Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एवढ्यात काय खरेदी केलत - २

र
रेवती
Sun, 03/19/2017 - 03:35
🗣 153 प्रतिसाद
नमस्कार, गविंनी सुरु केलेल्या खरेदीच्या पहिल्या धाग्याने शतक ठोकल्याने दुसरा धागा सुरु करत आहे. हा धागाही शतकी व्हावा अशी इच्छा आहे. आज माझी अ‍ॅमेझॉनची उरलेली ऑर्डर आली. मुलाच्या खोलीत इकडे तिकडे ठेवलेली पुस्तके नीट राहण्यासाठी जड बुक एन्डस मागवले होते ते आले. दोन मनुष्याकृती आधार देऊन पुस्तके सरळ करतायत अशा प्रकारातले बुक एन्डस आहेत. एक लोशन मागवलेले आले. कारमधील सेलफोन होल्डर मागवला होता तो आला. नवर्‍याच्या कारसाठी चार्जर, ५ युएसबी आउटपुटस असलेला मागवला होता. या वस्तू अजून वापरलेल्या नाहीत. उद्यापासून वापरात येतील. हे प्रकार खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये हिंडावं लागलं नाही म्हणून बरं वाटतय. एक वॉल क्लॉक मागवलं आहे ते अजून आलं नाही. त्यावर टॉम ब्रेडीचं चित्र आहे. तुम्ही तुमची खरेदी येथे लिहून धागा यशस्वी करा किंवा धागा यशस्वी होण्यासाठी खरेदी करा. धन्यवाद.

प्रतिक्रिया द्या
33306 वाचन

💬 प्रतिसाद (153)
इ
इडली डोसा Sun, 03/19/2017 - 04:21 नवीन
कारमधील सेलफोन होल्डर मागवला होता तो आला
याची लिंक द्याल का? मलाही घ्यायचा आहे पण क्णता घ्यावा हे ठरत नाहिये. आणि मुलीला सेफ अशी पाण्याची बाटली कोणती घेऊ एनी सजेशन्स? (प्लॅस्टीक आणि काच नको आहे)
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 03/19/2017 - 14:37 नवीन
https://www.amazon.com/gp/product/B01KM1J38G/ref=oh_aui_detailpage_o02_s00?ie=UTF8&psc=1 हा सेलफोन होल्डर आहे. काचेची बाटली जड होते, फुटते असे वाटत असेल तर बाहेरून रबरी आवरण असलेल्या मिळतात, अन्यथा स्टीलच्या वापराव्यात असे वाटते. अ‍ॅल्यूमिनिअम आणि स्टीलमध्ये गफलत होवू शकते म्हणून स्टीलचीच बाटली बघून घ्यावी. मी दोन घेतल्यात टारगेटमधून व भेट म्हणून तिसरी मिळाली. अडगळीत पडलेली चौथी काढली पण ती अ‍ॅल्यूमिनिअमची असल्याने लक्षात आले. प्रथमदर्शी ती बाटली स्टीलची वाटते. प्लास्टिक मलाही नको वाटते पण मुलासाठी घेतली कारण खेळताना मैदानाच्या कडेला नीट ठेवणे वगैरे मुलांच्या लक्षात रहात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इडली डोसा
इ
इडली डोसा Mon, 03/20/2017 - 06:34 नवीन
सेलफोन होल्डर चांगला वाटला. बाटली मुलीसाठीच घ्यायचीये त्यामुळे स्टील बघतीये. पण फार फसव्या दिसतात आणि स्टील / अ‍ॅल्युमिनीअम फरक कसा ओळखायचा? मी एक स्टील म्हणुन वापरते पण ती बहुतेक अ‍ॅल्युमिनीअम आहे अशी शंका येतीये आता मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ल
लॉरी टांगटूंगकर Mon, 03/20/2017 - 06:55 नवीन
मॅग्नेट? स्टील का? अ‍ॅल्युमिनिअम का नाही? काही स्पेसिफिक कारण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इडली डोसा
इ
इडली डोसा Mon, 03/20/2017 - 20:27 नवीन
इथे कंपॅरीजन वाचु शकता. स्टील जास्त सेफ म्हंटल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर
र
रेवती Mon, 03/20/2017 - 19:57 नवीन
याची हेल्प होतिये का बघ. Aluminum sounds duller and has less of a ring than stainless steel. Rap your knuckles on the edge of the pot or bang it with a wooden spoon. Aluminum feels slightly warmer than stainless steel at room temperature. After being washed, aluminum tends to dull slightly, while stainless steel usually stays bright. Because aluminum is softer than stainless steel, a key will scratch aluminum much more readily than stainless steel. If a magnet sticks to the side of the pot (even weakly), it is definitely stainless steel and not aluminum. (Note: If a magnet does not stick, you still can’t tell which metal it is, but you can be sure it’s stainless steel if the magnet does stick!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इडली डोसा
स
स्थितप्रज्ञ Fri, 04/21/2017 - 06:33 नवीन
पुण्यात असाल तर रामेश्वर चौकात (शनिपार कडून शिवाजी रस्त्याकडे जाताना बाबुगेनु चौकापुढचा चौक) उत्तम क्वालिटीच्या तांब्याच्या बाटल्या मिळतात. अल्युमिनियम अजिबात नकोच. तांबे नाही मिळाले तर स्टील घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इडली डोसा
अ
अभिजीत अवलिया Sun, 03/19/2017 - 06:30 नवीन
हल्लीच हा कार चार्जर अमेझॉन वरून घेतला. खूप फास्ट चार्जिंग करतो. आवडला. Tech Sense Lab Qualcomm Certified Quick Charge 2.0 Car Charger यामाहाची 'फसिनो' घेतली ३ आठवड्यापूर्वी. गाडी खूप आवडली. तांब्याची भांडी रोजच्या जीवनातून तशी हद्दपार झालेली आहेत म्हणून पाण्यासाठी एक तांब्याची बाटली घेतली तुळशीबागेतून.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 03/19/2017 - 15:49 नवीन
@यामाहाची 'फसिनो' घेतली ३ आठवड्यापूर्वी. गाडी खूप आवडली. ››› मीही घ्यायच्या विचारात आहे. सस्पेंशन,लाइट, ब्रेक्स कसे आहेत. १५ ते ५० कि. मी. अंतर चालवताना सीट कंफर्टेबल वाटतय का? गाडित काही उणिवा जाणवल्यात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
अ
अभ्या.. Sun, 03/19/2017 - 15:51 नवीन
घ्या गुरुजी, मांडी घालून येतीय चालवायला. मानो या ना मानो मांडी फसियानो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अभिजीत अवलिया Sun, 03/19/2017 - 17:15 नवीन
मी नवीन मॉडेल घेतले आहे ज्यात केंद्र सरकारच्या हल्लीच्या नियमाप्रमाणे गाडी चालू केली की हेडलाईट आपोआप चालू होते आणी गाडी बंद केली की हेडलाईट बंद. हेडलाईटला वेगळे चालू बंद करायचे बटन नाही. त्याची एक मुख्य समस्या म्हणजे बऱ्याच लोकांना केंद्र सरकारच्या ह्या नवीन नियमांबद्दल माहीत नसल्याने रस्त्यावरून जाताना बरेचजण हेडलाईट चालू असल्याची सूचना करतात. :) आतापर्यंत १०० किमी पण चालवलेली नाही कारण नंबर मिळाला न्हवता. कालच नंबर मिळाला त्यामुळे आज एका दिवसातले सगळ्यात जास्त म्हणजे जवळपास १६ किमी ड्रायव्हिंग केले. तुलनेत बऱ्या रस्त्यांवरून गाडी चालविल्याने अजूनतरी सस्पेन्शन चांगलेच वाटतेय. ब्रेक्स देखील ठीक आहेत. सीट कंफर्टेबल वाटतेय. गाडीची उंची थोडी कमी आहे त्यामुळे महिलांसाठी अतिशय उत्तम आहे. उणिवा - १) पेट्रोल टाकीचे झाकण सीटच्या खाली आहे. त्यामुळे पेट्रोल भरताना सीट उचलावी लागते. २) किक मारून गाडी चालू करायची असल्यास गाडी सेन्टर स्टॅन्डला उभी करावी लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अनन्त्_यात्री Mon, 03/20/2017 - 06:24 नवीन
दुचाकीला "गाडी" म्हणणे ही खास पुणेरी सवय !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 03/20/2017 - 17:26 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
इ
इरसाल कार्टं Mon, 03/20/2017 - 07:52 नवीन
मीही घेतलीय. अगदी आरामात चालवता येते. ४५ वर्षी बाबा शिकलेत चालवायला. तारुण्यातली राहिलेली हौस फिटवतायेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
संदीप डांगे Mon, 03/20/2017 - 20:29 नवीन
४५ म्हणजे तरुणच आहेत की... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल कार्टं
ए
एमी गुरुवार, 04/20/2017 - 08:27 नवीन
+1 old age = own age + 20 years हे नेहमी ध्यानात ठेवायचं :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ग
गवि Sun, 03/19/2017 - 14:55 नवीन
कुत्र्याशी संबंधित सप्लाईज अमेझॉनवर अतिशय स्वस्त पडतात असा अनुभव आहे. डॉग फूड, लीशेस, पिंजरा (जस्ट इन केस), खेळणी वगैरे पुष्कळ मागवून समाधानकारक आहे अमेझॉन (पेटशॉपपेक्षा कमी किंमत आणि वेळेत डिलीव्हरी याबाबत) पण दोन ब्लॅक स्पॉट्स असे: १. कारसीट कुत्र्याने खराब करु नये म्हणून वेगळं प्रोटेक्टिव्ह कव्हर घेतलं. ते कारमधे लावताच लगेच फाटलं (त्याचे लटकवणारे बेल्ट्स. २. प्रवासात थंडीपासून कुत्र्याच्या रक्षणासाठी पुलओव्हर गरम कोट मागवला होता. त्यात आगोदरच एका पांढर्या कुत्र्याचे केस आतून चिकटले होते. यक्क. ..परत केला. रिफंड मिळाला.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 03/19/2017 - 15:12 नवीन
प्रवासात थंडीपासून कुत्र्याच्या रक्षणासाठी पुलओव्हर गरम कोट मागवला होता.
ऐश आहे बाबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
संजय क्षीरसागर Sun, 03/19/2017 - 19:27 नवीन
व्यू ४०" फुल एचडी टिवी विथ टाटा स्काय एचडी सेट टॉप बॉक्स घेतला. निव्वळ धमाल क्वालिटी आहे ! इतरांकडचे टिवी पुन्हा निःपक्षपतीपणे पाहिले..... व्यूच्या परफॉर्मन्सला खरंच तोड नाही .
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 03/19/2017 - 19:32 नवीन
अरे वा! बरय. गविंनी सुचवल्याप्रमाणे लेनोवोचा सेलफोन (आवडला म्हणून) ऑर्डर केलाय. अजून आला नाहीये. वाट बघिंग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
श
श्री Sat, 03/25/2017 - 12:49 नवीन
व्यु ४० कितिला पडला, फ्लिपकार्ट वर २ मॉडेल दिसतायेत, युएसबी किती पोर्ट आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
प
पी. के. गुरुवार, 03/30/2017 - 09:25 नवीन
मीही इतक्यात गावच्या घरासाठी व्यु ४० घेतला. आजून इंस्टाल करायचा बाकी आहे. दोन मॉडेल म्हणत असाल तर १) साधा ४० इंच आहे रुपये २१,९९९/- २) स्मार्ट ४० इंच आहे रुपये २६,९९९/- मला गावाच्या घरासाठी स्मार्ट TV ची गरज नसल्या मुळे साधा घेतला. युएसबी पोर्ट १ आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री
श
श्री गुरुवार, 03/30/2017 - 17:51 नवीन
मॉडेल २०१५ कि २०१७ आहे, वारंटी किती वर्षाची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पी. के.
क
किसन शिंदे Sun, 03/19/2017 - 19:48 नवीन
लिहायला पेन नव्हतं म्हणून मग आज दुपारीच बाहेरून येताना दोन रुपयांचे यूज अॅण्ड थ्रो पेन घेतलं नटराजचं. आमच्या चाळीतला बोका पक्का बदमाश आहे. माझ्यावर खुन्नस असल्याने नेमकं माझ्याच टू व्हिलरच्या सीटवर ओरखडे करतो. त्यापासून बचावासाठी एक ताडपत्रीचे कव्हर काल घेतले जुन्या मार्केटला. लय घासाघीस करावी लागली. अरे हो, गावी रात्रीच्या वेळी कोंबड्या डालण्यासाठी एक मोठी पाटी (डालं?) हवी होतं आजीला. खूप शोधाशोध केली भुलेश्वरला जावून तेव्हा कुठे मिळालं.
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 03/20/2017 - 07:19 नवीन
मी परवा तूरडाळ आणली. भाव किलोला ७३ रुपये बघून डोळ्यावर विश्वास बसत नव्हता! हल्ली १२०/१३० बघायची सवय झालेली ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
स
सस्नेह Mon, 03/20/2017 - 09:59 नवीन
अय्या ! कित्ती स्वस्त ! मला परवा ८० रु. किलो मिळाली. आता गोव्याला येईन ना, तेव्हा पोतं घेऊन येईन हं, तूरडाळ घ्यायला ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सस्नेह Mon, 03/20/2017 - 10:01 नवीन
रच्याकने, कालच सिहोरी गहू घेतले १०० किलो, २७ रु. ने. त्यात बरेच नमुने होते. हा एम पी सिहोरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
प
पैसा Tue, 03/21/2017 - 04:36 नवीन
गोव्यात गव्हाचे प्रकार मिळत नाहीत. मी हल्ली कसे ओळखायचे ते विसरलेय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
प
पैसा Tue, 03/21/2017 - 04:34 नवीन
नाहीतर इकडेच घेऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
अ
अनुप ढेरे Mon, 03/20/2017 - 10:10 नवीन
जरा संक्षींना द्या एक किलो माझ्यातर्फे. अलिकडेच वाद घालत होते डाळ स्वस्त झालेली नाही म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
संजय क्षीरसागर Mon, 03/20/2017 - 10:51 नवीन
स्वस्त झाली असेल तर आनंदचे. मायला, कुकींग गॅस एकदम ५४० चा ७२० झालायं, त्यात थोडासा दिलासा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
श
श्रीगुरुजी Wed, 03/22/2017 - 10:12 नवीन
काहीतरी गडबड दिसते. मागच्याच आठवड्यात ऑनलाईन ७६२.१५ रूपये भरून सिलिंडर बुक केला आणि ३-४ दिवसांनी घरी आला. सिलिंडर आल्यानंतर दुसर्‍या दिवशी खात्यात अनुदानाचे २९०.८२ रूपये जमा झाल्याचा लघुसंदेश आला. म्हणजे सिलिंडर ४७१.३३ ला मिळाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Wed, 03/22/2017 - 14:36 नवीन
अकाऊंट बघतो. धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कपिलमुनी Wed, 03/22/2017 - 15:59 नवीन
मा. पंप्र. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देउन तुम्ही सबसिडी सोडली नाही का ?? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संजय क्षीरसागर Wed, 03/22/2017 - 16:28 नवीन
सबसीडी सोडा म्हणायला त्यांना काय जातंय ? ७२० रुपयाला गॅस घेऊन त्याच्यावर काय कुकवणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
संजय क्षीरसागर Wed, 03/22/2017 - 16:32 नवीन
झक मारली आणि भावनेच्या भारात सबसीडी सोडली, असं आता पब्लिकला वाटायला आता वेळ लागणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
श
श्रीगुरुजी Wed, 03/22/2017 - 16:38 नवीन
मुनीवर्य, इथे परत फिरकला नाहीत हो? पलायन केलेलं दिसतंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Wed, 03/22/2017 - 20:19 नवीन
;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मोदक Wed, 03/22/2017 - 20:24 नवीन
केजरीवाल छाप प्रतिसाद. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/23/2017 - 04:56 नवीन
आपला आदर्श असलेल्या केजरीवालांप्रमाणे हे पण पळपुटे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
क
कपिलमुनी गुरुवार, 03/23/2017 - 11:15 नवीन
राजकारण्याचे आदर्श माझे नाहीत , तुमची गल्ली चुकत आहे ! मूळ प्रश्नाला बगल छान दिलीत . बाकी पळपुटे म्हणत असाल तर म्हणा काय शष्प फरक पडत नाही , प्रत्येक धागा , प्रतिसाद मॉनिटर करत बसण्या एवढा मी रिकामटेकडा नाही. तुम्हाला खोटारडा म्हणाले होते कारण तुम्हाला पुरावे मागून तुम्ही ते दिले नव्हते , तेव्हाही बऱ्याच कोलांट्या उड्या मारल्या होत्या हवे तर जुने धागे चाळोन बघा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/23/2017 - 15:09 नवीन
ज्या हिरिरीने तुम्ही केजरीवालांच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टींचे समर्थन करीत असता, त्यावरून तुमचे आदर्श कोण आहेत हे अत्यंत स्पष्ट आहे. केजरीवाल छाप प्रतिसाद देण्यासाठी प्रत्येक धागा, प्रत्येक प्रतिसाद मॉनिटर करण्याची गरज नसते. समोर दिसलेला कोणताही धागा उघडायचा आणि धाग्याचा विषय कोणताही असला, धाग्याच्या विषयाचा राजकारणाशी अजिबात संबंध नसला तरी तिथे संदर्भहीन केजरीवाल छाप प्रतिसाद द्यायचे हे तुमचे व्यवच्छेदक लक्षण आहे (उदा. हा धागा). तुमच्या असल्या केजरीवाल छाप प्रतिसादावर समोरच्याकडून सणसणीत उत्तर मिळाले की तिथून पलायन करायचे हे देखील याच लक्षणाचा भाग आहे (उदा. विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा धागा). असंख्य पुरावे देऊनसुद्धा एखाद्याला वारंवार खोटारडा म्हणणे, त्याला कावीळ झाली आहे असे म्हणणे हे केजरीवालांच्या बिनदिक्कत खोटे आरोप करण्याच्या व्यसनाशी सुसंगतच आहे. आपले केजरीवाल छाप प्रतिसाद पहायचे असतील तर जुने धागे चाळोन बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
संदीप डांगे Wed, 03/29/2017 - 21:09 नवीन
असो. सदर प्रतिसादावरुन असे लक्षात येतंय की साक्षात मोदींनी आवाहन करुनही तुम्ही सबसिडी घेत आहात. विषय संपला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 03/31/2017 - 11:09 नवीन
मुनीवर्य या धाग्यावरून नाहीसे झाले तेव्हाच विषय संपला होता. तुम्ही तो परत उकरून काढलात. असो. सबसिडी सोडण्याइतके आम्ही श्रीमंत नाही. श्रीमंतांचे ट्रकचालक सुद्धा खिशात २०-२० लाख रूपये रोख घेऊन हिंडतात. आम्ही तेवढे श्रीमंत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कपिलमुनी Fri, 03/31/2017 - 15:49 नवीन
मिपा सोडून बरीच कामे आहेत. त्यामुळे "शेवटचा प्रतिसाद माझा " टाईप लिहिणे जमत नाही. आणि मूळ प्रश्नाला सोडून इतर गोष्टी मधे आणल्यात तेव्हाच उत्तर कळाले . अर्थात तो तुमचा वैयक्तीक चॉईस आणि निर्णयस्वातंत्र्य आहे. फक्त भाजपाचे धोरणाचे एवढे कट्टर पुरस्कर्ते असूनदेखील तुम्ही मा.पंप्रंच्या आवाहनाला प्रतिसाद न दिल्याचे वाचून अंमळ मौज वाटली इतकेच ! बाकी चालू द्या ! (गायब) मुनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मोदक Fri, 03/31/2017 - 16:29 नवीन
नेहमीप्रमाणे व्यक्तीगत प्रतिसाद. आपवाल्यांकडून वेगळे काय अपेक्षित असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी Fri, 03/31/2017 - 17:07 नवीन
मिपा सोडून बरीच कामे आहेत. त्यामुळे "शेवटचा प्रतिसाद माझा " टाईप लिहिणे जमत नाही. "शेवटचा प्रतिसाद माझा" टाईप लिहिणे जमत नसले तरी केजरीवाल टाईप प्रतिसाद लिहिण्यात मात्र आपण प्रचंड कौशल्य कमावले आहे याविषयी दुमत नसावे. आणि मूळ प्रश्नाला सोडून इतर गोष्टी मधे आणल्यात तेव्हाच उत्तर कळाले . अर्थात तो तुमचा वैयक्तीक चॉईस आणि निर्णयस्वातंत्र्य आहे. धागा खरेदीवर आहे. "गॅसवरील सबसिडी सोडणे" हे विषयांतर तुम्ही करून धागा भरकटविण्याचा प्रयत्न केलात. मी फक्त प्रत्युत्तर दिले. अर्थात केजरीवालांच्या पित्त्यांकडून यापेक्षा वेगळी अपेक्षाच नव्हती. फक्त भाजपाचे धोरणाचे एवढे कट्टर पुरस्कर्ते असूनदेखील तुम्ही मा.पंप्रंच्या आवाहनाला प्रतिसाद न दिल्याचे वाचून अंमळ मौज वाटली इतकेच ! बाकी चालू द्या ! (गायब) मुनी कोणताही विषय असला तरी केजरीवाल छाप प्रतिसाद देण्याचे आपले व्यसन बघून कायमच मौज वाटत आली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
संदीप डांगे Fri, 03/31/2017 - 17:16 नवीन
उकरुन बिकरुन काही काढला नाही हो, इथेच याच धाग्यावर आहे जे आहे ते, तेवढेच दिसले ते बोललोय, उकरुन काढणे म्हणजे एकिकडचे दुसरीकडे उकरुन क्षुद्रपणे ज्या त्या धाग्यावर ट्रक घेऊन फिरणे, वगैरे वगैरे.... बाकी तुम्ही सबसिडी सोडण्याइतके श्रीमंत नाही म्हणून सोडली नाही हे सांगितल्याबद्दल धन्यवाद! तो तुमचा व्यक्तिगत प्रश्न. त्यात भोचकपणा करणे योग्य नाही. त्रास झाल्याबद्दल मनापासून दिलगीरी व्यक्त करतो. पण.... हे आधीच अनावश्यक थयथयाट न करता नीट सांगितले असते तर काहीच नसतो हो बोललो. विषयांतराबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 03/31/2017 - 17:25 नवीन
त्याचं असं आहे डांगेराव, मुनीवर्यांनी धाग्याच्या विषयाशी अजिबात संबंध नसलेला विषय या धाग्यावर आणून त्या निमित्ताने माझ्यावर शरसंधान करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नाईलाजाने मला त्यावर उत्तर द्यावे लागले. त्यानंतर मुनीवर्य ६ दिवस गायब असल्याने तो विषय तिथल्या तिथे संपला असे मी समजत होतो. तुम्ही विनाकारणच धाग्याशी संबंधित नसलेला तो विषय पुन्हा उकरून काढला. नाईलाजाने मला पुन्हा एकदा उत्तर द्यावे लागले. जर दुसरीकडचा ट्रक इथे घेऊन येणे म्हणजे क्षुद्रपणे दुसर्‍या धाग्यावरचा मुद्दा इथे उकरणे असेल, तर त्याच न्यायाने ,माझ्या मोदीसमर्थनाचा, या धाग्याच्या विषयाशी अजिबात संबंध नसलेल्या सबसिडीशी संबंध जोडणे, हेसुद्धा क्षुद्रपणे दुसर्‍या धाग्यावरचा मुद्दा इथे उकरणेच आहे. असो. जर यापुढे या धाग्यावर माझ्याबद्द्ल नवीन व्यक्तिगत टिप्पणी येणार नसेल, तर हा विषय माझ्या दृष्टीने संपलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 03/31/2017 - 17:34 नवीन
सबसिडी सोडण्याइतके आम्ही श्रीमंत नाही >> माझ्यासाठी हा विषय इथेच संपला आहे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा