पाककृती

तंदूरी मलाई ब्रॉकोली

Primary tabs

TMB1

साहित्य
५०० ग्रॅम ब्रॉकोली
१ कप किसलेले चेडार चीज
१ कप किसलेले प्रोसेसड चीज (अमुल)
१०० ग्रॅम फ्रेश क्रीम
६ ते ८ वेलदोडे
१५ ते २० काळेमिरे
२ मोठे चमचे लसूण पेस्ट
१ मोठा चमचा आलं पेस्ट
४ ते ६ हिरव्या मिरच्या (आवडीनुसार कमी जास्त करा)

कृती
एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवा. ब्रोकोलीचे मोठे तुकडे करून घ्या. पाण्याला उकळी आली की त्यात १ मोठा चमचा मीठ घालून, ब्रोकोली २ ते ३ मिनिटे गरम पाण्यात ब्लाँच करून घ्या. गरम पाण्यातून काढून, लगेच गार पाण्यात किंवा नळाखाली गार करून घ्या. ब्रोकोली निथळत ठेवा, तो पर्येंत इतर तयारी करून घ्या.

Step1 Step2

मिक्सर मधून, मिरच्या, आलं, लसूण, वेलदोड्याचे दाणे आणि काळीमिरी बारीक करून घ्या. एका भांड्यात, चीज, क्रीम आणि हि लसूण मिरची पेस्ट एकत्र करून घ्या. मिश्रणात चवीनुसार मीठ घालून, ब्रोकोली ह्या मिश्रणात १ ते २ तास मॅरीनेट करायला ठेवा.

Step3 Step4

ओव्हन, १८० ला प्री-हीट करून, हि ब्रोकोली १५ ते २० मिनिटे भाजून घ्या. कांदा, टोमॅटो बरोबर हि तंदुरी मलई ब्रोकोली गरमागरम वाढा!

Step5

चीज आणि क्रीम मुळे एक छान richness येतो ह्या डिशला! मिरच्या कमी घातल्या तर मुले देखील आनंदाने खातील. ब्रोकोली ऐवजी, बोनलेस चिकन चे तुकडे वापरून ह्याच पद्धतीने केलेला मलई चिकन टिक्का सुद्धा सुंदर लागतो! क्रीम आणि चीज बेस्ड डिश असल्यामुळे, एखाद्या लाम्बरूस्को, जिनफन्डेल किंवा कॅबरने वाईन सोबत अजूनच मज्जा येईल!

TMB2

केडी

नं विसरता फोटो काढून इथे टाका, आणि कसे झालेले हे पण लिहा...
_/\_

केडी

कॉर्न आणि कांद्याची आयडिया भारी! फोटो छान!

छान झालेलं. ब्रोकोली कमी होता म्हणून मका आणि कांदा पण घातला.
फोटो पहिल्यांयांदाच अपलोड करतेय.

पैसा

आम्ही जरा कुठे डाएट करावं म्हटलं की हे दुष्ट लोक क्रीम चीज घेऊन आलेच म्हणून समजा!

सावत्या

उत्तम पाककृती !!!
पण ब्रोकोली आणि चीझ विथ क्रिम....
डायटेशन ला हार्ट अटॅक येईल हो...

केडी

अहो एकदाच करून बघा....चवीला खाऊन बघा, Weight and Age are mere damn numbers! :-)) :-))

सविता००१

ओव्हन नाही माझ्याकडे. तू कर आणि बोलव मला. ते जास्त सोप्पंय..
ओव्हन नसेल तर नाही होणार का रे?

केडी

तव्यावर (ग्रील पॅन) वर भाजून बघ...

दिसते आहे.
करेन एकदा फुरसतीत.
(फुरसतीत करायच्या, स्वत:ला आग्रह करून करायच्या गोष्टींची यादी वाढते आहे.)
स्वाती

बरखा

ब्रोकोली आवडते, नक्की करुन बघणार

मदनबाण

आहाहा... भूक लागली ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 3 पेग :- Kannada Rapper Chandan Shetty