Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कुणी तयार आहे का माझ्यासोबत खो कथा ( chain fiction Story) लिहायला ?

अ
अॅस्ट्रोनाट विनय
Tue, 03/14/2017 - 19:50
🗣 57 प्रतिसाद
दोन किंवा त्यापेक्षा जास्त लेखकांनी लिहलेल्या कथांना chain fiction असं म्हणतात. ही कथा कशी लिहली जाते ते सांगतो – एका लेखकाने कथा लिहायला सुरुवात करायची आणि अर्धवट सोडून द्यायची, दुसऱ्याने त्याच्या पुढचा भाग लिहायचा, तिसऱ्याने त्याच्या पुढचा वगैरे वगैरे. परत दुसरा round, तिसरा round. अशापद्धतीने कथा पुर्ण करायची. (थोडक्यात एकमेकांना खो देत पुढे जायचं) कथालिखाण करतांना भिडूंनी एकमेकांशी चर्चा करायची नाही. प्रत्येक पोस्टमध्ये किती शब्द असावेत आणि अंदाजे किती पोस्टमध्ये कथा संपवायची एवढंच फक्त आधी ठरवून ठेवायचं. गेल्यावर्षी मी आणि रविंद्र भयवाल आम्ही दोघांनी मिळून दुहेरी खेळी नावाची विज्ञानकथा लिहली होती. (प्रकाशन: धनंजय २०१६) मराठीतील कदाचित ही पहिलीच प्रकाशित खो कथा असावी. मिपा परिवारातील लेखक उत्साही आहेत, नवनवीन आव्हानं पेलायला तयार असतात. म्हणून इथेही लेखकांनी मिळून कथा लिहावी अशी मनापासून इच्छा आहे. पण वरील कथाप्रकार मी अजून थोडा अवघड आणि मजेदार केला आहे. उदाहरणार्थ: समजा खो कथा लिहायला तीन लेखक तयार आहेत (अ, ब, क) कथेची लांबी सहा पोस्ट असावी आणि प्रत्येक पोस्टमध्ये ५०० ते हजार शब्द असावेत हे त्यांनी आधीच ठरवलंय. कथेची सुरुवात अ करतोय. पण तो नेहमीप्रमाणे पहिल्या पोस्टने सुरुवात करणार नाही तर मधूनच कुठूनतरी करेल. समजा अ ने तिसरी पोस्ट लिहली. आता तो पुढच्या भिडूला खो देईल. भिडू ....लिहलेली पोस्ट ....... खो अ ........३ ............ क तू सहावी पोस्ट लिह क ........ ६............ ब तू पाचवी पोस्ट लिह ब ........ ५ ............ क तू पहिली पोस्ट लिह क ........ १ ............ अ तू दुसरी पोस्ट लिह अ ......... २ ............ आता उरला ब. त्याने चौथी पोस्ट लिहून कथा संपवावी challenging प्रकार आहे. डोकं भंजाळून जाईल पण मजा येईल. खात्री बाळगा. सांगा मग. कुणी आहे का तयार ??
वर्गीकरण
उपक्रम

प्रतिक्रिया द्या
12186 वाचन

💬 प्रतिसाद (57)
न
निशदे Tue, 03/14/2017 - 21:25 नवीन
करा सुरुवात..... मी लिहीन. 'खो' कधी देताय सांगा......
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Tue, 03/14/2017 - 21:34 नवीन
मी तयार आहे, पण मला सध्या लय काम आहे. एप्रिल मध्यावर मोकळा होईन तेव्हा लिहू शकेन.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 03/15/2017 - 02:48 नवीन
मला पण आवडेल. अर्थात जमेल की नाही माहित नाही.
  • Log in or register to post comments
भ
भीमराव Wed, 03/15/2017 - 02:50 नवीन
हायला कमाल आहे, माणसं समान परिस्थीतीमधे समान विचार करतात अस म्हणतात ते काय चुक नाही, ते मागं जव्हेरगंज न मोजी ची १ कथा स्वतः परत लिहीली तेव्हा पासुन माझ्याही मनात होतं कि मिसळपाव च्या जबराटकथा लेखकांची १ जुगलबंदी व्हावी, कोणीतरी १ जण सुरुवात करेल अन दुसरे भर घालत जातील, प्रत्येकाची शैली वेगळी आहे, त्यामुळे वाचायला फार मज्जा येईल. सुरेख कल्पना.
  • Log in or register to post comments
व
विनिता००२ Wed, 03/15/2017 - 06:05 नवीन
आवडेल असे लिहायला :)
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 03/15/2017 - 07:34 नवीन
आम्ही अनाहितातर्फे हा प्रयोग केला होता. तो सुरू ठेवणे नंतर जमले नाही. पण २०१४ दिवाळी अंकात ऐलमा पैलमा आणि कथा या दोन कथा अशा खो खो प्रकाराने लिहिल्या होत्या आणि त्याना उत्तम प्रतिसाद मिळाला होता. नेहमी न लिहिणार्‍यांनाही सवय व्हावी या हेतूने आणि सलग वेळ देणे महिलांना सहसा जमत नाही यामुळे हा प्रयोग तेव्हा आम्ही केला होता. बर्‍याच जणी मिळून बरेच दिवस लिहीत होत्या! आणि अमूक शब्द मर्यादा किंवा असे काही नियम अर्थातच केले नव्हते. तुमच्या प्रयोगाला भरपूर शुभेच्छा! रिझल्ट उत्तमच असणार.
  • Log in or register to post comments
र
राजाभाउ Wed, 03/15/2017 - 09:43 नवीन
मस्त आयडियाय पण भाग क्रमान नाय आले तर वाचकांना संपे पर्यंत थांबाव लागेल ना
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 03/15/2017 - 10:26 नवीन
असा कवितेचा प्रयत्न मागे झाला होता. विशेष उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला नाही त्याला. बाकी उत्तम कल्पना.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Wed, 03/15/2017 - 13:43 नवीन
भारी यार आयडिया, मी पण तयार आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 03/15/2017 - 13:55 नवीन
जानी, जब हम लिखते है, तो खुद लिखते है, जब खुद लिखते है तो बस खुदही लिखते है. ऐसे गर्दीमें टांगा नही चलाया करते है
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 03/16/2017 - 13:15 नवीन
ये हिकडं तू शेजारी बस बाबा, लगी उठून दांडपट्टा फिरवाय लागतंय, कसं होणार ह्या पोराचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. गुरुवार, 03/16/2017 - 13:30 नवीन
आलो, चुनाडबी हाय का बाप्या? बसतो निवांत जरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 03/16/2017 - 14:14 नवीन
Image removed. चुना पुडीतच ठिवलाय, मळ जरा डबलिंग मदी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
५
५० फक्त गुरुवार, 03/16/2017 - 14:26 नवीन
अबे, त्या उसेन बोल्ट्ला पण चार चौघात पळावं लागतंय बे. तेच्या २०-२२ मेडलातले ५-६ असं गर्दित पळापळी करुन मिळलेत तेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सचिन काळे Fri, 03/17/2017 - 01:55 नवीन
संवाद लई भारी!!! आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सचिन काळे Fri, 03/17/2017 - 01:58 नवीन
टांगाचा संवाद लई भारी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन काळे
ज
जव्हेरगंज Wed, 03/15/2017 - 14:14 नवीन
स्टोरी बघून आपल्यातर्फेही मसाला टाकला जाईल!!!
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 03/15/2017 - 14:16 नवीन
तयार आहे.
  • Log in or register to post comments
च
चॅट्सवूड Wed, 03/15/2017 - 14:47 नवीन
मला द्या खो, मी लगेच लिहायला घेतो.
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Wed, 03/15/2017 - 15:35 नवीन
तयार आहे.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 03/15/2017 - 17:09 नवीन
कथा लिहायला आवडत नाही पण कल्पना उत्तम. वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
अ
अॅस्ट्रोनाट विनय Wed, 03/15/2017 - 18:03 नवीन
तर आता मी पकडून नऊजण तयार आहेत. नियम ठरवू आणि सुरू करून देऊ. आता नियम ठरवून घ्यावे लागतील. माझ्या मनातील प्रश्न मांडतो. १. कथा किती पोस्ट्स मध्ये संपवावी ? ही मर्यादा नसेल तर कथा हनुमानाच्या शेपटीसारखी लांबत जाईल. २. प्रत्येक पोस्टची शब्दमर्यादा काय असावी? ३. प्रत्येक पोस्ट लिहण्यासाठी वेळमर्यादा काय ठेवायची? म्हणजे एकाने खो दिल्यानंतर दुसऱ्याने किती वेळेत पुढची पोस्ट टाकायची ? कारण रंगत तेव्हाच वाढते जेव्हा फटाफट पोस्ट टाकल्या जातात. कुणाच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर मांडावेत. उत्तरं शोधू आणि नियम बनवू. कारण एकदा खो कथेचा महासंग्राम सुरू झाला की मग लेखक भिडूंनी आपापसात चर्चा बंद करायची आहे.
  • Log in or register to post comments
न
निशदे Wed, 03/15/2017 - 19:53 नवीन
अॅस्ट्रोनाट विनय, पुढची चर्चा व्हॉट्सअ‍ॅप वर ग्रुप करून करता येईल. त्यामुळे वाचकांनाही यप्रोसेस्म्मधून वेगळे ठेवता येईल. तुमच्या प्रश्नांना खाली उत्तरे देत आहे. १. माझ्या मते कथा कधी संपवावी हे लेखकच ठरवतील. उत्तम लेखन जोवर होत आहे तोवर चालू ठेवायला काहीच हरकत नाही. उदा. George R. R. Martin (चा लेखक) याने इतर लेखकांबरोबर लिहिलेली Wild Cards ही सिरीज. तसे वाटल्यास आपापसात ठरवून थांबता येईल. २. जितकी जास्त तितके चांगले हे.मा.वै.म. (पण माझे आधीचे लेखन पाहून हे मत का आले हे तुम्हाला कळेलच) ;) ३. पूर्ण सहमत. लेखकांमध्ये जितके coordination असेल तितके हे सोपे जाईल. " एकदा खो कथेचा महासंग्राम सुरू झाला की मग लेखक भिडूंनी आपापसात चर्चा बंद करायची आहे. " मी याच्याशी अंशतः असहमत आहे. जितकी चर्चा होईल तितके लेखन उत्तम होत जाईल असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अॅस्ट्रोनाट विनय
स
सूड Fri, 03/17/2017 - 15:00 नवीन
संयुक्त व्यनि करा. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शिळोप्याच्या गप्पा वाढतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निशदे
स
स्रुजा Fri, 03/17/2017 - 20:37 नवीन
+१ व्यनि करु. मला वाटतं, की आपापसात न ठरवता गोष्ट लिहीताना खो देऊ / घेऊ. उत्स्फुर्तपणे कुठे जातेय कथा ते बघायला मजा येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
द
दीपक११७७ Wed, 03/15/2017 - 18:06 नवीन
मी पण तयार आहे
  • Log in or register to post comments
अ
अॅस्ट्रोनाट विनय Wed, 03/15/2017 - 18:08 नवीन
@ आदुबाळ तुम्ही असते तर अजून मजा आली असती. पण कामांपुढे कुणाचे न चले. त्यामुळे हरकत नाही. या कथेत प्रतिसाद आणि मार्गदर्शनरूपी सहभाग मात्र जरूर नोंदवावा. पुढच्या खो कथेत तुम्ही भाग घ्यावा अशी इच्छा.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 03/16/2017 - 15:01 नवीन
अहो मला फार इच्छा आहे हो, पण एप्रिलमध्यापर्यंत बराच काळ मी संपर्कातच नसेन बहुतेक. फुडल्या टायमाला नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अॅस्ट्रोनाट विनय
स
सुखी Wed, 03/15/2017 - 18:24 नवीन
9 10 जण असतील तर 2 टीम करा, अन लिहायला सुरु करा..
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 03/15/2017 - 19:46 नवीन
हो. खुप लोक असतील तर दोन टिम असाव्यात असे मलाही वाटले. खुप मोठी साखळी नको. खास करुन पहिल्यांदाच तुम्ही असा प्रयोग करताय तर. पहिली ५-६ जणांची कल्पना चांगली आहे. राबवा पटकन. घ्या एकाने पुढाकार आणि मांडा नियमांचा प्रस्ताव. बाकीचे हो किंवा नाही सांगतील. वाचायला अत्यंत उत्सुक!
  • Log in or register to post comments
च
चॅट्सवूड Wed, 03/15/2017 - 20:19 नवीन
१. कथा जर नऊ लोक लिहिणार असतील तर, प्रत्येकी एक म्हणजे निदान नऊ पोस्ट झाल्या पाहिजेत. २. शब्द मर्यादा: शंभर ते पाचशे शब्दापर्यंत असावी, वर्ड पेज ची जास्तीत जास्त तीन पाने ३. वेळ मर्यादा: "खो" दिल्यानंतर तीन दिवस, (बहात्तर तास ), एका महिन्यात कथा पूर्ण होऊ शकते, जितक्या लवकर पोस्ट टाकता येईल तितक्या लवकर टाकावी. जर तीन दिवसात पोस्ट पूर्ण झाली नाही तर, तो लेखक बाद होईल आणि मग पुढच्या कोणत्याही लेखकाला "खो" देता येईल.
  • Log in or register to post comments
व
विनिता००२ गुरुवार, 03/16/2017 - 08:33 नवीन
वर्ड पेज ची जास्तीत जास्त तीन पाने >>> एका पेजमधे अंदाजे ४००० शब्द बसतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चॅट्सवूड
व
विनिता००२ गुरुवार, 03/16/2017 - 08:33 नवीन
बाकी अटी मान्य :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनिता००२
च
चॅट्सवूड गुरुवार, 03/16/2017 - 16:12 नवीन
४००० शब्द? मी १००० शब्दांची कथा लिहिली होती, संवादांना परिच्छेद देऊन, तेव्हा वर्ड पेजची पाच पाने लागली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनिता००२
च
चॅट्सवूड गुरुवार, 03/16/2017 - 16:17 नवीन
कदाचित तुम्ही लहान फॉन्ट साईज वापरात असाल, मी नेहमी फॉन्ट साईज ११ वापरतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनिता००२
व
विनिता००२ Fri, 03/17/2017 - 09:00 नवीन
मी नेहमी फॉन्ट साईज ११ वापरतो >>> मी पण असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चॅट्सवूड
आ
आषाढ_दर्द_गाणे गुरुवार, 03/16/2017 - 00:05 नवीन
वाचतोय! :D
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल गुरुवार, 03/16/2017 - 02:20 नवीन
लवकर होउदे सुरवात. उत्सुकता ताणलिये
  • Log in or register to post comments
अ
अॅस्ट्रोनाट विनय गुरुवार, 03/16/2017 - 03:33 नवीन
दोन टीम पाडून लिहायचं म्हणजे कसं लिहायचं ? की पाचपाच जणांच्या दोन टीम पाडून दोन्ही टीमने वेगवेगळ्या कथा लिहायच्या ? वाचकांचाही आनंद द्विगुणित होईल
  • Log in or register to post comments
स
सुखी गुरुवार, 03/16/2017 - 12:13 नवीन
५ ५ च्या दोन टीमा पडून २ गोष्टी लिहायचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अॅस्ट्रोनाट विनय
ज
जव्हेरगंज गुरुवार, 03/16/2017 - 05:35 नवीन
एकच टीम असावी. सगळ्यांना सगळं सुचेल असं थोडीच होणार आहे. पुन्हा वेळेचा प्रश्न आहेच. खो देण्याची पद्धत नसावी. इच्छुकांनी आपणहून खो घ्यावा. म्हणजे चांगलं सुचलं तेच पुढे येईल. पोस्टची शब्दमर्यादा पाच ते दहा ओळी असू द्यात. म्हणजे जास्त वेळ घेतला जाणार नाही!
  • Log in or register to post comments
च
चॅट्सवूड गुरुवार, 03/16/2017 - 07:55 नवीन
मला ही वाटत, एकच ग्रुप असावा म्हणजे परत "या टीम ने वेगळी पद्धत वापरली" असे काही होणार नाही, प्रतिसाद जर चांगला मिळाला तर पुढच्या वेळी, दोन टीम्स ठेवता येईल.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 03/16/2017 - 13:22 नवीन
लिहिलेला त्याच्या वाट्याचा कथाभाग त्याच धाग्यात अपडेट करणार आहे का संपादक/साहित्य संपादक मंडळी? असल्यास वाचायला मजा येईल, नपेक्षा स्व-खो पद्धतीत मेनबोर्ड फ्लड होऊन जाईल, अशी शक्यता वाटते, जे तितकेसे स्वागतार्ह नसेल, असे माझे वैयक्तिक मत पडते आहे. अर्थात, नाट लावणे हा उद्देश नसून तांत्रिक मुद्दा म्हणून मांडतो आहे, बरंका विनय भाऊ, बाकी होल वावर इज आवर :)
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/16/2017 - 16:12 नवीन
खतरनाक कन्सेप्ट ! एकदम इन्सेप्शन्न चित्रपटातील शेयर्ड ड्रीम आठवले ...
  • Log in or register to post comments
ग
गणामास्तर Fri, 03/17/2017 - 18:25 नवीन
बाकी काहीही बोल भावड्या तू, पण त्या इन्सेप्शनची आठवण नको करून देऊ बाबा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
म
मिडास गुरुवार, 03/16/2017 - 16:47 नवीन
एक सूचना. एकच कथा सगळ्यांनी थोडी थोड़ी लिहिन्या पेक्षा सर्वांनी मिळुन एक विषय ठरवा आणि त्याच्या अनुषंगा ने प्रत्येकाने स्वतंत्र कथा लिहावी.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर गुरुवार, 03/16/2017 - 20:46 नवीन
त्यात काय मजा आहे आणि? मला मूळ कल्पनाच जास्त आवडली आहे. क्ष लेखकांनी एकमेकांशी न बोलता क्ष भागांमध्ये एकच कथा लिहायची. पण वेगवेगळ्या सिक्वेन्सने. अत्यंत चॅलेंजिंग गोष्ट आहे ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिडास
अ
अॅस्ट्रोनाट विनय Fri, 03/17/2017 - 13:19 नवीन
सही पकड़े है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
आ
आनंदी गोपाळ Fri, 03/17/2017 - 16:34 नवीन
स्पिन द यार्न. अर्थात लपेट्ते जाओ. मायबोलीवर हा प्रकार गेली कित्येक वर्षे खेळला जातो. अन भन्नाट स्टोर्‍या तयार होतात. मिपावर हा प्रकार नवा दिसतोय हे पाहून आश्चर्य वाटले.
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Fri, 03/17/2017 - 16:38 नवीन
हे पहा. किंवा ही कथा : कथा ३. सेव्ह द अर्थ * तिकडची जाहिरात म्हणून कृपया माझ्या पोस्टकडे पाहू नये. हा प्रकार खूप जुना आहे, इतकेच निदर्शनास आणायचे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा