महाराष्ट्रातील बोलीभाषा नकाशांची आवश्यकता
महाराष्ट्रातील काही विभाग आणि जिल्हे आणि तालुक्यात -जसे कोकण, विदर्भ, खानदेश, कोल्हापूर - एका पेक्षा अधिक बोलीभाषा बोलल्या जातात अमुक एका भागात अमुक एक भाषा बोलली जाते असे वाचनात येते पण नकाशांच्या अनुपलब्धतेमुळे भौगोलीक स्थान निटसे लक्षात येत नाही आणि कुठे ओव्हरलॅप होत असेलतर लक्षात येणेही कठीण जाते.
ह्यांचे स्थान ज्या ज्या बोलींबद्दल आणि भौगोलीक नकाशा बद्दल माहित आहे ते नकाशावर कुणि दाखवू शक्ल्यास बरे होईल. ज्यांना बोलीभाषांची विसृत यादी पहावयाची आहे त्यांना ती मराठी विकिपीडीयावर या पानावर उपलब्ध असू शकेल.
नकाशा शक्यतोवर जिल्हा अथवा विभागवार असलेला बरा, पूर्ण भारताचा नकाशात एक तर निटसे लक्षात येत नाही आणि कार्टोग्राफी आणि नकाशे विषयक कायद्याचे उल्लंघन लक्षात येणेही कठीण जाते असे वाटते.
असे नकाशे कुणि विकिपीडिया प्रकल्पांसाठी प्रताधिकारमुक्त उपलब्ध करुन देऊ इच्छित असेल तर त्यांनी ते विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पाच्या या दुव्यावर अपलोड करुन या धाग्यात अथवा मराठी विकिपीडियावरील लेखात दुवा जोडल्यास बरे पडेल. (कृपया कॉपीराईटेड नकाशे चढवणे टाळावे)
💬 प्रतिसाद
(36)
प
पैसा
Fri, 03/03/2017 - 12:15
नवीन
तुम्ही नकाशा द्या इथे. मग लोक आपापल्या बोली सांगतील.
- Log in or register to post comments
ए
एस
Fri, 03/03/2017 - 12:30
नवीन
चांगला उपक्रम आहे. राज्याचा आणि मग जिल्हानिहाय असे नकाशे घेऊन त्यावर बोलीभाषांची नावे टाकता येतील.
- Log in or register to post comments
ए
एस
Fri, 03/03/2017 - 12:31
नवीन
बादवे, तुम्ही दिलेल्या लिंकवर काहीच दिसत नाहीये.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 03/03/2017 - 16:40
नवीन
मलातरी दोन्ही लिंक्स उघडत आहेत.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Fri, 03/03/2017 - 12:42
नवीन
मला जिल्हा/तालुका आणि बोलीभाषा असा विदा दिल्यास मी नकाशा बनवून देऊ शकेन.
जिल्हे-तालुके असा वेगळा प्रतिसाद देतो आहे. उपप्रतिसाद म्हणून "जिल्हा - तालुका - बोलीभाषा" असा प्रतिसाद दिल्यास आभारी राहीन.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Fri, 03/03/2017 - 12:44
नवीन
इथून
कोकण विभाग
मुंबई शहर (जिल्ह्याचे मुख्यालय- जुने जकात गृह, फोर्ट)
मुंबई उपनगर- कुर्ला, बोरिवली, अंधेरी (जिल्ह्याचे मुख्यालय- वांद्रे)
ठाणे- ठाणे शहर, कल्याण, मुरबाड, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर, अंबरनाथ (जिल्ह्याचे मुख्यालय- ठाणे)
पालघर- वाडा, विक्रमगड, वसई, पालघर, डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, (जिल्ह्याचे मुख्यालय- पालघर)
रायगड-पनवेल, पेण, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड, माणगाव,रोहा, मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर, तळा (जिल्ह्याचेमुख्यालय- अलिबाग)
रत्नागिरी- मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर, रत्नागिरी (जिल्ह्याचे मुख्यालय- रत्नागिरी)
सिंधुदुर्ग-सावंतवाडी, कणकवली, कुडाळ, देवगड, दोडामार्ग,मालवण,वेंगुर्ला, वैभववाडी (जिल्ह्याचे मुख्यालय- ओरोस)
पुणे विभाग
पुणे-हवेली, आंबेगाव, इंदापूर, खेड, जुन्नर, ,दौंड, पुरंदर, बारामती, भोर, मावळ, मुळशी, वेल्हे. (जिल्ह्याचे मुख्यालय- पुणे)
सातारा-सातारा, कराड, वाई, महाबळेश्वर, फलटण, माण, खटाव,कोरेगांव, पाटण, जावळी, खंडाळा (जिल्ह्याचेमुख्यालय-सातारा)
सांगली-कडेगाव, जत, मिरज, वाळवा, तासगाव, इस्लामपूर, शिराळा, खानापूर( विटा), पलुस, कवठेमहांकाळ, आटपाडी (जिल्ह्याचे मुख्यालय-सांगली)
कोल्हापूर- आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी,शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले (जिल्ह्याचेमुख्यालय- कोल्हापूर)
सोलापूर- अक्कलकोट, उत्तर सोलापूर,करमाळा,दक्षिण सोलापूर,पंढरपूर,बार्शी, मंगळवेढा,माढा,,माळशिरस,मोहोळ,सांगोला (जिल्ह्याचे मुख्यालय- सोलापूर)
नाशिक विभाग
नाशिक-नाशिक, इगतपुरी , कळवण, चांदवड, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी ,देवळा, नांदगाव, निफाड, पेठ, मालेगाव, येवला, सटाणा, सिन्नर, सुरगाणा. (जिल्ह्याचे मुख्यालय- नाशिक)
अहमदनगर- नगर, अकोले, कर्जत, कोपरगाव, जामखेड, नेवासा, पाथर्डी, पारनेर, राहाता, राहुरी, शेवगांव, श्रीगोंदा, श्रीरामपूर, संगमनेर. (जिल्ह्याचे मुख्यालय- अहमदनगर)
धुळे- धुळे, शिरपूर, साक्री, शिंदखेडा. (जिल्ह्याचे मुख्यालय- धुळे)
नंदुरबार- अक्कलकुवा, अक्राणी महाल, तळोदा, नंदुरबार, नवापूर, शहादा (जिल्ह्याचे मुख्यालय- नंदुरबार)
जळगाव- जळगाव, चाळीसगाव, भडगांव, पाचोरा, जामनेर, पारोळा, एरंडोल, धरणगाव, भुसावळ,मुक्ताईनगर,अमळनेर, चोपडा, यावल, रावेर, बोदवड (जिल्ह्याचे मुख्यालय- जळगाव)
मराठवाडा विभाग
औरंगाबाद- खुलताबाद, औरंगाबाद, सोयगांव, सिल्लोड, गंगापूर, कन्नड, फुलंब्री, पैठण, वैजापूर (जिल्ह्याचे मुख्यालय- औरंगाबाद)
जालना- जालना, अंबड, भोकरदन, बदनापूर, घणसवंगी, परतूर, मंठा, जाफराबाद (जिल्ह्याचे मुख्यालय- जालना)
परभणी- परभणी, गंगाखेड,सोनपेठ,पाथरी, मानवत, सेलू, पूर्णा, पालम, जिंतूर (जिल्ह्याचे मुख्यालय- परभणी)
हिंगोली- हिंगोली, औंढा नागनाथ, सेनगांव, कळमनुरी, वसमत (जिल्ह्याचे मुख्यालय- हिंगोली)
नांदेड- नांदेड, अर्धापूर,भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा,माहूर, मुदखेड, मुखेड, नायगाव, उमरी (जिल्ह्याचे मुख्यालय- नांदेड)
बीड- बीड, किल्ले धारूर, अंबाजोगाई, परळी-वैजनाथ, केज,आष्टी,गेवराई माजलगाव,पाटोदा,शिरूर, वडवणी. (जिल्ह्याचे मुख्यालय- बीड)
लातूर- लातूर, उदगीर, अहमदपूर, देवणी, शिरूर (अनंतपाळ),औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर. (जिल्ह्याचे मुख्यालय- लातूर)
उस्मानाबाद- उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, भूम, वाशी, परांडा (जिल्ह्याचे मुख्यालय- उस्मानाबाद)
अमरावती विभाग
बुलडाणा- बुलडाणा, खामगांव, चिखली, संग्रामपूर,सिंदखेडराजा, देउळगांव, राजा, नांदुरा, मोताळा, मलकापूर, लोणार, जळगाव-जामोद, शेगांव (जिल्ह्याचे मुख्यालय- बुलडाणा)
अकोला-अकोट, अकोला, तेल्हारा, पातूर,बार्शीटाकळी, बाळापूर, मुर्तीजापूर (जिल्ह्याचे मुख्यालय- अकोला)
वाशिम-कारंजा, मंगरुळपीर, मालेगाव, रिसोड, वाशिम तालुका, मानोरा (जिल्ह्याचे मुख्यालय- वाशिम)
यवतमाळ-उमरखेड, झरी,जामणी, घाटंजी, आर्णी, केळापूर, कळंब, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, बाभुळगाव, यवतमाळ,महागांव, मारेगांव, राळेगांव. (जिल्ह्याचे मुख्यालय- यवतमाळ)
अमरावती-चांदुर बाजार, चांदुर रेल्वे, चिखलदरा, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, अमरावती, तिवसा, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर, भातकुली, मोर्शी, वरुड (जिल्ह्याचे मुख्यालय अमरावती)
नागपूरविभाग
नागपूर-नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, सावनेर, कळमेश्वर, नरखेड, काटोल, पारशिवनी, रामटेक, हिंगणा मौदा, कामठी, उमरेड, भिवापूर, कुही (जिल्ह्याचेमुख्यालय-नागपूर)
चंद्रपूर-चंद्रपूर, वरोरा, भद्रावती,चिमूर,नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, मूल, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, सावलीराजुरा, कोरपना, जिवती, बल्लारपूर (जिल्ह्याचेमुख्यालय-चंद्रपूर)
भंडारा-भंडारा, साकोली, तुमसर पवनी, मोहाडी, लाखनी, लाखांदूर (जिल्ह्याचे मुख्यालय- भंडारा)
गोंदिया- अर्जुनी/मोरगाव,आमगाव,सडक/अर्जुनी, सालेकसा, गोंदिया, गोरेगाव,तिरोडा, देवरी (जिल्ह्याचे मुख्यालय- गोंदिया)
वर्धा- आर्वी, आष्टी, सेलू, समुद्रपूर, कारंजा, देवळी, वर्धा, हिंगणघाट (जिल्ह्याचे मुख्यालय- वर्धा)
गडचिरोली- गडचिरोली, अहेरी, कोरची, धानोरा, आरमोरी, भामरागड, चामोर्शी, एटापल्ली, कुलचेरा, कुरखेडा, देसाईगंज (वडसा), सिरोंचा (जिल्ह्याचे मुख्यालय- गडचिरोली)
- Log in or register to post comments
क
कंजूस
Fri, 03/03/2017 - 14:08
नवीन
+१
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 03/03/2017 - 15:05
नवीन
ह्यामध्ये सोलापूरच्या शहरातील भाषेचा प्रभाव फक्त अक्कलकोट भागावर आहे. करमाळा, माढा, माळशिरस, मोहोळ, मंगळवेढा ह्या भागाची भाषा सातारा विभागाप्रमाणे आहे. बार्शी ह्या एकमेव तालुक्याची भाषा मराठवाडा प्रभावाची आहे. बार्शी, तुळजापूर, परंडा आणि उस्मानाबाद ह्या भागाची भाषा एकायला वेगळी आहे. ओळखू येते पटकन. तरीही बार्शीच्या माणसाचा टोन हा जवळपास सातारा भागातल्या टोनप्रमाणे असतो फक्त काही शब्द वेगळे (लातूर साईडचे) वापरले जातात. सोलापूरच्या अन उस्मानाबदच्या सीमेत काही भागात(बोरामणी, तांदूळवाडी, चिवरी, नळदुर्ग,जळकोट, मुरुम, बर्हाणपूर) उमरगा साईडचा टोन आहे. (तो आळंद हुमनाबाद भागातला) उमरग्याचे मराठी, लातूरचे मराठी आणि उस्मानाबादचे मराठी वेगवेगळे ओळखू येते.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 03/03/2017 - 16:38
नवीन
रोचक माहिती.
प्रतिसादांसाठी सर्वांनाच आभार
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Fri, 03/03/2017 - 16:56
नवीन
रायगड-
पनवेल, पेण, उरण, अलिबाग - आगरी
कर्जत, खालापूर, सुधागड, मुरूड - ?
माणगाव,रोहा, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर, तळा - बाणकोटी
चुकभुल देणे घेणे :)
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Fri, 03/03/2017 - 16:58
नवीन
फार उपयुक्त आणि स्पृहणिय उपक्रम आहे हा !
तुम्ही एक नकाशा टाका, लोक आपापल्या भागातील बोलीभाषा सांगू शकतील. मग त्या माहितीवरून बोलीभाषा नकाशा बनवता येईल किंवा शासकीय (जिल्हा/तालुका) विभागांवर बोलीभाषा विभाग आच्छादीत (ओव्हरलॅप / मॅप) करता येतील.
हा कसा वाटतो, सुरुवात करायला ? (जालावरून साभार)...
यापेक्षा मोठा, तालुके दाखविणारा, नकाशा सापडला तर बोलीभाषा मॅप करायला अधिक सोईस्कर होईल.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Fri, 03/03/2017 - 17:30
नवीन
काका, वरच्या प्रतिसादात "जिल्हा-तालुका-भाषा" या फॉरमॅटमध्ये प्रतिक्रिया द्या. मी आर पॅकेज वापरून नकाशा बनवायचा प्रयत्न करतो.
- Log in or register to post comments
प
पिजा
Fri, 03/03/2017 - 19:03
नवीन
सरळसरळ वर्गीकरण नाही सांगता येणार, पण मराठवाड्यात ४-५ dialect सहज सांगता येतील. त्यातले काही मग merge होणारे: बीड-नगर जिल्ह्यात थोडासा, हिंगोली-अकोल्याचा, वर औरंगाबाद-शिर्डी-कोपरगाव कडचा, खाली उस्मानाबाद-सोलापूरचा वरचा भाग(नागराज मंजुळेंचा dialect)
१. मकरंद अनासपुरेंचा : परभणीचा बराचसा भाग(मराठवाड्यातला मध्यवर्ती जिल्हा), बीड जिह्यातले परळी-वैजनाथ, माजलगाव, वडवणी, जालन्यातले परतूर, मंठा)
२. हा जे तालुके बीड- नगर- दक्षिण औरंगाबादच्या भागातले आहेत, त्यांचा: आष्टी,गेवराई पाटोदा,शिरूर, काहीसा पैठण, घणसवंगीचा भाग(जायकवाडीच्या आसपासचा गोदावरीच्या काठ), शेवगाव
३. मांजरा नदीच्या आजूबाजूचा : अंबाजोगाई, केज, लातूर, रेणापूर, चाकूर, अहमदपूर, कळंब, उस्मानाबाद, तुळजापूर
४. नांदेड तेलंगणा सीमेजवळ असल्यामुळे तिथला व सीमेवरच्या तालुक्यांमधील dialect वेगळाच आहे
५. तसाच तो लातूरचा निलंगा आणि उदगीरचा आहे
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 03/04/2017 - 03:32
नवीन
याबद्दल थोडी फार उदाहरणे देता येऊ शकतील का ? dialectस चे आपापसातील आणि प्रमाण मराठी सोबतचे फरक जाणवून घेणे आवडेल. मराठवाड्यातील बोली, लय, ढब या बद्द्ल खूप कमी वाचण्यात आले आहे त्यामुळे अशी माहिती रोचक ठरेल असे वाटते, प्रतिसादासाठी आभार.
- Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे
Sat, 03/04/2017 - 22:30
नवीन
बीड, परभणी, जालना तसेच औरंगाबाद या शहरांमध्ये अजूबाजूच्या ग्रामीण भागापेक्षा वेगळी भाषा आहे. बीड, परभणी, औरंगाबाद आणि काही तालुक्याच्या गावांमध्ये मराठी व उर्दूच्या संक्रमणातून झालेली भाषा मुसलमान समाज वापरतो (या शहरात मुसलमान समाज मोठा आहे). जालन्यात मारवाडी तसेच हिंदी सर्रास चालते. औरंगाबाद मध्ये सर्वदूर आलेल्या लोकांनी मिळून नवीनच थोडिशी पश्चिम महाराष्ट्र पद्दतीची मराठी बनवलीय असं दिसतं.
ग्रामिण बीड जिल्ह्यात ह च्या उच्चाराची उचलबांगडी झालेली दिसते. उदा. जिल्हा ऐवजी जिल्ला.
बोली भाषेत अनेक शब्द थोडे वेगळे आहेत. उदा. कव्हा (केव्हा), कुनी (कोणी), मपलं (माझं), तुपलं (तुझं). पण आताशा असे शब्द हद्दपार होताना दिसत आहेत.
पुण्या मुंबईतच नव्हे तर अगदी अमेरिकेतही बीड जिल्यातली बोली २-४ वाक्यात ओळखता येते. बीड जिल्यात गेल्यावर ४-५ मिनिटं कुणाशी बोलल्यास त्याच्या समाजाची पण कल्पना येऊ शकते. उदा. मराठा, दलित वा वंजारी समाज यांच्या बोलीतही बराच फरक आहे. पारधी, भिल्ल, लमाण, यांच्या बोलीला वेगळा मराठवाडी बाज आहे.
नांदेड व लातूरच्या तेलंगाणा सीमा भागात बरीच गावे दुभाषी आहेत. देगलूर, बिलोली येथे दुकानदारच नव्हे तर बरेच सर्वसामान्य मराठीसोबतच सफाईदार तेलगू सुद्धा बोलतात. त्यामुळे त्यांचा बाज उर्वरीत मराठवाड्यापेक्षा फार वेगळा आहे.
पुढीला काही दिवस मी वरील संदर्भातले उदाहरणे शोधायचा प्रयत्न करुन इथे चिटकवीन.
चु. भू. द्या. घ्या.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Sat, 03/04/2017 - 03:37
नवीन
उपक्रम फार मस्त आहे. पण मला मराठवाड्याची असुनही फार कळत नाही भाषे भाषेतला फरक. मला सगळंच सारखं वाटतं. मी तर सगळ्याचं मिक्स्चर करुन त्याला पुणेरी फोडणी देऊन बोलते.
शुभेच्छा!
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 03/04/2017 - 07:51
नवीन
कमाल आहे, मराठवाड्यातील बोली हा विषय गूगलण्यास गेलो, वाचता वाचता भरकटत जाऊन मिळालेल्या माहितीतून हैदराबाद सामाजिक सुधार संघ बद्दलचा हा इंग्रजी विकिपीडियावरील नवा लेख माझ्या हातातून तयार झाला, मराठवाड्यातील बोली बद्दल वाचण्याची इच्छामात्र तशीच राहीली.
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 03/04/2017 - 04:45
नवीन
रत्नागिरी जिल्ह्यात बाणकोटी आणि संगमेश्वरी, किनार्याजवळ मुसलमान लोकांची दालदी, खारवी इ. अगदी थोड्या प्रमाणात चित्पावनी.
सिंधुदुर्गात प्रामुख्याने मालवणी.
गोव्यात मराठीची पेडणे भागात एक वेगळीच बोली आहे. नमुना द्यायचा प्रयत्न करीन. बाकी चित्पावनी, पद्ये, भटी, कर्हाडी या विशेष बोली आहेत. त्यातही ठिकाणाप्रमाणे थोडे पाठभेद आहेत. कोंकणीचे अगणित प्रकार आहेत.
वसईजवळ सामवेदी वापरात आहे ना?
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sat, 03/04/2017 - 06:21
नवीन
आमच्या रायगड जिल्ह्यात समुद्रकिनार्यापासून जवळपास ५० कीमीच्या अंतरातील गावांमध्ये मुस्लिम वस्ती (मोहल्ले) असते. या लोकांची एक वेगळीच मराठी आहे. ही काही उदाहरणे:
१. डाक्टरसाब हया दुकताय (डॉक्टरसाहेब इथे दुखतंय)
२. खवर चाललास? (कुठे चाललास?)
३. हावर ये (इकडे ये)
४. मिनी तुला सांगितला व्हता ना (मी तुला सांगितलं होतं ना)
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 03/04/2017 - 06:25
नवीन
हे आगरीचं रूप दिसतंय.
रत्नागिरीजवळचे दर्यावर्दी मुसलमान (त्यांना दालदी म्हणत) त्यांची बोली पण बाणकोटीहून जरा वेगळी. एक उदाहरण सांगून आम्ही मरीमर हसायचो. ते म्हणजे "होरीत मान्सां वारली" (होडीत माणसं वाढली).
हे दालदी लोक रत्नागिरीजवळ किनार्याला शिरगाव, साखरतर, मिर्या भागात मोठ्या वस्त्यांमधे रहातात. पूर्वी पुरुष एकजात सगळे मच्छीमार. लॉन्चवर खलाशी. आणि बायका दाताला काळी मिश्री लावून मासे विकत. पुढच्या पिढीतली मुलं दुबईला जाऊन पैसे मिळवू लागली. मग त्यांच्या वस्त्यातून जुन्या कौलारू घराच्या जागी सिमेंटचे बंगले दाटीवाटीने उभे राहू लागले आणि बायका मासे विकणे कमी करून बुरखे वापरायला लागल्या.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 03/04/2017 - 07:01
नवीन
हिंदीचा प्रभाव दिसतो
1 यहां दुखता है
2 कहापर जा रहा है
3 यहांपर आओ
4 मैने तुझे बताया था ना?
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sat, 03/04/2017 - 07:54
नवीन
आफ्रीकेते गेलेल्ल्या कोकणी मुस्लिमांच्या बोली बद्दल मिपा का कुठेतरी वाचले होते.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sat, 03/04/2017 - 07:07
नवीन
सिंधुदुर्ग-सावंतवाडी, कणकवली, कुडाळ, देवगड, दोडामार्ग,मालवण,वेंगुर्ला, वैभववाडी (जिल्ह्याचे मुख्यालय- ओरोस) - ह्या सर्व भागांत मुख्यत्वे मालवणी बोलली जाते परंतु त्यातही अत्यंत सूक्ष्म असे भेद आहेत. तरीही मालवणी ही भाषा नकाशावर टाकायला हरकत नाही.
पैकी सावंतवाडी, कणकवली, कुडाळ,मालवण,वेंगुर्ला, वैभववाडी - मालवणीचा प्रभाव अधिक.
देवगड, दोडामार्ग - इथे मराठीचा प्रभाव भाषेवर अधिक आहे असे मला वाटते, एकदा स्थानिकांकडून विचारुन घेऊन मग सांगते.
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 03/04/2017 - 07:11
नवीन
दोडामार्ग डिचोली पेडणे भागात मराठीच आहे. त्या बोलीला वेगळे नाव नाही. पण ती मालवणी, प्रमाण मराठी किंव कोंकणी याहून वेगळी आहे नक्की. हे भाग दोन राज्यात विभागले गेले असते तरी अगदी आता आता पर्यंत (१८६०) सावंतवाडीच्या सावंतांच्या ताब्यात एकत्र होते.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sat, 03/04/2017 - 07:51
नवीन
तुम्ही गावांची नावे चुकीची लिहीली आहेत. ती नावे डिचोलीम आणि पेरनेम अशी आहेत.
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 03/04/2017 - 07:57
नवीन
=)) तुमचा आत्मविश्वास लै आवडला! =)) =)) ;)
- Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद
Sat, 03/04/2017 - 11:12
नवीन
=)) =))
दाबोलिम, लोलियेम आणि गतकाळातले पन्जिम पण आठवले यानिमित्त!
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sat, 03/04/2017 - 11:18
नवीन
सगळ्यां "म" वाल्यांना गोव्यात पाऊल ठेवायची बंदी करण्यात आलेली आहे हो!!
~हुकुमावरुन
- Log in or register to post comments
स
सूड
Mon, 03/06/2017 - 07:14
नवीन
ते पन्जिम, कॅन्डोलीम ऐकलं की सटकतेच!! =))
- Log in or register to post comments
स
स्वामी संकेतानंद
Sat, 03/04/2017 - 12:01
नवीन
भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील मराठीच्या बोलीला झाडीबोली हे नाव असले तरी तीत बरेच भेद आहेत. प्रत्येक जिल्ह्याची वेगळी. गोंदिया भागातले लोक, " मी का मंता, मी जाता.. मीनं 'नहीं' केलो" ( मी काय म्हणतो, मी जातो, मी नाही केले) अशी वाक्यरचना करतात, लाखनी-साकोली पट्ट्यात "मी का मनुन रायलु, मी जातु, मीनं 'नाई' केलु" असे बोलतील. चंद्रपूरची झाडीबोली नागपुरीच्या जवळ जाते. 'तो' ऐवजी 'थो' म्हणतील. मी इथे लिहितो ती प्रामुख्याने तुमसर-मोहाडी पट्ट्यातली असते. प्रामुख्याने यासाठी बोललो कारण झाडीबोलीतल्या इतर पोटप्रकारांचा थोडा समावेश करायचा मी प्रयत्न करत असतो आणि थोडेफार त्यांचे 'गुण' माझ्या लेखनात दाखवतो. जातीगत पोटभेद वेगळेच. हुशार माणसं समोरचा नेमकी कशी झाडीबोली बोलत आहे त्यावरून त्याची जात ओळखतात.
याखेरीज गडचिरोली जिल्ह्यात माडिया गोंडी, छत्तीसगढ सीमेला लागून असलेल्या काही गावांमध्ये अबुझमाडीया गोंडी या द्रविड गटातील बोलीभाषा बोलल्या जातात. गोंडी तर बोलली जातेच. माडिया आणि अबुझमाडिया दोघांची एकत्र अशी वेगळी भाषा आहे जी गोंडीपेक्षा वेगळी भाषा आहे असे मला वाटते, पण यावर अभ्यासकांनी बोलणे योग्य. गोंडीतही यवतमाळ भागातली गोंडी गडचिरोलीतील गोंडीपेक्षा वेगळी आहे, हिच्यावर मराठीचा प्रभाव दिसून येतो. गोंदिया जिल्ह्याच्या उत्तरेला बोलली जाणारी गोंडी हीसुद्धा वेगळी आहे, तिच्यावर मराठी, हिंदी छत्तीसगढीचा प्रभाव दिसतो. इतकी सरमिसळ आहे की मलासुद्धा पहिल्यांदाच ऐकूनही थोडाफार अंदाज लावता आला. माडिया मात्र पूर्ण डोक्यावरून गेली. म्हणूनच मला माडियागोंडीला गोंडीची बोली म्हणण्यापेक्षा स्वतंत्र भाषा म्हणावेसे वाटले.
अजून तिसरा मोठा बोलीभाषागट हा झाडीपट्टीच्या उत्तरेकडील तालुक्यांत दिसेल. तुमसर, तिरोडा, गोंदिया, आमगांव आणि गोरेगांव तालुक्यां हा भाषागट बहुसंख्येने आढळतो. याखेरीच थोड्या प्रमाणात मोहाडी, साकोली, लाखनी तालुक्यांत काही गावांमध्ये सापडेल. ह्या गटातील बोली हिंदी भाषागटातील आहेत, मात्र हा भाषागट हिंदीची बोली म्हणजे डायलेक्ट नसून स्वतंत्र भाषा म्हणता येते. यात पोवारी/पंवारी ही सर्वात मोठी बोली असून तिच्याच नावे हा भाषागट भारताच्या जनगणनेत मोजला जातो. पोवारीतसुद्धा बालाघाट-गोंदियाची पोवारी आणि तुमसरची पोवारी या दोन बोली आहेत, फरक फक्त काही शब्दांचाच आणि अव्ययांचाच आहे, बाकी उच्चार, ढब सगळे सारखे. पोवारीच्या आणखी तीन बोली आढळतात- एक छिंदवाडा जिल्ह्यात, एक बैतुल जिल्ह्यात आणि एक वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाटगे तालुक्यात. ( पण छिंदवाडा, बैतुल महाराष्ट्राबाहेर असल्याने वगळता येतील.) या तिन्ही बोलींना एकत्रित भोयरी किंवा भोयरपवारी म्हणण्यात येते. झाडीपट्टीत या पोवारीसारख्याच इतर बोली आहेत- कोष्टी/हलबी, लोधी, चम्हारी आणि मरारी. ही सगळे जातीवाचक नावेच आहेत हे लक्षात आले असेलच. या बोलींमध्ये फारसा फरक नाही तसा. ९०% सारखीच असते. उदाहरणार्थ पोवारी/पवारीत ' आम्ही करू'ला ' आमि करबो/आमि करबी' म्हणतील, हलबीत 'आमि करबन' म्हणतील. बोलीभाषा सप्ताहानिमित्त मी लेख दिलाय त्यात पवारीची तीनचार वाक्ये वानगीदाखल आहेत.
याखेरीत होली लोकांची वेगळी बोली असल्याची माहिती मिळाली आहे. मी प्रत्यक्ष ऐकलेली नाही, पण 'ती वेगळीच आहे, काही कळत नाही' असे मला सांगण्यात आल्याने ही बोली गोंडीचीच बोली असणार किंवा एखादी द्रविड कुळातील भाषा असणार असा अंदाज आहे. होली लोक संख्येने अत्यंत कमी आणि विखुरलेले आहेत. नकाशावर निश्चित असा प्रदेश दाखवणे कठीण आहे.
झाडीपट्टी हा बहुभाषिक प्रदेश असल्याने आमच्याकडे निश्चित असे भाषिक प्रदेश नाहीत. उत्तरेकडील पाच तालुके प्रामुख्याने पोवारीगटाचे म्हणता येतील, मध्यवर्ती भागातले प्रामुख्याने झाडीबोलीचे म्हणता येतील आणि दक्षिणेकडचे आणि इकडेतिकडे विखुरलेले जंगली भाग माडिया आणि गोंडी म्हणता येतील. पण इकडे एकेका जातीची, पर्यायाने एकेका गावाची अशी एक बोली असते. पोवारांच्या गावात पोवारी ऐकू येईल, त्याच्या शेजारी असलेल्या लोधी गावात लोधीबोली ऐकू येईल, त्याच्यात शेजारी असलेल्या गोंडी गावांमध्ये गोंडी ऐकू येईल, तेली-कुणबी-कोहळी गावांमध्ये झाडीबोली. एकाच गावातसुद्धा प्रत्येक जातीचा माणूस आपल्या घरी आपली भाषा बोलेल आणि बाहेर वेगळी, शक्यतो मराठी किंवा हिंदी.
- Log in or register to post comments
प
पैसा
Sun, 03/05/2017 - 06:35
नवीन
तू खरा भाषाशास्त्रज्ञ व्हायचास!
- Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे
Sun, 03/05/2017 - 23:08
नवीन
प्रतिसाद खूप आवडला.
खूप छान महिती दिल्यावद्दल आभार!
- Log in or register to post comments
अ
अॅस्ट्रोनाट विनय
Sun, 03/05/2017 - 06:33
नवीन
वा वा! खुपच छान धागा काढलाय.
बोलीभाषांचा नकाशा बनवून तो महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत आणि सरकारी- निमसरकारी कार्यालयात टांगायला हवा
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Sun, 03/05/2017 - 08:45
नवीन
प्रमाण मराठीचा नकाशा आधी लावण्याची गरज आहे, असे विणम्रतेने णमूद करते
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 03/05/2017 - 15:47
नवीन
महाराष्ट्रमंडळांचे ठिपके + महाराष्ट्राचा नकाशा जोडून लावाकी, हाकानाका
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 03/05/2017 - 15:54
नवीन
तोच नकाशा अजून काही वर्षांनी (पुढील पिढीसाठी) महाराष्ट्र मंडळाचेच ठिपके आणि महाराष्ट्र मिळून म्हिग्लीश बोलीचा नकाशा म्हणून दाखवाला जाईल का ? आणि म्हिंग्लीश मंडळी प्राकृता प्रमाणे म्हिंग्लिश मधून लेखनावर भर देईल आणि त्यातून पहिला म्हिंग्लिश लेखक .... असो :)
अवांतरासाठी क्षमस्व
- Log in or register to post comments