Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पागोळ्या

न — निराकार गाढव, Sun, 03/05/2017 - 14:53
मित्रांसंगं मला जाऊं द्या की रं मला बी पान्यात खिळू द्या की अंगात वारं भिन्नू द्या की रं मला बी पावसांत भिंजू द्या की ——- (चाल क्र. १) गच् झाकून टोपलं भाकार पिठलं शेताकडं चालूया लप् लप् लुगाड टाचून धोतार खोचून लावनी करतिया लग् बग् इरल्याखाली गानं घुमूं द्या SS इरल्याखाली गानं घुमू द्या की रं, मला बी कामावर यिऊं द्या की ——- (चालीत बदल – चाल क्र. २) सातारंगाचा पदर ओढून आई अंबेगत लुगाड नेसून बाप्पे डोंगर बाया जाले वो नव्या नवरीचा शिणगार क्येला वो आता उन्नाची हळ्ळद होऊं द्या SS आता उन्नाची हळ्ळद होऊं द्या की रं, मला बी झिम्माड खिळू द्या की ————– (चालीत बदल – चाल क्र. १) अंगानं लांबडा रंगानं तांबडा झिंग झिंग पिंगतो चतू S रं S नाजुक्क टाचनी लाखात द्येखनी कशी हुनार त्येला फितू S र नाकतुंड्याच्या मांगूस उंडू द्या SS नाकतुड्याच्या मागूस हुडू द्या की रं, मला बी गवतात धावूं द्या की ——- (चालीत बदल – चाल क्र. २) किती मऊ मऊ अंग तुझं गं कशी घाबरून तू शंखात जाती गं कशी लव्वाळ्याला चिकटून र्‍हाती गं कशी चिखलामदे हळ्ळूच लपती गं गोगलगायीला उचलून घिऊंन्द्या SS गोगलगायीला उचलून घेऊ द्या की रं, मला बी उन्णाड र्‍हाऊं द्या की ————- (चालीत बदल – चाल क्र. ३) बगू गार गार हिरवी झाडी आन् व्हळ्यामंदी सोडू व्हडी पावसाची होईल कडी छत्रीची तुटंल काडी चिखलात धप् थफ् करून्द्या SS चिखलाशी मस्ती करून्द्या की रं, बिळातून खेकाडं काढूं द्या की ——- (चालीत बदल – चाल क्र. १) काढून कापडं होऊन नागडं हिरीत पोवूं द्या डूंब डंब थेटरात घुसून घोळक्यानं बसून शिणूमा बगूं द्या रम् पम् आन् म्हैशीच्या पाठीवर बसूं द्या आरं, म्हैशीच्या पाठीवर बसूं द्या की रं, मला बी राजागत फिरूं द्या की ——- (चालीत बदल – चाल क्र. २) आज दोस्तांची लै आठव काढितो लांब खाटेवरून पागोळ्या मोजितो आन् बेडकाची डराव डराव ऐकितो कदी वहीमदे चित्तूर रेखाटितो आता कधीतरी बाहेर जाऊं द्या SS आता कधीतरी बाहेर जाऊं द्या की रं, मला बी वार्‍यात न्हाऊं द्या की ——- (चाल क्र. २) माय खाटेवरि उदास बैसते जनू सन्नासुदिक सुत्तक ठेविते बाप डाकतरच्या वार्‍या करिते कोन्च्या जल्मांचि पापं त्ये भोगिते औशिद अभ्यास जळ्ळं ऱ्हाऊं द्या SS औशिद अभ्यास सारं ऱ्हाऊं द्या की रं… मला बी मोरागत नाचूं द्या की ——- मित्रांसंगं मला जाऊं द्या की रं मला बी पान्यात खिळू द्या की अंगात वारं भिन्नू द्या की रं मला बी पावसांत भिंजू द्या की ——- (एका कॅन्सरग्रस्त लहानग्याचं मनोगत)

प्रतिक्रिया द्या
2622 वाचन

💬 प्रतिसाद (9)
अ
अभ्या.. Sun, 03/05/2017 - 14:58 नवीन
अर्ररर्र्, नगा लावू असा चटका. :(
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 03/05/2017 - 17:26 नवीन
हम्म...
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 03/05/2017 - 17:44 नवीन
शेवटचं वाक्य नको होतं हो :( कवितेला 'जाम भारी' असं म्हणावं असा प्रश्न पडलाय.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 03/06/2017 - 06:16 नवीन
प्लस वण. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
प
प्राची अश्विनी Mon, 03/06/2017 - 09:51 नवीन
खरंच.+11
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
प
प्रीत-मोहर Mon, 03/06/2017 - 07:27 नवीन
खरय. शेवटचं वाक्य नको होत. आवडली कविता
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Mon, 03/06/2017 - 10:03 नवीन
अतिशय प्रभावी आणि अस्वस्थ करणारी रचना.
  • Log in or register to post comments
म
मितान Mon, 03/06/2017 - 10:30 नवीन
!
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 03/07/2017 - 08:45 नवीन
:(
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा