Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मन

अ — अमिता राउत, गुरुवार, 03/02/2017 - 17:46
का कुणास ठाऊक उगाच मन उदास होत आतल्या आत कुढत असतं. अपेक्षांचं ओझ उगाच खांदयावर पेलत असतं , पूर्ण झाल्यातर आनंद नाही तर रागराग करत बसतं. मनाचा खेळ सारा , घटकेत भविष्यात तर, घटकेत भूतकाळात तरंगळत असतो. वेध घेता भविष्याचा भूतकाळ पायाशी घुटमळत असतो , पाऊल टाकता पुढच चर्र्कन भूतकाळ झोंबून जातो. असचं जगतो प्रत्येकजण गटांगळ्या खात, पण वर्तमानाचा कुणाला पत्ताच नसतो. कर्णी सगळी मनाची, पण दोष मात्र चेहऱ्याला क्षणांत हसरा तर क्षणांत हिरमुसलेला. काय हवं असत या मनाला? एकदा विचारावं त्यांनी त्याच्याच मनाला मग कळेल घालमेल चेहऱ्याची. आकाशात ढग दाटावे तसे विचार येतात भरून , कधी गर्जना तर कधी सर येते धावून. रडता रडता हसतांना , अलगद डोळे पुसतांना , अन हळूच कुशीत शिरतांना तुलाही बर वाटतन रे मना ……

प्रतिक्रिया द्या
425 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा