किमया
यान झेपावले, त्याने धरा सोडली
ते पाहण्या, जगाने मान उंचावली
शत विसुक्ष्म ग्रह, स्थिरावले कक्षी
ना उसंत, त्यांनीही मान उंचावली
डॉलर घेउनी, सेवा जगाला दिली
आज रुपयानेही मान उंचावली
अद्भुत अजब किमया पाहून ही
डोळे पाणावले नी मान उंचावली
💬 प्रतिसाद