Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दृष्टीकोन

स — संदीप-लेले, गुरुवार, 03/16/2017 - 16:40
नेत्रभिंग बसवले नवीन, पण कोन तोच दृष्टीचा, वैद्यकीय प्रगती अफाट, उपयोग काय हो त्याचा ! लांबले आयुष्यमान, भर शून्य कर्तुत्वाचा, तगले जीव अनेक, उपयोग काय हो त्याचा ! जल, रस्ते, हवाई मार्गे, आक्रसला भूगोल जगाचा, वेळ नाही घरी थांबायाला, उपयोग काय हो त्याचा ! वसविली आडवी नगरे, गाठला कळस उंचीचा, निसर्ग नाहीसा केला, उपयोग काय हो त्याचा ! लडबडला, मग गडबडला, भाव अहो तेलाचा, अर्थशास्त्रात खुलासे अनेक, उपयोग काय हो त्याचा ! महागाई आली गेली, झगडा चालूच आयुष्याचा, सुगी जगाच्या बाजारी, उपयोग काय हो त्याचा ! उपसुनी खनिजं बेसुमार, गल्ला भरती बाजाराचा, मिटे ना दारिद्र्यरेषा, उपयोग काय हो त्याचा ! खुळखुळे पैसा हातात, संपे न हव्यास सुखाचा, खुळखुळा होई जीवाचा, उपयोग काय हो त्याचा ! आधी शोध शून्याचा, आता वेध अनंताचा जगाच्या लोकसंख्येला, उपयोग काय हो त्याचा ! उमज ना सारासार, तरी हक्क असे मतदानाचा, लोकशाही भले हीss मोठ्ठी, उपयोग काय हो त्याचा ! मानवी व्यवस्थांचा ऊत, त्यात विवेक नाही साचा, गीतेचे सार अनेक, उपयोग काय हो त्याचा ! [टीप: विंदा करंदीकर यांच्या ‘उपयोग काय त्याचा’ ह्या कवितेवरून सुचलेली कविता]

प्रतिक्रिया द्या
529 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा