आदिप्रश्न
धगधगे कोटी सूर्यांचे
स्थंडिल अहर्निश जेथे
का अनादि ब्रह्माण्डाचे
लघुरूप जन्मते तेथे ?
अणुगर्भ कोरुनी बघता
जी अवघड कोडी सुटती
त्या पल्याड पाहू जाता
का शून्य येतसे हाती ?
का अंत असे ज्ञेयाला
की ज्ञान तोकडे ठरते
की सीमा अज्ञेयाची
अज्ञात प्रदेशी वसते ?
💬 प्रतिसाद
(15)
च
चांदणे संदीप
गुरुवार, 03/09/2017 - 10:21
नवीन
पण तुमची एक कविता वाचली की "सखाराम गटणेच्या" चालीवर असे म्हणावेसे वाटते की पुढचा आठवडाभर एखादी चारोळीही वाचू नये! ;)
कृहघ्या!
Sandy
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
गुरुवार, 03/09/2017 - 10:51
नवीन
धन्यवाद स॑दीप. कृहघ्या म्हणजे?
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
गुरुवार, 03/09/2017 - 10:54
नवीन
कृपया हलके घ्या! :)
- Log in or register to post comments
स
संदीप-लेले
गुरुवार, 03/09/2017 - 12:14
नवीन
अप्रतिम. थेट विश्र्वनिर्मितीच्या गाभ्यालाच हात घातलात !
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Fri, 03/10/2017 - 05:29
नवीन
धन्यवाद, फूत्कार!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 03/10/2017 - 06:05
नवीन
वाह!
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Fri, 03/10/2017 - 06:36
नवीन
आत्मब॑ध, धन्यवाद !
- Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर
Fri, 03/10/2017 - 11:20
नवीन
कविता आवडली !!
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Sat, 03/11/2017 - 12:53
नवीन
धन्यवाद, शार्दूल!
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Sat, 03/11/2017 - 13:33
नवीन
आवडली. इतकी धगधगीत की खरंतर "जे देखे रवी" या सदरात जास्त समर्पक ठरेल. :)
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
गुरुवार, 03/16/2017 - 05:47
नवीन
धन्यवाद प्राची अश्विनी ! निरुत्तर करणाऱ्या प्रश्नांची धग एखाद्या अस्पष्टपणे ऐकू येणाऱ्या मोहक गीतासारखी पिच्छा सोडत नाही !
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 03/16/2017 - 06:16
नवीन
कविता खूप आवडली.
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
गुरुवार, 03/16/2017 - 07:12
नवीन
धन्यवाद, पैसा !
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 03/16/2017 - 15:51
नवीन
६ अधिक ६
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Fri, 03/17/2017 - 05:26
नवीन
@सूड, स्कोअर-कीपि॓गची अनाहूत सेवा पुरविल्याबद्दल आभार !
- Log in or register to post comments