Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुझे रंग

प — परशु सोंडगे, Mon, 03/13/2017 - 07:19
तुझे रंग माझ्यात विरघळून गेलेत जसे स्वच्छ पाण्यात अलगद पांगत जावेत रंग.... आता तुझे रंग कोणते आणि माझे रंग कोणते मला कुठं ओळखता येतात ? तुझ्यात माझे विरघळलेले रंग मलाच ओळखता येत नाही हे तू नुसता पहात हासत राहिलास.. तुझ्या चेह-यावर पांगत गेलेले हासण्याचेते चावट रंग तुला तरी कुठं लपवता आले ? माझे तुझ्यात मिसळलेले रंग अलिप्त करावं म्हटलं तर... ते कुठं शक्य होतं आता. अख्ख जाळावचं लागेल माझे मला मी जळून जळून गेल्यावर उरतील खाली रंग माझ्या अस्तित्वाचे साक्षीदार... म्हणून..... त्यामुळे मी आता त्या फंदयातच नाही पडतं.. नुसतं रंगात चिंब चिंब भिजत राहते. आपण होऊनचं. कायम रंगीतच राहते मी.... तुझे....रंग...काय नि माझे रंग काय शेवटी रंगच ते. तुला, तुझे बघ रंग ओळखता येतात का ? माझ्यात विरघळलेले.... जाऊ दे... ते नुसतचं भिजत राहू रंगात..... परशुराम सोंडगे,पाटोदा 9673400928 12.3.2017

प्रतिक्रिया द्या
2689 वाचन

💬 प्रतिसाद (4)
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 03/13/2017 - 13:30 नवीन
हे ही ठीक.
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 03/13/2017 - 13:57 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
प
पुंबा Tue, 03/14/2017 - 07:11 नवीन
आवडली. फक्त
फंदयातच
हे 'फंदातच' असं हवं.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी गुरुवार, 03/16/2017 - 05:05 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा