेगळ्या पातळीवर चर्चेत असलेला हा आर्थिक वर्षबदलाचा विषय पुन्हा पुढे आला आहे.
असा बदल (झाल्यास) चांगला / वाईट / अर्थहीन / किचकट / सुटसुटीतपणा वाढवणारा की कसे?
अश्या बदलाचे काय फायदे-तोटे असू शकतील? काय अडचणी / आव्हाने असू शकतील?
तुमची मते जाणून घ्यायला आवडेल.
💬 प्रतिसाद
(9)
व
वरुण मोहिते
गुरुवार, 03/02/2017 - 10:37
नवीन
वार्षिक अहवाल त्या दृष्टीने जागतिक बँकेकडून मिळणार निधी यावर फरक पडेल .
काही काळ हा फरक सोसावा लागेल
तरी तारखा का बदलाव्या ह्याच प्रयोजन कळलं नाही .म्हणजे आर्थिक दृष्ट्या काय साध्य होईल
बाकी १ फेब्रुवारी च्या अर्थसंकल्पाची कारण वेगळी होती. आर्थिक दृष्ट्या काय फायदेशीर ठरेल तारखा बदलल्या कि ??
- Log in or register to post comments
ख
खेडूत
गुरुवार, 03/02/2017 - 12:37
नवीन
'नीती आयोग' ने नेमलेल्य समितीने याच्या दोन्ही बाजूंचा विचार करून अर्थिक वर्ष जानेवारी-डिसेंबर करावे असाअहवाल दिल्याचे वाचले होते. टॅक्स वर्ष पण तसेच राहील. अन्य १५६ देश जानेवारी-डिसेंबर असेच अर्थिक वर्ष पाळतात म्हणे.
मुख्य कारण असे वाचले होते की रब्बी आणी खरीप हंगामाच्या त्या त्या वर्षीच्या कामगिरीचा विचार करून अर्थसंकल्पात डिसेंबरातच तश्या तरतूदी करता याव्यात हाही उद्देश आहे. म्हणजेच पुढे बजेट डिसेंबर किंवा नोव्हेंबरातही होऊ शकते!
हे झाले तर बरे होईल, तसेच सर्व निवडणूका एकदम घेणे हेही आवश्यक आहे.
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 03/02/2017 - 14:10
नवीन
मार्च महिन्यात शेवटचा महिना म्हणून सुट्ट्या देत नाहीत आणि तेव्हा कोणाला हव्या असतात म्हणा?
डिसेंबर शेवटला आल्यास सुट्ट्या बोंबलतील. टुअरिझम बोंबलेल.
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
गुरुवार, 03/02/2017 - 14:51
नवीन
जे जे प्रचलित आहे त्याच्या नेमके उलट काहीतरी बोलायचे. समाजात जे शिष्ट संमत आहे त्यावर प्रश्न उपस्थित करायचे! श्या!
ते D-construction किंवा बुद्धिभ्रम का काय ते हेच बाकी काही नाही बघा! :P
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
गुरुवार, 03/02/2017 - 14:52
नवीन
पण हे करून नेमकं साध्य काय होणार आहे?
- Log in or register to post comments
अ
अनिंद्य
Fri, 03/03/2017 - 12:19
नवीन
आर्थिक वर्ष बदलल्यामुळे काय साध्य होईल हे मलाही क्लिअर नाही. पण झा कमिशन ते आता नीती आयोगाची समिती इतक्या हुशार लोकांनी २०-२५ वर्षे विचार चालवलाय म्हणजे काहीतरी फायदे असतील.
- Log in or register to post comments
द
दिलीप सावंत
Wed, 03/08/2017 - 06:36
नवीन
सगळीकडे नुसता गोन्धळाच चालू आहे. सामान्य माणूस मात्र परदेशात होत आहे. त्यात अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे कि हे वर्ष खूप चांगले जाईल.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Wed, 03/08/2017 - 09:24
नवीन
खरे तर गुढीपाडवा ते गुढीपाडवा असे आर्थिक वर्ष असायला हवे. त्या ऐवजी पाश्चात्य सौंस्क्रुतीचं वर्ष म्हणजे....... ;)
- Log in or register to post comments
अ
अनिंद्य
Wed, 03/08/2017 - 09:51
नवीन
:-)
- Log in or register to post comments