Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कुणी तयार आहे का माझ्यासोबत खो कथा ( chain fiction Story) लिहायला ?

अ
अॅस्ट्रोनाट विनय
Tue, 03/14/2017 - 19:50
🗣 57 प्रतिसाद
दोन किंवा त्यापेक्षा जास्त लेखकांनी लिहलेल्या कथांना chain fiction असं म्हणतात. ही कथा कशी लिहली जाते ते सांगतो – एका लेखकाने कथा लिहायला सुरुवात करायची आणि अर्धवट सोडून द्यायची, दुसऱ्याने त्याच्या पुढचा भाग लिहायचा, तिसऱ्याने त्याच्या पुढचा वगैरे वगैरे. परत दुसरा round, तिसरा round. अशापद्धतीने कथा पुर्ण करायची. (थोडक्यात एकमेकांना खो देत पुढे जायचं) कथालिखाण करतांना भिडूंनी एकमेकांशी चर्चा करायची नाही. प्रत्येक पोस्टमध्ये किती शब्द असावेत आणि अंदाजे किती पोस्टमध्ये कथा संपवायची एवढंच फक्त आधी ठरवून ठेवायचं. गेल्यावर्षी मी आणि रविंद्र भयवाल आम्ही दोघांनी मिळून दुहेरी खेळी नावाची विज्ञानकथा लिहली होती. (प्रकाशन: धनंजय २०१६) मराठीतील कदाचित ही पहिलीच प्रकाशित खो कथा असावी. मिपा परिवारातील लेखक उत्साही आहेत, नवनवीन आव्हानं पेलायला तयार असतात. म्हणून इथेही लेखकांनी मिळून कथा लिहावी अशी मनापासून इच्छा आहे. पण वरील कथाप्रकार मी अजून थोडा अवघड आणि मजेदार केला आहे. उदाहरणार्थ: समजा खो कथा लिहायला तीन लेखक तयार आहेत (अ, ब, क) कथेची लांबी सहा पोस्ट असावी आणि प्रत्येक पोस्टमध्ये ५०० ते हजार शब्द असावेत हे त्यांनी आधीच ठरवलंय. कथेची सुरुवात अ करतोय. पण तो नेहमीप्रमाणे पहिल्या पोस्टने सुरुवात करणार नाही तर मधूनच कुठूनतरी करेल. समजा अ ने तिसरी पोस्ट लिहली. आता तो पुढच्या भिडूला खो देईल. भिडू ....लिहलेली पोस्ट ....... खो अ ........३ ............ क तू सहावी पोस्ट लिह क ........ ६............ ब तू पाचवी पोस्ट लिह ब ........ ५ ............ क तू पहिली पोस्ट लिह क ........ १ ............ अ तू दुसरी पोस्ट लिह अ ......... २ ............ आता उरला ब. त्याने चौथी पोस्ट लिहून कथा संपवावी challenging प्रकार आहे. डोकं भंजाळून जाईल पण मजा येईल. खात्री बाळगा. सांगा मग. कुणी आहे का तयार ??
वर्गीकरण
उपक्रम

प्रतिक्रिया द्या
12186 वाचन

💬 प्रतिसाद (57)
आ
आनंदी गोपाळ Fri, 03/17/2017 - 16:43 नवीन
मराठीतील कदाचित ही पहिलीच प्रकाशित खो कथा असावी.
↑ या संदर्भाने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
अ
अॅस्ट्रोनाट विनय Fri, 03/17/2017 - 17:52 नवीन
स्पिन दी यार्न हा basic आणि फारसा challenging नसणारा प्रकार वाटला. ज्या लेखकाने पहिली पोस्ट लिहली तो पुढे काय लिहायचं याच्या सगळ्या सुचना स्वतःच देऊन ठेवतोय. यात मजा ती काय. अजिबात चुरस नाही, खेळाच्या व्याख्येत ते बसत नाही. इथे आपण पुढे काय लिहायचं हे पुर्णपणे पुढील लेखकावर सोपवणार आहोत. पुर्ण स्वायत्तता. दुसरी गोष्ट प्रत्येक पोस्ट लिहायला शब्द आणि वेळेची मर्यादा असणार आहे ( जशी खेळात असते.) शिवाय random sequence आहे म्हणजे मजाच मजा. या अर्थाने मिपावरील हा प्रयोग unique आहे हे मी अभिमानाने सांगू शकतो. अजून एक गोष्ट म्हणजे, मी काही ठिकाणी असं पाहिलेलं (स्पिन दी यार्नपण यात येतं ) आहे की एकजण एक भाग लिहतो, दुसरा त्याच्या पुढचा वगैरे वगैरे पण... एकच round खेळला जातो. म्हणजे प्रत्येकजण एकच पोस्ट लिहतो. असं केल्याने जास्त मजा येत नाही. आम्ही दोघांनी मिळून जी कथा लिहली होती त्यात आम्ही तब्बल १६ round खेळलो. कधीकधी एकाने लिहलेलं दुसरा पुर्ण पलटायचा, डोकं भंजाळून जायचं. प्रत्येकाला पुन्हा नव्याने विचार करावा लागायचा. पुढेपुढे तर कोण कमी वेळेत पोस्ट टाकतो यावरून चुरस निर्माण झाली होती. एका दिवसात एक मग दोन आणि शेवटी शेवटी तीनतीन पोस्ट पडायला लागल्या. दोनदोन वाजता झोपेतून उठून पोस्ट लिहल्या आहेत. थोडक्यात एखाद्या खेळासारखी चुरस, अनपेक्षित वळणं, challenge आणि थरार असल्यामुळे ही क्ष लोकांनी मिळून लिहलेली समूहकथा बनली नाही, त्यापेक्षा हटके काहीतरी बनलं. याअर्थाने मी आम्ही पहिली खो कथा लिहली असं म्हटलं. तुम्ही म्हणता त्याला खो कथा म्हणता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 03/17/2017 - 16:50 नवीन
आता खूपच कुतुहल जागे झाले आहे ! करा लवकर सुरुवात, सगळेजण वाट पाहत आहेत.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 03/17/2017 - 18:00 नवीन
सध्या भाग घेणे शक्य नाही परंतु वाचायला नक्कीच आवडेल..वाट बघतोय! :)
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Fri, 03/17/2017 - 19:17 नवीन
फार ताणु नका उत्सुकता. लवकर सुरु करा. मी रोज येऊन बघुन जातेय की काही ठरलं का ते. धागाकर्त्याने झटपट नियम मांडावेत. ज्यांना मान्य असतील त्यांनी सहभाग घ्यावा. पहिला प्रयत्न आहे. ज्या काही सजेशन्स असतील त्या पुढच्या राऊंडमध्ये घ्या. पण सुरुवात तर करा. वर कुणी तरी व्हॉटसॅप ग्रुप बद्दल बोल्लय. त्यात अति चर्चा होईल हो. शिवाय अनेकांना खरे नाव नंबर द्यायचा नसतो. तेव्हा व्यनि मधुन लेखक काय ते बेसिक ठरवुन घेतील. पण पुन्हा त्यांच्यात चर्चा नको!
  • Log in or register to post comments
अ
अॅस्ट्रोनाट विनय Fri, 03/17/2017 - 20:03 नवीन
जास्त उत्सुकता ताणत नाही. उद्या ( दि. १८ ) खो कथेला सुरुवात होईल याची खात्री बाळगावी. कथाप्रकार हटके असणार आहे.
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 03/17/2017 - 21:33 नवीन
शुभेच्छा....!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अॅस्ट्रोनाट विनय
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा